छत्रपती संभाजीनगरमध्ये श्री श्रृंगेरी देवी राज्यस्तरीय काव्योत्सव
सौजन्य महाराष्ट्र साहित्य वर्पण वृत्तसंस्था छ.संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर प्रतिष्ठान संचलित शब्दस्वरुप साहित्य मंच ब्रह्मगांव या सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून स्व. कौशल्याबाई भालेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्य
श्री.श्रृंगेरी देबी पवन राज्यस्तरीय काव्योत्सवाचे आयोजन रविवारी ७ जानेवारी, २०२४ रोजी सकाळी ९:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले.
याविषयी सविस्तर वृत्त असे की.. गेल्या तीन वर्षांपासून सौ. पूजा राजेश घोंगडे यांच्या संकल्पनेतुन शब्दस्वरूप साहित्य मंचाच्या वतीने श्री. श्रृंगेरी देवी राज्यस्तरीय काव्योत्सवाचे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात येते सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री श्रृंगेरी देवी राज्यस्तरीय काव्योत्सवाचे मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ कवयित्री डॉ. शैलजा करोडे भूषविणार असुन उद्घाटक ज्येष्ठ साहित्यीक चंद्रकांतदादा वानखेडे असतील.
कवी महादेव,लांडगे, कवी ज्ञानेश्वर शिंदे कवी ,डॉ. सुनील पवार, कवियत्री सुनिता कावसनकर, कवी मा. पोपट श्रीराम काळे पुणे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
तरी जास्तीत जास्त कवी कवयित्रीनी काव्योत्सवात सहभाग नोंदवावा असे आवाहन कवयित्री सौ.पूजा घोंगडे यांनी केले.
तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शब्दस्वरुप साहित्य मंच संचालक मंडळपरिवार विशेष परिश्रम घेत आहे.