मुलांना अहिराणी शिकवा इंग्रजीनंतर शिकता येइल अलीचे डेफ्लोरियान यांचे आवाहन
Khandeshi Aaji Alice Deflorian
शहरातील सहाव्या अखिल थाटात उद्घाटन झाले. यावेळी इटली येथून आलेल्या बोलीभाषा अभ्यासक अलीचे डेफ्लोरियान यांनी लक्ष वेधले
इंग्रजी भाषा नंतरही शिकता येते पण बोलीभाषा जिवंत राहणे आवश्यक आहे त्यामुळे आपल्या पाल्यांना मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण देणे आवश्यक असल्याचे तिने सांगितले.
अलीचे या जर्मनी येथील विद्यापीठाच्या विद्यार्थिनी आहेत
अहिराणी बोलीभाषांचा अभ्यास करण्यासाठी ती खान्देशात आले होती. विद्यापीठातील अभ्यासासाठी त्यांनी ‘अहिराणी’ या बोलीभाषेची निवड केली आहे.भारतात दाखल झाल्यानंतर तीन महिन्यांतच त्यांनी हिंदी भाषा शिकून घेतली आहे.
जर्मनी येथील विद्यापीठातील प्राध्यापक निता धरमपाल यांनी त्यांना अहिराणी भाषेचाबत सर्वप्रथम माहिती दिली व त्यामुळे अभ्यासासाठी अहिराणीची निवड केली. अहिराणी भाषेतील संगीत हृदयाला भिडणारे असल्याचे त्या सांगतात.
अहिराणीतील ‘तुना प्यार मा पागल व्हयनाये‘ हे त्यांचे आवडते गाणे आहे. इंग्रजीच्या वाढत्या प्रसारामुळे ग्रामीण भाषा वाचवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यासाठी मूलांना अहिराणी भाषा शिकवा, नंतर त्यांना इंग्रजीही शिकता येईल, असे मत अलीचे यांनी मांडले.
मी इटलीनीशे पण तुम्हना अहिराणीवर प्रेम करस
अहिराणी संमेलनाच्या उद्द्घाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून इटली येथील अलीचे डिप्लोरियान या खान्देश साहित्य-संस्कृतीच्या अभ्यासक उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात अहिराणीतून करताच संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी राम राम मंडई! मजा मा शेत का सगळा? मी इटलौनीरो, पण तुम्हना अहिराणीवर प्रेम करस… अशी करून त्यांनी अहिराणी भाषेतच परिचय करून दिला. यावेळी त्यांनी सांगितले की, अहिराणी बोलणाऱ्यांची संख्या कमी होत आहे, त्यामुळे अहिराणी साहित्याचे लिखाण वाढले पाहिजे व अहिराणीचे महत्त्व वाढवण्यासाठीही प्रयत्न केले गेले पाहिजेत.
अलीचे डेफ्लोरियान खान्देशी आजी बरोबर गप्पा गोष्टी