मू.जे.महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात नेट परिक्षा उत्तीर्ण

मू.जे.महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात नेट परिक्षा उत्तीर्ण

दि.18/01/2024 रोजी यु.जी.सी.च्या नेट परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात मू.जे.महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी चि. तुषार अशोक वानखडे हा पहिल्याच प्रयत्नात, एम.काॅम. च्या तिस-या सत्राला असतांनाच नेट ची परिक्षा उत्तीर्ण झाला.

लहानपणीच पहिली- दुसरीला असतांना वडिलांचे छत्र हरवल्याने आर्थिक व कौटुंबिक परिस्थितीची जाणीव ठेवुन तुषारने शालेय शिक्षण पुर्ण केले. पुढे उच्च शिक्षणासाठी त्याने मू.जे. महाविद्यालयात प्रवेश घेतला. तुषारने मू.जे. महाविद्यालयातून बी.काॅम.ची पदवी प्राप्त केल्यानंतर आर्थिक परिस्थीती बिकट असल्यामुळे तो त्याच्या मुळ गावी खामगावला परतला.

नोकरी लवकर लागावी यासाठी त्याने व्यावसायिक पदवी म्हणुन एम.बी.ए.केले आणि मार्च 2023 ची महाराष्ट्राची सेट परिक्षा मॅनेजमेंट या विषयात उत्तीर्ण झाला. पुढे शिकत राहण्याची आस असलेल्या तुषारने पार्ट टाईम जाॅब करत एम.काॅम. ला प्रवेश घेतला आणि आज पहिल्या प्रयत्नात नेट ची परिक्षा देखील उत्तीर्ण झाला. त्याने त्याच्या यशाचे श्रेय त्याची आई श्रीमती लिला वानखडे, बी.ई.,एम.बी.ए. व सेट उत्तीर्ण असलेला मोठा भाऊ रवी आणि एम.बी.ए. असलेली लहान बहिण ममता हिला दिले. प्राध्यापक होऊन गरीब व होतकरू मुलांना विषेश सहाय्य व मार्गदर्शन करण्याची ईच्छा तुषारने व्यक्त केली. तुषार हा मू.जे. महाविद्यालयातील सेवानिवृत्त मुख्य लिपिक कै.सुभाष सगळगिळे यांचा भाचा होय.

Leave a Comment