उत्तर महाराष्ट्र जल परिषद संपन्न
कासोदा ता.एरंडोल जि.जळगाव येथे दिनांक 28/12/2023 रोजी शेतकरी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत जल परिषद संपन्न
याप्रसंगी ॲड. दिपक पाटील (सचिव – उत्तर महाराष्ट्र जल परिषद ) यांनी उत्तर महाराष्ट्रातील प्रलंबित प्रकल्प (पाडळसरे,नारपार, बुराई तापी,गिरणा, हतपनुर)नदीजोड प्रकल्प, बॅरेजस् बलून बंधारे, किटीवेअर,नदी नाला खोलीकरण ई.विषयांवर माहिती दिली या हक्काच्या पाण्याचा लढा पुढे नेण्यासाठी एकत्र येऊन आंदोलन करण्यासाठी आवाहन केले
तसेच
अभिमन हाटकर ( तालुका प्रमुख महाराष्ट्र शेतकरी संघटना ),
ईश्वर चिंधा पाटील ( उपसरपंच गाळण),
श्री मनोहर पाटील ( अध्यक्ष, हरी विठ्ठल पाणी वापर ),
सूर्यकांत पाटील ( गौरव ड्रीप इरिगेशन),
डॉ. संभाजीराजे पाटील ( संभाजी राजे पाटील आर. फाऊंडेशन ), इत्यादी मान्यवरांनी जल जीवन, आणि पाण्याचे महत्त्व या विषयी मार्गदर्शन केले तसेच जल परिषद साठी खालील मान्यवरांनी हजेरी लावली.
या कार्यक्रम प्रसंगी उत्तर महाराष्ट्र जल तर्फे सचिव ॲड. दिपक बोरसे पाटील यांनी श्री. अभिमन हाटकर यांना उत्तर महाराष्ट्र जल परिषद भडगाव तालुका अध्यक्ष आणि श्री.ईश्वर पाटील यांना एरंडोल तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती पत्र देऊन सन्मानित केले.
धनराज चौधरी साहेब, ( जनरल मॅनेजर, साईराम प्लास्टिक व इरिगेशन रावेर),संजय पूनतकर ( एरिया मॅनेजर साईराम प्लास्टिक व इरिगेशन रावेर), पंकज सपकाळे (सेल्स इंजिनीयर, साईराम प्लास्टिक व इरिगेशन रावेर), यशवंतराव पाटील ( गुणवंत आबा )हणमंतखेडे सिम,ईश्वर माधवराव पाटील ( तालुका अध्यक्ष पतंजली समती ),ईश्वर पाटील उमरे,भाऊसाहेब पाटील उमरे,विजय राठोड ( सरपंच आनंदनगर),नाना पाटील ( वनकोठे),राहुल पाटील ( सोनबर्डी),रविंद्र रघुनाथ पाटील (सोनबर्डी) सुभाष पाटील (तळई) पिंटू पाटील ( तळई) भटु पाटील, (हणमंतखेडे ) अशोक विरभान ( कासोदा) विशाल पाटील (गौरव गृप) सुरेश पाटील (गौरव गृप)अनिल सोनवणे (गौरव गृप)सुनिल खैरनार (गौरव गृप)श्याम पाटील (गौरव गृप)राम पाटील (गौरव गृप)शशिकांत गायकवाड (गौरव गृप)गोपाल पाटील (गौरव गृप)विजय नवाल (गौरव गृप)अजय नवाल (गौरव गृप)
श्री सूर्यकांत पाटील(संचालक गौरव द्रीप इरिगेशचे ) यांनी कार्यक्रमाचे खूपच छान आयोजन केले त्यांचे मनापासून आभार.
