खान्देश कला रत्न दिनेश चव्हाण यांना दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड

चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांना फिल्म मीडिया नेटवर्क चा दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड प्रदान


चाळीसगाव
येथील चित्रकार कवी साहित्यिक तथा रेकॉर्ड होल्डर आर्टिस्ट दिनेश चव्हाण यांना फिल्ममोरा नेटवर्क तर्फे कलाक्षेत्रातील कार्यासाठी देण्यात येणारा दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड नुकताच रविवार दि.१८ रोजी मुंबई येथे हॉटेल सहारा स्टार येथे रंगारंग कार्यक्रमात रामानंद सागर यांच्या रामायणातील सीतेचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी बॉलिवूड, टोलिवूड , हॉलिवूड चित्रपटातील दिग्गज अभिनेते अभिनेत्री उपस्थित होते. मराठी हिंदी चित्रपट,टेलिव्हिजन मालिकेत काम करणारे कलावंतांनी देखील यावेळी हजेरी लावली होती. अतिशय दिमाखदार असा हा सोहळा संपन्न झाला.

चित्रकार दिनेश चव्हाण यांच्या अनेक कलाकृती तसेच कविता याना अनेक पुरस्कार सन्मान मिळालेली आहेत. ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात देखील त्यांचे आगळे वेगळे चित्रप्रदर्शनाने लक्ष वेधले होते.अनेक साहित्य संमेलनाना त्यांनी बोधचिन्ह आपले हस्तकलेतून दिले आहेत.

फास्टेस्ट स्केच आर्टिस्ट म्हणून देखील त्यांची नोंद झाली आहे.
त्यांचा अधोरेखित हा काव्यसंग्रह अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशित झाला. अनेक शाळेत ते कलेचे मार्गदर्शन देखील करण्यास जातात.अनेक साहित्य संमेलनात त्यांना निमंत्रित म्हणून देखील बोलावण्यात आले आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

2 thoughts on “खान्देश कला रत्न दिनेश चव्हाण यांना दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड”

Leave a Comment