डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर


निमगूळ, दि. २९ (प्रतिनिधी)- निमगूळ येथील कवी आणि लेखक डॉ. जितेंद्र देसले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या सन्मानाचा सोहळा ७ व ८ नोव्हेंबर रोजी दुबई येथे होणाऱ्या ४ थ्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनात होणार आहे.

डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर 2



जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा गौरव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ, मिलिंद महाविद्यालय (छत्रपती संभाजीनगर) आणि सांगली येथील दीपस्तंभ सांस्कृतिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येतो. डॉ. जितेंद्र देसले यांची साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.


साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान

डॉ. जितेंद्र देसले यांनी ग्रामोन्नतीचा राजमार्ग या शीर्षकाने पुस्तक लिहिले असून, त्यांच्या कवितांना आणि लेखांना दैनिक आपला महाराष्ट्रसारख्या वृत्तपत्रांमध्ये स्थान मिळाले आहे. याशिवाय त्यांनी अनेक कविसंमेलनांमध्ये सहभाग घेतला असून, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्येही त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. विशेषतः दारूमुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचे सक्रिय योगदान आहे.

डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर
डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर



आधी मिळालेल्या सन्मानांची यादी

डॉ. जितेंद्र देसले यांना आधीच अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, त्यात खालील पुरस्कारांचा समावेश आहे:

खान्देश रत्न पुरस्कार – खान्देश अहिराणी कस्तुरी मंच, पुणे
निमगुळ भूषण पुरस्कार – निमगुळ ग्रामस्थ
वीर शंभू छत्रपती गुणगौरव पुरस्कार- खानदेश साहित्य संघ
विशेष कार्य गौरव पुरस्कार – विरांगणा झलकारी कोळी स्त्री शक्ती सामाजिक संस्था, धुळे
जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार– अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन प्रबोधन समिती, मालेगाव
महाकवी कालिदास साहित्य सन्मान पुरस्कार – जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद
राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार – अन्याय अत्याचार निर्मूलन समिती, नाशिक
डॉ. दा.गो. बोरसे पुरस्कार – उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ
बळीराजा भूषण राज्यस्तरीय पुरस्कार – बळीराजा आत्मसन्मान सेवा संघ, महाराष्ट्र राज्य

डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर



मान्यवरांचे अभिनंदन

या विशेष आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल निमगुळमधील विविध मान्यवरांनी डॉ. जितेंद्र देसले यांचे अभिनंदन केले आहे. मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान, अहिराणी कस्तुरी मंचच्या अध्यक्षा विजया मानमोडे, दारूमुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अध्यक्षा गीतांजली कोळी यांच्यासह कैलास पाटील, किशोर बागल, दिलीप भामरे आदींनी त्यांचे कौतुक केले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरचा गौरव

डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेला हा सन्मान निमगुळ आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.

डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर