राष्ट्रीय मायक्रोबायोलिम्पियाड  स्पर्धेत मू.जे. महाविद्यालयाची चौथ्या क्रमांकावर निवड

स्पर्धेत मू.जे. महाविद्यालयाची चौथ्या क्रमांकावर निवड

जळगाव येथील मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील मायक्रोबायोलिम्पियाड स्पर्धेत निवड झाली आहे. सदर स्पर्धा गेल्या बाविस वर्षापासुन सातत्याने राबविली जात आहे. ह्या स्पर्धेचे आयोजन शासकीय विज्ञान संस्था,छ.संभाजीनगर यांच्याद्वारे राष्ट्रीय पातळीवर केले जाते.

ही स्पर्धा दोन स्तरावर घेतली जाते. पहिल्या स्तरात देशभरातून हजारो विद्यार्थी मायक्रोबायोलाॅजीकल क्वीझ काॅनटेस्ट मध्ये सहभागी होतात. त्यांच्यापैकी प्रत्येक काॅलेजच्या प्रथम तीन विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी काढुन देशभरातून केवळ दहा महाविद्यालयांची निवड अंतीम फेरीसाठी केली जाते. ह्या वर्ष्याची प्रथम फेरी 17 जानेवारीला पूर्ण झाली आणि त्यात तृतीय वर्ष विज्ञान सूक्ष्मजीवशास्त्र या गटात मू.जे.महाविद्यालयातील कु.किरण अविनाश पाटील, चि.श्रेयश किशोर मोरे व चि. धनंजय राजेंद्र अकोलकर यांची निवड टाॅप टेन महाविद्यालयांमध्ये चौथ्या क्रमांकावर झाली.

सदर चा संघ दि.10 फेब्रुवारीला अंतीम फेरीत सहभागी होणार आहे. विद्यार्थ्याच्या यशासाठी विभागप्रमुख प्रा.केतन नारखेडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि अंतीम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालय स्तरावर स्पर्धेचे समन्वयक म्हणुन राजेश सगळगिळे व प्रसाद निकुमे यांनी काम केले.

2 thoughts on “राष्ट्रीय मायक्रोबायोलिम्पियाड  स्पर्धेत मू.जे. महाविद्यालयाची चौथ्या क्रमांकावर निवड”

Leave a Comment