छत्रपती शंभूराजे जयंतीनिमित्त हृद्य सन्मान
छत्रपती शंभूराजे जयंतीनिमित्त नानाभाऊ माळी
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा!त्यांच्या शौर्यापूढे मृत्यूलाही नतमस्तक व्हावे लागले होते!त्यांचं कट्टर मनोधैर्य धर्माचां पाया होता!देह ठेवून धर्म जगवणारे महापराक्रमी राजा छत्रपती शंभूराजे होते!शरीरीक वेदना काय असतात आपल्याला ठेच लागल्यावर कळते!शंभूराजांनी संपूर्ण देह धर्मासाठी अर्पण केला होता!जाज्वल्य धर्मरक्षक राजाचं नाव भारतीय संस्कृती जिवंत राहिलं तोवर राहिलं!
इतिहासातील पानं सात्विक विचारांनी भरलेली दिसतील!शौर्याने भरलेली दिसतील!बलिदानाने भरलेली दिसतील!त्यागाने भरलेली दिसतील!समर्पित भावनेने समर्थनाने भरलेली दिसतील!असा धर्मरक्षक राजा महाराष्ट्रात जन्माला आला!पुणे जिल्ह्यातील पुरंदर या किल्ल्यावर जन्माला आला!शक्ती, युक्ती अन भक्तीचं दान घेऊन जन्माला आले!
दूरदृष्टी असणारा लढवय्या राजा महाराष्ट्र भूमीत जन्माला आला हे आमचं महाभाग्य समजावं!देव, धर्म देशासाठी छातीची ढाल करणारे,नीती, राजनीतीतं पारंगत असणारा लढाऊ राजा लहानपणापासूनचं नेतृत्वगुणांनी पारंगत होते!वाघासारखी प्रचंड ताकद असणारा शूर लढाऊ राजा शेवटच्या श्वासापर्यंत,देहार्पण होईपर्यंत,प्राणाचे बलिदान होईपर्यंत शत्रूच्या मनात दहशत बसविली होती!औरंगजेब सारख्या क्रूरकर्म्यास भयाने ग्रासलं होतं!
धर्मरक्षक राजा!छत्रपती शंभूराजे यांची जयंती काल दिनांक १४मे रोजी होती!वैशाख शुद्ध सप्तमीला होती!पुरंदर किल्यात त्या काळी आनंद महोत्सव साजरा झाला असेल!अनंत दिव्यांच्या उजेडाने पुरंदर किल्ला उजळून निघाला असेल!हत्ती वरून साखर वाटली जात असेल!सर्व कसं शुभ!मंगल!आनंद फुलला असेल!काल शंभूराजांची जयंती होती!

तरवडे वस्ती,महंमदवाडी रोड, हडपसर येथील शतायु जेष्ठ नागरिक संघाचीं मासिक सभा होती!राजांच्या तारखे प्रमाणे जयंती निमित्ताने येथील विघ्नहर्ता कार्यालयात सभेनिमित्त एकत्र आलो होतो!वाढदिवस अन जयंती निमित्त होतं!काही सन्माननीय सदस्यांचे वाढदिवस देखील होता!अध्यक्ष एम एन कोंढाळकर सर अतिशय हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे!
जेष्ठ नागरिक संघासाठी नेहमीचं नवनवीन कल्पना घेऊन कृतीतून राबवत असतात!अनेक सहली, यात्रा काढून संघाच्या सदस्यांना अमृत वाटीत असतात!सर्वांच्या कलागुणांना वाव देत असतात!संधी देत असतात!…आज निमित्त होतं मासिक सभेचं!…
आम्ही ०१एप्रिल ते ०४ एप्रिल २०२४ पर्यंत देवदर्शन यात्रेला गेलो होतो!तीन दिवस वेगवेगळ्या घरातील व्यक्ती जणू रक्ताच्या नात्यासारखी एकमेकात एकजीव झाली होती!निमित्त यात्रेचं होतं!माणसं जोडणे,तणावमुक्त जीवन जगण्यासाठी सतत प्रयोग करीत राहणाऱ्या आदरणीय कोंढाळकर सरांनी काल शंभूराजे यांच्या जयंती निमित्त सर्व स्नेहीजन अन हृदयातल्या महापुरुषांसमोर माझाही सन्मान घडवून आणला!जेष्ठांच्या हस्ते सन्मान होणे म्हणजे त्यांच्या नजरेत काहीतरी चांगलं दिसलं आसवं!…
…आम्ही यात्रा केली होती!देवदर्शन केलं होतं!आत्मिक सुख घेऊन, देव हृदयात घेऊन,आमच्या घरी आलो होतो!घरचे देखील प्रसन्न होते!यात्रेने आमचं आयुष्य काही वर्षांनी वाढलं आसवं असं वाटू लागलं!सात्विक गूण आमच्या हृदयी घेऊन आलो होतो!… केलेल्या यात्रेचं फलीत म्हणजे काही अंशी आमच्यातला स्वार्थ, लोभी, मतलबी स्वभाव सैल झाला होता!आज सभेचं आयोजन होतं!त्यांत सन्माननीयांनी माझाही गौरव केला!आम्ही ज्या ज्या गावाला देवदर्शनाला गेलो!त्यांविषयी माहितीपूर्ण लेख लिहिण्याचं भाग्य मिळालं ही सुवर्णसंधी मिळाली होती!लेख अध्यात्माच्या मार्गांवरील सेतू झाले होते!… म्हणून आदरणीयांनी शाल श्रीफळ देऊन सन्मान केला होता!
छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीदिनी सन्मान झाला!मी वंदन आयोजकांनां!मी नतमस्तक होतो धर्मरक्षक छत्रपतीनां!.. मी आभार मानतो गुरवार्यांचे!मी ऋणात राहतो!शतायु संघांचे!आदरणीय कोंढाळकर भाऊ!आदरणीय जगताप दादा,आदरणीय लोंढे आण्णा!आदरणीय जाधव दादा माऊली!आण्णासाहेब वाडकर!श्री कुंभार सरांचे!सर्व जेष्ठ बंधू आणि भगिनीं!आपणा सर्वाना नतमस्तक होत प्रणाम!आपला जिव्हाळा आणि प्रेमामुळे थोडंफार लिहू शकलो!सख्या नातेवाईकांपेक्षाही अधिक जीव लावला आपण!मला जवळचे समजले!एका लहान व्यक्तीचा सन्मान केलातं !गौरव केलातं!आपल्या सन्मानाने मी अतिशय आनंदून गेलो आहे!भारावून गेलो आहे!ऋणात राहून थांबतो!
… नानाभाऊ माळी
हडपसर,पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१५ मे २०२४
