ग्लोबल खान्देश महोत्सव जगभर डंका

ग्लोबल खान्देश महोत्सवना गांवभर नही जगदुन्याभर डंका

MKभामरेबापु “जुने जाऊ द्या मरणालागु”असं आपण कितीही म्हणत असलो ,तरी “जुने ते सोने” या सत्याची प्रचिती आल्या शिवाय राहत नाही. जसजसां माणुस प्रगतीच्या दिशेने पुढे सरकतो व सिंहावलोकनच्या निमित्ताने मागे वळुन पाहतो,तेंव्हा आपसुकच तो मनातुन म्हणतो”खरच यार!जुनं तेच सोनं” आमचे पुणेस्थित मित्र भिला पाटील सर यांचा फोन आलेला…”बै दखा बापु,तुमना पेपरमाना ‘पायत,मेढ्या,मुक्सं’ हावु लेख वाचा.मायच्यान भो,भूतकायमा गवु नि रमी गवु. खेडंगाव,खयं,पायत,माय,मायबोली आहिरानी बठ्ठं बठ्ठं याद ऊनं हो.


सेवनस्टार हाटेलना AC रुममा मुव्हींग चेअरवर बठीसन भी,जो आनंद भेटस नही,तो आनंद मन्हा खेडामा भेटस हो..”काकुळतीने हा माणूस मनापासुन बोलत होता. ते ऐकुन पाय चालले प्रगतीकडे गातो आधुनिकतेची गाणी ओढ मजला गावाकडची याद येते माय अहिराणी या ओळी सहज सुचल्या नि ओठांवर तराळल्या. करु देत हो माणसाला,आधुनिकतेच्या गप्पा… पण एक मन मात्र माणसाचे रेंगाळत असते भुतकाळात.

ग्लोबल खान्देश महोत्सव बातम्या

ग्लोबल खान्देश महोत्सवाची दिमाखदार सांगता खान्देश भवनची पायाभरणी होणार

ग्लोबल खान्देश महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन संपन्न 2-3-2024

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे दिले जाणारे या वर्षीचे खान्देश भूषण खान्देश उद्योग रत्न खान्देशश्री पुरस्कार जाहीर

खान्देश विकास मंडळ

ग्लोबल खान्देश महोत्सवची उद्देश

आधुनिकतेच्या शिखरावर कितीही आनंद मिळत असला तरी माझ्या ग्रामीण ढंगातल्या अस्सल सुखातच परमानंद असतो. हिच गरज ओळखुन उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळच्या ग्लोबल खान्देश महोत्सवाने मुंबैकरांना हा ग्रामीण साज बाज आवाज असलेला परमानंद दिलाय..मुंबै पुणे पट्ट्यात व देश विदेशात उडुन गेलेला खान्देशी माणुस या ग्रामीण संस्कृतीला मुकलेला असतो. हायफाय रस्ते,प्रशस्त कार्यालये,उच्चभ्रु भाषांचा कोलाहल,छमछमीत झमझमीत रेस्र्टांमधील  झणझणीत दिखावु मेनु,कानठळ्या बसवणारे पाश्चात संगीत,एटीक्वेटस् व मॅनर्स चे बेगडी वागणे बोलणे यांत जरी ही माणसं रमतांना दिसलीत तरी एक मन त्यांचे ग्रामीण संस्कृतीत अडकलेले असते.ती भाषा,ते मेनु,ते ग्रामीण जगणं त्याच्या मनाभोवती गुंजारव घालतच असते,म्हणुनच हा आनंद देणेसाठी या”ग्लोबल खान्देश महोत्सवची” सारी खटाटोप असते.


आख्खा खान्देश एक अंगणात

वर्तमानातुन भविष्याकडे जाणे कदाचित सोपं असु शकते,पण वर्तमानातुन भुतकाळात शिरणे मात्र कठीण असते. कला,साहित्य,रंगमंच,भाषा,खाद्य,रुढी,परंपरा,पोषाख,उद्योग,संस्कार,चालीरीती, या सर्व क्षेत्रांची भरमार करुन या महोत्सवाने दोन पिढ्यांना जोडलेले आहे.आख्खा खान्देश एक आंगनमा हुभा करानं काम दिसस तितलं साधंसुधं नही से मंडई. पैल्हे ते आपली संस्कृतीनी आवड जोईजे,ती जपानी कयकय जोईजे ती या मंडळले से. कैक हात राबनात,रंगतनं पानी करीसनी त्यासनी हाई हुभारं. चालनी देस परदेसमा मन्ही ती माय गावरानी म्हणत आते ग्बोबल व्हयनी. पैल्हे गांवभर डंका पिटुत आते जगदुण्याभर मन्ही आहिरानी संस्कृतीना डंका पिटायना. देसविदेसमाना भाऊ बहीनीस्ले आते आभिमानमा सांगता ई.. See our khandesi sanskriti आपली  गावरानी आहिरानी भाषा,आपला गाना,तमासा,वगनाट्य,वासुदेव,पुरणपोई,कयन्यानी भाकर,खुडमिरचीनं पाणी, गवराई,कानबाई,आन्हा,खेतीना अवजारे गंजज गोष्टी या महोत्सवनी उजागर कर्‍यात. लोकेस्ले रोजगार भेटना, खान्देशी कलावंतस्ले व्यासपीठ भेटनं!धंदेवाईकस्ले धंदा भेटना. मंग काय मज्याज मजा.

वर्तमान व भूतकाळाचा भूतकाळाची भेट

या ग्बोबल खान्देश महोत्सवाने सार्‍या आधुनिक पिढीला जुन्या जमान्यात व भुतकाळात नेण्याचे काम केलेय. यात अस्सलता असते,यात कमर्शियलता नसते, यांत दिखावा नसतो यांत गावरणता असते. घडीभर का असेना,माझ्या भुतकाळाची नाळ जुळते,माझा माणुस जुळतो,दर बारा कोसावर बदलणारी भाषा जुळते,माझ्या रुढी परंपरा जुळतात,कालबाह्य होणारी भाषा,शब्दे,खाद्य,पेय,पेहराव जुळतात नि अनंत काळासाठी ही धरोहर या पिढीकडुन त्या पिढीकडे हस्तांतरीत होते.

विकास पाटील नावाच्या कॅप्टन

हे जिकरीचे काम उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाने केले आहे.रणांगणावर होणेआधी युध्द कॅप्टनच्या डोक्यात खेळले जाते.विकास पाटील नावाच्या कॅप्टनने हे शिवधनुष्य पेलले,त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी ते उचलले नि शानदार असा महोत्सव पार पडला. म्हणुन ग्लोबल खान्देश महोत्सवाच्या तमाम कॅप्टन्सना अर्थात मेढ्यांना माझा नमस्कारच.. व खुपखुप शुभेच्छाही


©MK भामरेबापु शिरपुर

(हे वाचुन जर खरच आपल्या भुतकाळातल्या गोंडस आठवणी तुम्हाला व विशेषतः विदेशस्थ भाऊ बहिणींना आठवल्या असतील तर तेथुन मला फोन करा. 9850515422 माझी लेखणी तर धन्य होईलच हो,पण मन्हा गावराणी जीवडाले भर्री भर्री आनंद व्हई. हाईज रावनाई से )
©MKभामरेबापु शिरपुर. धुळे.