महाराष्ट्र विकास प्रकल्प पुन्हा एकदा बाय पास खान्देश

महाराष्ट्र विकास प्रकल्प पुन्हा एकदा बाय पास खान्देश

काल 28 फेब्रुवारी ला पंतप्रधान मां नरेंद्र मोदी साहेब यवतमाळ येथे येऊन गेले. तिथे त्यांनी विदर्भ मराठवाड्याला लहान मोठे 91 प्रकल्प दिले. 500 कोटी रुपयाचे रेल्वे मार्ग दिले. त्यात गोंदिया, वरोरा हां डोंगरी प्रदेश आहे तर नगर बीड जिल्ह्यातील कळंब, आष्टी, अंमळनेर ही गाव जोडणारा मार्ग त्यांनी दिला आहे.

त्यापूर्वी पंतप्रधान प महाराष्ट्रातील सोलापूर येथे आले होते. तिथं त्यांनी 30 हजार घर मोफत देण्याचा प्रकल्प राबवीला आहे. त्यापैकी 15 हजार घरांच वाटप केलं. 15 घरांच काम सुरु आहे. त्यापूर्वी येऊन त्यांनी मुंबई सोलापूर ही वंदे भारत रेल्वे पं महाराष्ट्रला दिली. मुंबईत धारावीत लाखो झोपडपट्टी वाशियांना झोपडीच्या बदली पक्की घर देण्याचा प्रकल्प तयार होतं आहे.

विकास कामा पासून खान्देश वंचित

याच बरोबर परकीय गुंतवणूक राज्यात आणून ती विदर्भ, मराठवाडा, पं महाराष्ट्र, कोकण, मुंबई यांना वाटप करून तिकडे कारखाने रोजगार तयार होतं आहे. पण या विकास कामा पासून खान्देश वंचित ठेवला जातं आहे. खान्देशलां कोणताही विकास प्रकल्प नाही. महाराष्ट्राच्या विकास आराखड्यातून खान्देश खड्या सारखा उचलून बाहेर फेकला जातं आहे. प्रत्येक प्रकल्प बाय पास खान्देश केला जातं आहे.

खान्देशाला साधी पॅसेंजर गाडी नाही

त्यांना ट्रेन, बुलेटट्रेन, मेट्रो ट्रेन, मोनो ट्रेन, वंदे भारत ट्रेन असं सर्वं दिलं जातं आहे. खान्देशाला साधी पॅसेंजर गाडी मिळत नाही. आम्हाला, मनमाड-इंदूर, दोंडाईचा-शहादा-म्हसावद-तोरणमाळ, नंदुरबार-साक्री-पिंपळनेर-नामपूर-सटाणा-मालेगाव-मानमाड, हे नवे रेल्वे मार्ग द्या. नांदगाव-पाटणादेवी-40गाव- अजिंठा-जामनेर-भुसावळ- नांदगाव अशी रिंग रूट पर्यटन गाडी द्या.


        शेतीला प्यायला पाणी द्या. समृद्धी सारखे महामार्ग द्या. खाजगी सरकारी उद्योग उभारून त्यातून भूमी पुत्रानां रोजगार द्या. रोजगार मिळविण्यासाठी खान्देश बाहेर होणार स्थलांतर त्वरित थांबवा.


बापू हटकर

विकासाची वाट बाय पास खान्देश

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे दिले जाणारे या वर्षीचे खान्देश भूषण खान्देश उद्योग रत्न खान्देशश्री पुरस्कार जाही अहिरानी निरुपण पुस्तक संत तुकाराम ना आगाजा

Khandeshi Ahirani Blogs राज्यसभेवर खान्देशातून किती लोक घेतले? खान्देशी कलावंत दिनेश चव्हाण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार सातवे अहिराणी साहित्य संमेलन अध्यक्ष ओळख कान्हदेशी विविध बोली लेखपट

धुळे जिल्ह्यात पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन खान्देशच नववर्ष आखाजी!

तमाशा कलावंतांच्या आयुष्याचा अघोरी तमाशा लेखक बापू हटकर पाण्याचे महत्व अहिर कान्हदेश माणसाला कळेल तो दिवस अमृताचा बापू हटकर

 

महाराष्ट्र विकास प्रकल्प पुन्हा एकदा बाय पास खान्देश
महाराष्ट्र विकास प्रकल्प पुन्हा एकदा बाय पास खान्देश

1 thought on “महाराष्ट्र विकास प्रकल्प पुन्हा एकदा बाय पास खान्देश”

Leave a Comment