Table of Contents
महाराष्ट्रातून राज्यसभेवर नुकत्याचं 6 जागा भरल्या त्यात खान्देशातून किती लोक घेतले?
भारतीय लोकप्रतिनिधीचीं दोन सभगृह आहेत. पहिले लोकसंभा यात 543 सदस्य असतात. हे सभागृह अस्थाई असतें. यातील सदस्य 5 वर्षांसाठी निवडून दिले जातात. ही मुदत संपली कीं, लोकसभेतील सर्वं सदस्य विसर्जित केले जातात आणि नव्याने निवडणूका घेऊन नवे सदस्य घेतले जातात. कधी कधी काही विशिष्ट परिस्थितीत राष्ट्रपती पाच वर्ष पूर्ण व्हायच्या आत सुद्धा लोकसभा विसर्जित करून नव्याने निवडणूका घेतात. त्या नंतर नवी लोकसभा अस्तित्वात येते.
तर राज्यसभा हे स्थाई सभागृह असतें. ही कधिचं विसर्जित होतं नाही. मात्र दरवर्षी या सभागृहातील एक तृतीअंश सदस्य त्यांची सदस्यता मुदत संपल्यामुळे निवृत्त होतात. म्हणून मग त्यांच्या जागी निवडणूकां घेऊन नवे सदस्य घेतले जातात. अशा वेळी दोनत्रितीअंश सदस्य कार्यरत असतात. राज्यसभेचे सदस्य राज्यातील आमदार निवडून देतात. हे निवडून दिलेले एकूण सदस्य 233 असतात. तर 12 सदस्य राष्ट्रपती नियुक्त असतात. त्यात, साहित्यिक, कालाकार, खेळाडू, तज्ज्ञ मंडळी असावी असा संकेत आहे. असे एकूण 245 सदस्य असतात. यातील प्रत्येक सदस्यांची मुदत ही 6 वर्ष असतें. यांना दरवर्षी 5 कोटी रुपये निधी, लोक कल्याणासाठी दिला जातो.
महाराष्ट्रातून राज्यसभेवर नुकत्याचं 6 जागा भरल्या
महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर एका वेळी महाराष्ट्राचे 24 खासदार राज्यसभेत असतात. म्हणजे दोन लोकांसभा क्षेत्राला एक राज्यसभा सदस्य असा हिशोब ठरतो. खांदेशात एकूण 6 लोकसभा आहेत. म्हणजे आपल्या खान्देशला एकावेळी 3 राज्यसभा सदस्य पद मिळायला हवीत.
खान्देशच्या वाट्याला एकूण 37 खासदार मिळायला हवे
देशाला स्वराज्य मिळून 75 वर्ष झाली. या 75 वर्षात खान्देशच्या वाट्याला एकूण 37 खासदार मिळायला हवे होते. पण परिस्थिती कांय आहे? माझ्या माहिती प्रमाणे खांदेशाच्या वाट्याला आता पर्यंत फक्त 3 राज्यसभा सदस्य मिळाले. प्रतिभाताई पाटील, शिवाजी गिरधर पाटील आणि ईश्वरलाल जैन. समजा माझ्या माहितीतून एक दोन खासदार सुटले असतील तरी 37 पैकी फक्त 5 खासदार आपल्या मिळाले आहेत. आपल्या हिंस्याचे उर्वरित 32 खासदार इतरत्र वळविले. काही राजकीय अपरिहार्यता आणि राजकारनातील बलदंड नेतें यांनी 7 जागा हिसकावून घेतल्या त्या त्यांना देऊन टाकू. तरी 25 खासदारक्या खान्देश बाहेर गेल्या. एका खासदाराला 6 वर्षात 30 कोटी निधी मिळतो. या हिशोबाने 25 खासदारांचा 750 कोटी रुपये विकास निधी जो खान्देशी लोकांच्या मालकीचा होता तो खान्देश बाहेर गेला. हां केवढा मोठा अन्याय आहे? हे खान्देश सहन कसा करतो?
आता नुकत्याच महाराष्ट्रातून 6 जागा लोकांसभेवर घेतल्या
1 मुंबई कोकणातून मिलिंद देवरा, चंद्रकांत हंडोरे.
2 पं महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी
3 मराठवाडा अशोक चव्हाण, डॉ अजित गोपचिडे
4 विदर्भ प्रफुल्ल पटेल.
5 खान्देश शून्य.
खान्देशनें असा कांय गुन्हा केला आहे कीं, प्रत्येक वेळी सत्ता वाटपात हिस्सा देत नाहीत
वरील खासदारांचा पक्षनिहाय विचार केला तर अशोक चव्हाण, मिलिंद देवरा आणि चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेसचे तीन लोक आहेत. भाजपचे मेधा कुलकर्णी आणि डॉ अजित गोपाचिडे हे दोघेच योग्य आहेत. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल योग्य आहेत. चंद्रकांत हंडोरेही काँग्रेसचे योग्य आहेत. पण अशोक चव्हाण आणि मिलिंद देवरा हे तर काल पर्यंत काँग्रेस मध्ये होते. त्या दोन नेत्याना खासदारकी दिली. नीट विचार केला तर काँग्रेसचेच सर्वात जास्त खासदार आहेत. अशोक चव्हाण काँग्रेसच्या घोड्या वरून थेट भाजपच्या घोड्यावर आणि मिलिंद देवरा हे ही काँग्रेसच्या घोड्यावरुन थेट शिवसेना शिंदे गटाच्या घोड्यावर जाऊन बसले. अरे यांना थोडं तरी पायी चालू द्या नां. थोडं पक्षाचे काम करू द्यानां जे आधी मरमर करून भाजप सेनेत काम करत होते त्यांना आधी द्या नां!
