खान्देशसाठी भारतीय रेल्वे नाहीच
खान्देशसाठी रेल्वे नाहीच. हां गेल्या 75 वर्षाचा अनुभव आहे. आम्हाला सुरवातीला ब्रिटिशांनी दोन पॅसेन्जर गाड्या दिल्या होत्या. अगदी प्रवाशांची सोय बघून.
एक गाडी छ शिवाजी महाराज टर्मिनस वरुन रात्री सुटायची ती सकाळी भुसावळला पोहचयाची. खान्देशातीळ लोक नांदगाव तें भुसावळ मधील आपापल्या सोयीच्या स्टेशन वर उतरून आपापल्या गावाची st पकडून घरी जात असत. त्याच वेळेत दुसरी गाडी भुसावळ वरुन रात्री सुटून सकाळी मुंबईला पोहचत असे. लोक दिवसभर मुंबईची काम आटोपून रात्री पुन्हा तीच गाडी पकडून गावाकडे निघत असत.
सन 1975 मध्ये शंकरराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मराठवाड्याचा बँकलॉग भरायला सुरवात केली. जायकवाडी, पूर्णा मांजरा ही धरणे बांधून घेतली. मराठवाडा विभागात रेल्वेचे जाळे वीणायला घेतले. हे करत असताना खांदेशात ब्रिटिशांनी ज्या दोन गाड्या दिल्या होत्या त्यातील एक रात्रीची गाडी मराठवाड्यात पळवून नेली. तिला त्यांनी नंदीग्राम एक्सप्रेस नाव दिले. याविरुद्ध खान्देशातील एकही पुढारी चकार शब्द बोलला नाही. या विरुद्ध आम्ही *खान्देश हित संग्राम* तर्फे कल्याण आणि ठाणे स्टेशन बाहेर आंदोलन केलं. त्यातून हळू हळू दोन नव्या गाड्या कानबाई एक्सप्रेस भुसावळ मुंबई आणि गौराई एक्सप्रेस धुळे मुंबई सुरु झाल्या. नंतर त्या लॉक डाऊन मध्ये बंद झाल्या त्या पुन्हा सुरु केल्याचं नाहीत.
पुष्कर एक्सप्रेस मधून भुसावळ तें सुरत या मार्गावर 6 खान्देशी प्रवाशाना गाडीत बसलेल्या लोकांनी धावत्या गाडीतून फेकून दिले. तें जागीच ठार झाले. नगरदेवळा येथून एक पत्रकार जळगाव जायला निघाला त्यालाही असच फेकून दिलं. तोही जागेवर मेला. ताप्ती-गंगा एक्सप्रेस मधून अशीच सहा मुलं अंमळनेर परिसरात फेकून दिली. तीही जाग्यावर मेली. याची कोणतीही प्रतिक्रिया खांदेशात उमटली नाही. आम्ही आमच्या परीने कल्याण मध्ये निषेध व्यक्त केला तेवढाच. बाकी खान्देशी जनता, आमदार खासदार चिडीचूप.
आता धुळे दादर जीं एक्सप्रेश सुरु झाली. ही मागणी घेऊन आम्ही आंदोलन केलं आहे. आम्ही कल्याण मधून जीं खान्देशी रेल्वे आणि पाणी यासाठी जीं आंदोलन केली त्याचे साक्षीदार माजी खासदार ए टी नाना आणि काकासाहेब भोसले हे दोघे आहेत.
*विशेष गंम्मत म्हणजे धुळे दादर गाडीच श्रेय जळगावचे खासदार उन्मेष दादा पाटील स्वतःकडे आणि त्यांचे नेते मा नरेंद्रभाई मोदी आणि रावसाहेब दानवे यांना देतात. आणि त्यांचा पक्ष भाजपला देतात.*
*खा उन्मेषदादा आणि त्यांचे सर्वं दिल्ली मुंबईच्या नेत्यांना आमचं आव्हाहनं आहे, तुमचं खरंच खान्देश वर प्रेम असेल तर. धुळे दादर गाडीचा अनिड वेळापत्रक बदला. ही गाडी दादर आणि धुळे या दोन्ही ठिकाणी सकाळी पोहचेल अशी व्यवस्था करा.*
लोकांच्या गैर सोईचे वेळा पत्रक करायचं त्यामुळे प्रवाशी आपोआप कमी होतील. आणि योग्य तो प्रवाशी कोटा नाही म्हणून गाडी बंद करायची हां खेळ तुम्ही बंद करू शकता का उन्मेष दादा?
मनमाड इंदूर हां जो बऱ्याच वर्षा पासून प्रवाशी मागत आहेत तो लोहमार्ग आता पूर्ण पणे गुंढाळून ठेवला तो तुमचे नेते आणि पक्ष पुन्हा कार्यान्वित करतील का?
असेल हिम्मत तर करून दाखवा. आम्ही तुमची मिरवणूक काढू
भय्यासाहेब यशवंत पाटील अध्यक्ष खान्देश हित संग्राण
Hi, this is a comment.
To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.
Commenter avatars come from Gravatar.