अपक्ष उमेदवार सौ. गीतांजलीताई कोळी यांचा झंझावाती प्रचार
अपक्ष उमेदवार सौ. गीतांजलीताई कोळी यांचा झंझावाती प्रचार दौरा
शिरपूर मतदारसंघातील गावागावांत अपक्ष उमेदवारांची भेट
शिरपूर 09 राखीव विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र 2024 विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या सौ. गीतांजलीताई कोळी यांनी आपल्या प्रचार दौऱ्याला वेग दिला आहे. बँट चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या गीतांजलीताई यांनी खेडोपाडी जाऊन कष्टकरी, आदिवासी बांधव तसेच महिलांशी संवाद साधला आणि त्यांचा पाठिंबा मिळवला आहे.
सुळे गावातील बॅट तयार करणाऱ्या आदिवासी बांधवांना भेट
14 नोव्हेंबर रोजी सौ. गीतांजलीताई कोळी यांनी सुळे गावातील बॅट बनवणाऱ्या आदिवासी बांधवांची भेट घेतली. स्थानिक आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेत, त्यांनी आपल्या प्रचार मोहिमेला सामाजिक आणि आर्थिक विकासाचा रंग दिला. त्याचप्रमाणे टोकरे कोळी वस्तीतील महिलांनीदेखील गीतांजलीताई यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
शिरपूरमध्ये जेष्ठ साहित्यिकांना भेट देऊन प्रचाराचा शुभारंभ
गीतांजलीताईंनी शिरपूर येथे जेष्ठ आहिराणी साहित्यिक मा. श्री. सुभाष नाना आहिरे यांना भेट देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांनी निवडणुकीतील प्रचाराचा शुभारंभ विठोबा मंदिरात दर्शन घेऊन केला. आपल्या प्रचारात गीतांजलीताईंनी व्यसनमुक्त समाज, सर्वधर्मभाव, युवकांच्या प्रश्नांची सोडवणूक यासारख्या मुद्द्यांवर भर दिला आहे.
गीतांजलीताईंचा कडकडीत दौरा – प्रत्येक गावातील नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद
शिरपूर मतदारसंघातील उपरपिंड, टेंभे, टेकवाडे, चांदपुरी, जातोडे, भरवाडे अशा गावांमध्ये गीतांजलीताई आपल्या समर्थकांसह कष्टकरी आणि आदिवासी बांधवांना भेटत आहेत. त्यांच्या भेटीत विविध समाजातील नागरिक त्यांना मोठा प्रतिसाद देत आहेत. प्रचारात सामील होण्यासाठी अनेक समर्थक, कुटुंबीय आणि स्थानिक नागरिक देखील आपल्या कामांपासून एक दिवसाचा वेळ काढून गीतांजलीताईंना साथ देत आहेत.
दारोदारी प्रचार दौरा तापी नदीच्या किनारी गावांतून सुरू
सौ. गीतांजलीताईंनी तापी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या जुने अतुंर्ली गावात दारोदारी फिरून आपला प्रचार सुरू केला. गोरगरीब, कष्टकरी, दलित व आदिवासी बांधवांच्या समस्यांची जाण ठेवून त्यांना दिलासा देण्यासाठी गीतांजलीताईंनी आपला प्रचार मोहिमेचा प्रारंभ केला आहे. या दौऱ्याला उपस्थित नागरिकांनी आपला कौल आणि विश्वास दिला आहे.
मुख्य मुद्दे – रोजगार, समाजसेवा आणि युवकांचे प्रश्न सोडवण्यावर भर
अपक्ष उमेदवार म्हणून लढत असलेल्या गीतांजलीताई कोळी यांनी आपल्या प्रचारात रोजगार, गोरगरीबांची सेवा, सर्वधर्मभावाचे मूल्य आणि युवकांच्या प्रश्नांना सोडवण्याचे उद्दिष्ट मांडले आहे. त्यांचा प्रचार दौरा संपूर्ण शिरपूर मतदारसंघात उर्जेने सुरू आहे.