खान्देशनें सुरवाती पासून भाजप सेनेला निवडून दिलं आहे. हे बाकींचे तर सत्ता आल्यावर तुमच्या कडे आले. तुम्ही शून्य असल्या पासून खान्देश तुमच्या सोबत आहे आणि आज तुम्हीच खान्देशला शून्य करून टाकले.
आम्ही महायुतीलां दिलेले खासदार बघा, नंदुरबार-हिना गावीत भाजप, धुळे-डॉ सुभाष भामरे भाजप, रावेर-रक्षा खडसे भाजप, जळगाव-उन्मेष पाटील भाजप, दिंडोरी-डॉ भारती पवार भाजप, नाशिक-हेमंत गोडसे शिवसेना शिंदे गट. खांदेशात आम्ही महाआघाडी औषधला सुद्धा ठेवली नाही. ठाणे, पुणे, संभाजीनगर, सुरत वापी. जिथे खान्देशी स्थलांतरीत मतदार खूप आहेत तिथं ही आमच्या लोकांनी महायुतीला मतदान केलं. मग आमच्याच लोकांना सत्ते बाहेर का ठेवता? हां माझा सवाल आहे.
खान्देशचा वाटा पळवून नेता तुम्हाला लाज वाटत नाही
प्रत्येक वेळी सत्ता वाटपात खान्देशचा वाटा पळवून नेता तुम्हाला लाज वाटत नाही आणि आम्हाला राग येत नाही. नांदेड जिल्ह्यातून एकाच वेळी दोन खासदार घेतले. अशोक चव्हाण आणि अजित गोपचिडे अरे मग आम्हाला एक तरी द्याना भाऊ!
शिरपूराचे बबन चौधरी यांनी संपूर्ण आयुष्य भाजपलां दिले. तें धुळे जिल्हा भाजप अध्यक्ष आहेत. त्यांना खासदार का केले नाही? दत्तू आण्णाचे कुटुंबीय, व्यकट आण्णाचा परिवार यांना का खासदारकी नाही?
विधान परिषदेत खान्देशी आमदार
विधान परिषदेत सुद्धा हेच आहे. विधानपरिषदेत 78 आमदार असतात. त्यात 12 राज्यपालं नियुक्त असतात तर बाकीचे, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थातून निवडून येतात. स्थानिक स्वराज्यातून निवडून आलेले तेवढेच खान्देशी आमदार असतात. ईतर तें ज्यांची निवड आमदार मतदान करून करतात, त्यात एकही खान्देशी व्यक्ती नसते. राज्यपालं नियुक्त जे 12 आमंदारा असतात त्यापैकी एकही खान्देशी नसतो.
सत्ता वाटपात, धनगर, माळी, तेली, मुस्लिम, दलित यांना मंत्री मंडळात, विधानपरिषदेत, राज्यसभेवर प्रतिनिधित्व देतात. 75 वर्ष हे वाटप सुरु आहे. त्यांच्यात वरील जातीतून एकही खान्देशी माणूस घेतला गेला नाही. चाळीसगावचे दलित आमदार डी डी चव्हाण हे फक्त एकदा, एक दीड वर्ष राज्यमंत्री होते. आदिवाशी मंत्री असतात त्याचं कारण आदिवाशिंची संख्या खांदेशात जास्त आहे.
खान्देशला मुख्यमंत्री पद नाही,
आपल्या हिस्याचे राज्यसभा, विधानपरिषद सदस्यत्व नाही. म्हणून निधी नाही, विकास नाही, औद्योगिकरण नाही. जलसिंचन नाही. त्यामुळे खान्देशातून प्रचंड प्रमाणात लोक स्थलांतर करत, गुजराथ, मुंबई पुण्यात जातं आहेत. त्यामुळे, खान्देशातील, शहादा-दोंडाईचा, यावलं, पारोळा हे तीन विधानसभा मतदारसंघ रद्द झाले आहेत.
खान्देश वाचवायचा असेल तर बंड करा उठाव करा. आपण अहिरलोक जगात 2 कोटीच्या वर आहोत. जम्मू काश्मीर, उत्तरांखंड, गोवा, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम, सिक्कीम या राज्यापेक्षा आणि सर्वं केंद्र शासित प्रदेशापेक्षा अहिर खान्देश मोठा आहे. खान्देश आणि 36गड हे लोकसंखेच्या बाबतीत सारखे आहेत.
खूप मोठी ताकत आहे खान्देश. आपल्या हक्कासाठी लढा आणि आपलं जे जे तें तें सर्वं मिळावा.
खूप मोठी ताकत आहे खान्देश आपल्या हक्कासाठी लढा
खान्देशकीं सोच पगले मुसीबत आनेवाली हैं!
तेरी बरबादीके मसवरे हैं जहाँमे!
नां समझोगे तो मीट जाओगे खान्देशीयो,
तुम्हारी दास्ता तक नही होगी दास्तानोमे!
खान्देशी कलावंत दिनेश चव्हाण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
सातवे अहिराणी साहित्य संमेलन अध्यक्ष ओळख
6 thoughts on “राज्यसभेवर खान्देशातून किती लोक घेतले?”