राम नाम सत्य आहे
अधराचा उंबरठा, रामनाम ओलांडतो
श्रवणाने चिंतनाने भक्तीभाव ओसंडतो llधृll
राम दर्शनाने लाभे, सुख शांति समाधान
हरे राम आळविता हरपते देहभान
दुःख आत्मक्शेषासवे, वनवास आठवतो ll१ll
दोन शब्दात साठली, अलौकिक बुद्धिमत्ता
जग आजही गिरवी, राम नामाचाच कित्ता
सार रामाच्या नामाचा, सान थोराआना कळतो !!२ll
मात-पिता मानी श्रेष्ठ, जपी बंधूभाव राम
साधू-संत मुनीजन, त्यांच्या ठायी चारी धाम
दिशादिशातून ध्वनि, राम नामाचा घुमतो ll३ll
मनी भाव विनयाचा, नाही गर्व अभिमान
सूर्यवंशी प्रभूराम, सोडीचना स्वाभिमान
बाणा रामाचा करारी, अंतरंगी संचरतो ll४ll
जात-पात प्राणीजात, सारे मानले समान
बंधू लक्ष्मणासमान, रामभक्त हनुमान
लंका करुनी दहन, हाहाःकार माजवितो ll५ll
एकपत्नीव्रती तसा, राम सालस दयाळू
भिल्ल, गिद्द, वानरांचा, पाठीराखा कणवाळू
उष्टी बोरे शबरीची मान सन्माने चाखतो ll६ll
वधुनिया रावणाला, बंधमुक्त केली सीता
न्यायप्रिय बिभिषण, त्यास सोपविली सत्ता ll७ll
राम सत्याचा पुजारी, खरा धर्मपरायण
चित्त ठेवाया प्रसन्न, नित्य वाचा रामायण
लव-कुशाला बघून, राम राजा धन्य होतो ll८ll
जन्म मरणाचा फेरा, नाही चुकला कुणाला
राम नाम सत्य आहे, तथ्य कळते जगाला
मरा मरा बोलतना, राम जिभेवरी येतो ll९ll
शिवाजी साळुंके,’किरण’
चाळीसगाव, जि.जळगाव.
