धुळे वं जळगाव महासंस्कृती मोहत्सव

धुळ्यातील वं जळगातील महासंस्कृती मोहत्सव!

भाग तिसरा

अहिराणी नाटक

लोक जागृती वा सुधारणासाठी नाटक सिनेमा हे अत्यंत प्रभावी साधन आहे. अहिराणीत नाटक हां प्रकार आताशी सुरु झाला आहे. पूर्वी गावकारी मुंबई पुण्यातील मराठी नाटकाचीं पुस्तकं आणून नाटक सादर करीत असत. बोदवड तालुक्यात शेलवड नावाच्या गावात दीडसे वर्षाची नाट्य परंपरा आहे. या गावात एक बालाजी मंदिर आहे. या बालाजीच्या यात्रेला गावकरी दर वर्षी नाटक बसवतात. त्यांनी नाटकासाठी स्वखर्चाने नाट्यगृह सुद्धा बांधलं आहे. आजही त्यांनी ही नाट्य परंपरा जपून ठेवली आहे. आजही ही ते गावकरी दरवर्षी नवे नाटक सादर करत आहेत. या लोकांची कला जिल्ह्याच्या ठिकाणी सादर करून जगा समोर यावी म्हणून हे दोन कोटी रुपये आहेत. शिवाय अहिराणी भाषा टिकविण्यासाठी. तिच सुंदर रुपड जगा समोर यावं म्हणून, भावी होतंकरू कालाकार घडविण्यासाठी म्हणून नाटक सादर केलं पाहिजे.

रायरंद

अत्यंत कमी कलाकर आणि कमी साहित्य घेऊन नाट्य सादर करण्याचा हां अत्यंत प्रभावी कला प्रकार आहे. रायरंद ही एक जमातच असतें. आणि गावेगाव जाऊन ते हां कला प्रकार अत्यल्प दरात सादर करतात.

जागरण गोंधळ

तसा हा लोककला प्रकार महाराष्ट्रभर आहे. तों खान्देशांतही सादर होतो. नांदगाव येथे खान्देशी गोंधळी आणि वाघ्या मुरळी मिळतील. गोंधळी हे देवीचे भुते असतात. ते देवीचा गोंधळ मांडतात तर वाघ्या मुरळी हे खंडोबाचे भक्त असतात आणि ते जागरण घालतात. तसें जागरण आणि गोंधळ हे स्वतंत्र प्रकार आहेत. पण प्रत्येक मराठी अहिर कुटुंबात लग्नात हे दोन्ही विधी करावे लागतात म्हणून गोंधळी, वाघ्या आणि मुरळी यांचा ताफा एकत्र असतो.पूर्वी परभणीचे राजाभाऊ कदम हे अत्यंत नामांकित गोंधळी होते, ते जांभूळ आख्यान हे पौराणिक आख्यान सादर करत असत. वयाच्या 80 व्या वर्षातं ते या आख्यानात द्रौपदीचीं भूमिका करत असत. या आख्यांनातून राजाभाऊ कदम यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. सध्या पंढरपूरच्या कोमलताई पाटोळे या उत्तम मुरळीचा ताफा चालवीत आहेतं. त्यांचं राज्यभर नावं आहे.

गोंधळी राजाभाऊ कदम असोत कीं, मुरळी कोमलताई पाटोळे असोत. त्यांच्या भागातील जनता, लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांनी त्यांना मदतीचा हात दिला म्हणून त्यांची कला बहरली. पण खांदेशात तस घडत नाही. लोक, लोकप्रतिनिधी वं सरकारी अधिकारी या बाबतीत कलाकारांना कोणतेही सहाय्य करत नाहीत. म्हणून खान्देशी कला लोप पावत चालल्या आहेत.खरंतर राज आश्रय आणि लोकाश्रय असल्या शिवाय कोणतीही कला तग धरूच शकत नाही. पं महाराष्ट्रातील माणूस मुळातच रसिक आहे. कलेची कदर त्याला आहे. म्हणून तर तिथे कलाकांरांच अमाप पीक येत. खरं तर गौतमी पाटील ही नृत्य सम्राद्नी मूळचीं खान्देशातील अहिराणी भाषिक मुलगी आहे. पण तिची कला बहरली ती पश्चिम महाराष्ट्रात. आज एवढ्या प्रसिद्धीच्या शिखरांवर असलेल्या या मुलीचा खांदेशात अजून एकही शो झाला नाही.

जळगावच्या हैदरितून हाकलून दिलेले स्त्री पुरुष कलाकार आज पश्चिमं महाराष्ट्रात नावारूपाला आले आहेत. बरखा, अप्सरा जळगावकर यांना खान्देश सोडावा लागला तरी त्यांनी खान्देशला सोडल नाही. खान्देश बाहेर राहून आपली जळगावकर ही ओळख त्यांनी आडनावात कायम ठेवली आहे.

टिंगरीवाले

खांदेशात एक भराडी नावाची जमात आहे. त्यांचा व्यवसायचं आहे, टिंगरी खंजीरवर गाण म्हणून पोट भरण. त्यांचं उपजीविकेच साधन टिंगरी खंजिरी आणि गाण हेच आहे. ते दारोदार जाऊन गाण म्हणत धान्य वा पैसे गोळा करून जगतात. खान्देशातील अनेक पराक्रमी पुरुषावर किंवा काही अद्भुत घटनेवर त्यांनी पोवाडे रचले आहेत. ज्यांचा इतिहास कोणी लिहून ठेवला नाही त्यांच्या कथा हे पोवाड्यातून गाऊन सांगतात. त्यात स्वातंत्र्य सैनिक डॉ उत्तमरावं पाटील, लिलाताई पाटील, दरोडेखोर सुपडू दादा, गुलब्या फरारी, विरंगना चंदा गुजरीन, बारकु वकील, बोरकुंड गावातील बालक कथा, तसेच पौराणीकं कथाही ते सांगातात. समाजातील कुप्रथाही यांच्या गायनातील विषय असतात. बसल्या जागेवर कवण जोडून तिथल्या तिथे गाणारे ते शीघ्र कवी असतात. अशी ही कला संपत चालली आहे. ती वाचविण्या साठी हां दोन कोटीचा निधी आहे.


       राहिलेल्या कला बघू या पुढच्या भागात.


क्रमश:
बापू हटकर


 धुळे जिल्ह्यात पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन भाग 1 धुळे वं जळगाव महासंस्कृती मोहत्सव भाग 2

धुळे वं जळगाव महासंस्कृती मोहत्सव 3

धुळे जिल्ह्यात पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन भाग 1

1 thought on “धुळे वं जळगाव महासंस्कृती मोहत्सव”

Leave a Comment