धुळे जिल्ह्यात पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सव भाग पहिला


    धुळ्यातील महासंस्कृती मोहत्सव!


भाग पहिला धुळे जिल्ह्यात पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सव


महासंस्कृती मोहात्सव म्हणजे कांय?


         महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात तसेच जिल्ह्यात स्थानिक पातळीवर काही लोककला आहेत. हे लोक हजारो वर्ष लोकांचे मनोरंजन करीत आहेत. त्यांनी मिळेल ती बिदागी घेऊनं लोकरंजन केले आहे. बऱ्याचदा या लोकांनी भाजी भाकरी वर सुद्धा कार्यक्रम करून लोकांचे मनोरंजन केले आहे. प्रसंगी अर्ध पोटी राहून या लोकांनी ती कला जोपासली आहे, टिकविली आहे. नंतर नाटक, सिनेमा आणि दूरदर्शन मालिका मानोरंजनाच्या क्षेत्रात आल्यावर या लोककला अडगळीत गेल्या.

त्यांची पार वाताहत झाली.  काही बंद पडल्या. त्या वाचविण्यासाठी सरकारनें एक अभिनव उपक्रम जाहीर केला. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला सरकारनें भरभक्कम निधी दिला. किती निधी दिला तो अधिकृत आकडा माझ्याकडे नाही. पण लोकांत अनेक चर्चा आहेत. कोणी दोन कोटी रुपये सांगत तर कोणी एक कोटी 75 लाख रुपये सांगतं. या निधी बरोबरच 5 दिवस मोहत्सव करावा अशा सूचनाही दिल्या असाव्यात. पण त्यात नेमकं कांय सादर करावं याच्या सूचना दिल्या नाहीत. धुळ्यातील मोहत्सव 5 दिवसांचा आहे त्यावरून मी हां अंदाज केला कीं सरकारनें 5 दिवसाचा मोहत्सव सांगितला असावा.

खांदेशात असंख्ये लोककला आहेत

खान्देशी लोककला


1 वन्ह/भवाडा/लळीत
2 तमाशा
3 अहिराणी नाटक
4 रायरंद
5 गोंधळी, वाघ्या मुरळी
6 टिंगरीवाले
7 वही गायन
8 धनगरी नृत्य
9 वीरनृत्य, झालं नृत्य.
10 भिल्ल नृत्य
11 बंजारा नृत्य
12 जात्यावरची गाणी, लग्न गीत, कानबाई गौरांईचीं गाणी नृत्य, अहिराणी अंगाई.
13 गोट/कहानी गायन
14 पावरी नृत्य नंदी नृत्य.
14 अहिराणी नाटक
15  खंजिरी एक तारी भजन सवाल जबाब.
16 तगतराव.
      एवढ्या सर्वं लोककला आहेत. त्यातील बहुतेक सर्वं मरण पंथाला लागल्या आहेत. त्या वाचविण्यासाठी सरकारनें हां उपक्रम सुरु केला आहे.

1 वन्ह/भवाडा/लळीत

खान्देशांतील ही लोककला माझ्या मते जगातील श्रेष्ठ कला आहे. ही कला म्हणजे एक प्रकारे रामलीला असतें. याला खेळ म्हणू या. हां खेळ साधारण रामनवमीला सुरु होतो आणि एकूण तीन दिवस चालतो. राम लक्ष्मण भरत शत्रूघ्नं, सीता दशरथराजा,  कौसल्या, सुमित्रा, कैकई पासून रावण, हनुमान वगैरे रामायनातील सर्वं पात्र असतात. रावण, दैत्य, त्राटिका हे मुखवटे घालतात.

