जय खान्देश बोलो!कल्याण चलो!
उत्तरमहाराष्ट्र खान्देश विकास मंडळ आयोजित
ग्लोबल खान्देश महोत्सव!
।।जाहीर निमंत्रण।।
खान्देशी आणि इतरही सर्व बंधू भगिनींना जाहीर निमंत्रण देत आहोत. दि २,३,४ आणि ५ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजे पर्यंत कल्याण महानगर पश्चिम येथे ग्लोबल खान्देश महोत्सव भरवत आहोत. तरी या आनंद यात्रेचे प्रवाशी होऊन खान्देशी , पर्यटन,संस्कृती, खाद्यपदार्थ, संगीत, नृत्य याची लयलूट करा आणि आपल्या परिवारा तर्फे जीवनातील एक आनंदमयी सोहळा अनुभवा.
दोस्त हो ग्लोबल खान्देश महोत्सवाचे हे ९ वे वर्ष आहे. या पूर्वीचे ८ महोत्सव आपण मनमुराद अनुभवले आहेत. विविध खान्देशी पदार्थांची चव चाखली, खान्देशी उत्पादनांची खरेदी केली. अहिराणी गाणी, नृत्य, संगीत आणि खान्देशी संस्कृतीची ओळख करून घेतली.
तो आनंद अजूनही मना मनात साठवून ठेवला आहे. आता या आनंद मेळाव्याचे महाद्वार उघडून हा खान्देशी खजिना आपल्यासाठी उघडा करीत आहोत.
यात खान्देशी खाद्य संस्कृतीची महाराणी गोड, मखमली, रेशमी सुगंधी खापरावरची पुरणपोळी पुन्हा आपल्यासाठी येत आहे, सोबत ईतर सर्व खान्देशी पदार्थ घेऊन. त्यात, वांग्याचं भरीत, कळण्याची भाकरी, खुडा, फूनके, पापड लोणची आणि ईतर बऱ्याच्या खाद्य पदार्थांचा नजराणा घेऊन येत आहोत. त्याच्या सोबत खान्देशाती भगिनींनी घरी तयार केलेली विविध लोणची, पापड, सांडगी आणि बरेच गृहोद्योगतील पदार्थ. खान्देशातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतीमाला कमी दरात देतो. तर मग बघता काय सामिल व्हा. मौज मजा करा.
आपण खान्देशी असाल आणि आपण काही माल तयार करत असला तर आपल्या मालासाठी खान्देश महोत्सव ही उत्तम बाजार पेठ आहे. आमच्याशी संपर्क साधा आणि आपला माल विक्रीसाठी स्टॉल त्वरित बुक करा. आपल्या या महोत्सवात दर वर्षी या तीन दिवसात तीन लाखाच्या वर ग्राहक भेट देतात आणि साडेतीन कोटी रुपयाच्या वर उलाढाल होते.हा नफा डायरेक्ट गरीब व गरजू शेतकरी, महिला बचतगट यांना मिळतो.
आपण या महोत्सवात उत्तरमहाराष्ट्राती कर्तबगार स्त्री पुरुषांचा खान्देश भूषण पुरस्काराने सन्मान करतो. आता पर्यंत आपण हा पुरस्कार, स्व सिंधुताई सपकाळ, नीलिमा मिश्रा, पोपट पवार, अशोक भाऊ जैन अश्या विवीध मान्यवरांचा या मंचावर बोलावून खान्देश भूषण, खान्देश उद्योगरत्न, खंदेशश्री* पुरस्काराने गौरनवावित केले आहे. खान्देशातील आणि स्थानिक असे राजकीय क्षेत्राती अनेक थोर मान्यवर आमदार, खासदार मंत्री या महोत्सवात सहभागी होऊन आनंद व्यक्त करतात.
सदर बाबतीत काही सूचना सुधारणा असतील त्या आम्ही वेळच्या वेळी आपल्या पर्यंत पोहचवूच. आपणही आपल्या परिचयातील खान्देशी उद्योजक, व्यावसायिक यांच्या पर्यंत हा निरोप पाठवून त्यांना यात सहभागी करून घ्या.
काही शंका समस्या असतील तर खालील क्रमांकावर संपर्क साधा,
1 श्री विकास पाटील 99693 79654
2 श्री ए जी आप्पा पाटील 90824 49843
3 श्री दीपक पाटील 90229 9050
बापूसाहेब हटकर
कार्याध्यक्ष
उत्तरमहाराष्ट्र खान्देश विकास मंडळ.
खान्देशी खाद्य संस्कृती,अस्सल खान्देशी आणि दर्जेदार चविचे पदार्थ
खान्देश स्पेशल
● जळगावचे स्पेशल हिरव्या वांग्याचे भरीत
●खान्देशी झणझणीत तर्रीवाली मिसळ
●झणझणीत ठेचा
●पाटोडी रस्सा
●काळा मसाला वांगी
● कळण्याची भाकरी
● शेव भाजी
●दुध शेव भाजी
●सर्व डाळीच्या पिठाचे थालीपीठ
● चटणी – मसाले
● वरण चिखली
● बाजरीची भाकरी
● ज्वारीची भाकरी
● भाजणीचे थालीपीठ
● खापरावरची पुरणपोळी
●दाल – बाटी
● गुळाची जिलेबी
● गोडशेव
● सांडगे
● घरगुती बनवलेले कुरडाया, पापड
● कळधाण्य, धान्य
वरील सर्व आणि अजून बरच काही
मंग त्यानसाठे या बर समदाजन २ ते ५ मार्च २०२४ रोज दिनमावतले.
2 thoughts on “उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ आयोजित ग्लोबल खान्देश महोत्सव”