जगभरात फेसबुक इन्टाग्राम लाॅग आऊट का झाले ?
फेसबुक इन्टाग्राम लाॅग आऊट
05 मार्च 24 रोजी रात्री साडेनऊ वाजेपासून रात्री बारापर्यंत जगभरात फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट सेशन आऊट म्हणून प्रत्येकाला हा ऐरर मेसेज येत होता. प्रथमदर्शनी असे वाटले की; व्यक्तिगत फेसबुक आणि instagram एप्लीकेशन मध्ये अडचण असेल, पण नंतर एकमेकांना संपर्क साधल्यास असे कळाले की; फेसबुक आणि instagram अकाउंट लॉगिन आऊट ही समस्या पूर्ण जगभरात आलेली आहे. त्यानंतर लोकांना थोडासा दिलासा मिळाला.
परत लॉगिन करता आले
रात्री 11: 55 मिनिटांच्या दरम्यान ही अडचण सुटली आणि फेसबुक इंस्टाग्राम वापर करताना त्यांच्या अकाउंट मध्ये परत लॉगिन करता आले. त्यानंतर फेसबुक वर एकच धूम उडाली लोकांनी फेसबुक मध्ये पोस्ट केली का तुमचे अकाउंट लॉग आऊट झाले? का तुमचे फेसबुक हेक झाले का? तुमचे इंस्टाग्राम हॅक झाले? आणि मग लाखो कमेंट्स येऊ लागल्या.जवळपास सगळ्याच लोकांनी सांगितलं की माझंही अकाउंट लॉग आऊट झालं होतं. पण एक दीड घंटा नंतर परत मी लॉगिन करू शकलो.

फेसबुक आणि Instagram ची मदर कंपनी मेटा
फेसबुक आणि instagram ची मदर कंपनी मेटा यांनी अधिकृतरित्या त्यांच्या Meta वेबसाईटवर या समस्येबद्दल काहीही माहिती दिलेली नाही. त्यांच्याप्रमाणे फेसबुक आणि इंस्टाग्राम मध्ये काहीही अडचण आली न होती. मात्र हे तेवढेच खरं आहे की जगभरात इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट मधून लॉग आऊट झाले होते.

यापूर्वीही instagram आणि धुळ्यातील महासंस्कृती मोहत्सव भाग दुसरा 2होते
यापूर्वीही instagram आणि फेसबुक मधुन बरेच युझर लाॅग आऊट झाले होते. त्यावेळेस मेटा कंपनीने ही गोष्ट अधिकृतपणे स्वीकार केली होती, की तांत्रिक अडचणीमुळे लोकांना लॉगिन करताना अडचण आल्या आहेत. मात्र यावेळेस मेटा कंपनीने कोणतीही अडचण नाही असे अधिकृत सांगितलेले आहे.
तांत्रिक अडचण काहीही असो मात्र दोन घंट्यात बऱ्याचशा फेसबुक आणि instagram वापर करताना असे वाटले की;त्यांचे व्यक्तिगत अकाउंट हे हॅक झालेलं आहे. मात्र दोन घंटा नंतर त्यांना दिलासा मिळाला आणि ते त्यांच्या अकाउंट मध्ये परत लॉगिन करू शकले.