नृत्य प्रधान महानाट्य

तस हे तीन ते चार दिवस चालणारे गीत, संगीत, नृत्य प्रधान महानाट्य आहे. संबळ, सूर, सनई, हार्मोनियम तबल्याच्या तालावर सर्वं पात्रे नाचतात. पहिल्या दिवशी राम जन्माला येतो. दुसऱ्या दिवशी सीता चोरीला जाते आणि तिसऱ्या दिवशी रावण मारतो. काही गावात हां खेळ 4 दिवस चालतो. हां खेळ करणारे नट सर्वं गावकरीच असतात. स्त्री पात्रही पुरुष करतात. कोकणातील दशावतारी सारखा हा प्रकार आहे. पालघर तालुक्यात जो बोहाडा प्रकार असतो तोच हां वन्ह प्रकार आहे. नाशिक जिल्ह्यात त्याला बोहाडा म्हणतात.

गण गौळण

ही लोककला असल्यामुळे गण, गौळण, बतावणी आणि मग मुख्य रामायनाची कथा असा बाज असतो. गण म्हणजे प्रत्येक्ष गणपती नाचत येतो. तो कार्यक्रमात विघ्न आणणाऱ्या दैत्यासी युद्ध करतो, त्यांचा वध करतो. नंतर सरस्वती येऊन त्याला घेऊन परत कैलासावर जाते. गवळणीतं श्रीकृष्णाचे फक्त स्तवन करून गवळण संपवीतात. तीनही दिवशी गण गौळण तीच असतें. पण बतावणी बदलत जातें.

बतावणी

बतावणीत पहिल्या दिवशी श्रावण बाळाची कथा असतें. ती रामायणाचा भाग आहे. दुसऱ्या दिवसांची बतावणीतं भक्त प्रल्हाद, हिरण्यकश्यपू, कयाधु व नरसिंह अवतार दाखवितात. आणि तिसऱ्या दिवशी शंकर, सती यांची कथा आहे. सती दक्षाच्या घरी अपमानीत होऊन यज्ञ कुंडात उडी घेते नंतर विरभद्र येऊन त्या यज्ञाचीं नासाडी करतो. यां बतावण्याच्या नंतर मग रामायणातील मुख्य अथनक सुरु करतात. तिसऱ्या दिवशी रावण मारतो आणि वन्ह संपतात.

खांदेशात वन्ह हां खेळ

धुळे जिल्ह्यात हां खेळ आता दोनच गावात सुरु आहे. एक धुळे तालुक्यातील विंचूर आणि शिरपूर तालुक्यातील तरडी गावात हा खेळ होतो. साक्री गावातील सामोळे गावात वन्ह सदृश्य लळीत प्रकार केला जातो. जळगाव जिल्ह्यात पारोळा, हातेड(चोपडा), ढेकू(अंमळनेर), नागलवाडी(चोपडा), इथे हे खेळ होतात. अजून काही गाव असतील ते मला माहीत नाहीत.

मोहत्सवात तीन दिवसाच पूर्ण नाट्य घ्यायचे असं काही नाही. यातील 15 मिनिटा पासून दोन तीन तासा पर्यंतचा आपल्याला हवा तेवढा भाग सादर करता येतो.


        बाकीच्या पंधरा कला बघू पुढच्या भागात.
क्रमश: बापू हटकर

धुळे जिल्ह्यात पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन खान्देशच नववर्ष आखाजी!

तमाशा कलावंतांच्या आयुष्याचा अघोरी तमाशा लेखक बापू हटकर पाण्याचे महत्व अहिर कान्हदेश माणसाला कळेल तो दिवस अमृताचा बापू हटकर


उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे दिले जाणारे या वर्षीचे खान्देश भूषण खान्देश उद्योग रत्न खान्देशश्री पुरस्कार जाही अहिरानी निरुपण पुस्तक संत तुकाराम ना आगाजा

Khandeshi Ahirani Blogs राज्यसभेवर खान्देशातून किती लोक घेतले? खान्देशी कलावंत दिनेश चव्हाण यांना दादासाहेब फाळके पुरस्कासातवे अहिराणी साहित्य संमेलन अध्यक्ष ओळख कान्हदेशी विविध बोली लेखपट