उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन व महिला आघाडी तर्फे होणारा हळदीकुंकू सोहळा दिमाखात साजरा

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन व महिला आघाडी तर्फे होणारा हळदीकुंकू सोहळा दिमाखात साजरा

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन व महिला आघाडी तर्फे होणारा हळदीकुंकू सोहळा दिमाखात साजरा झाला.
शुक्रवार, दिनांक ५/१/२०२४ रोजी उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन व महिला आघाडी तर्फे होणारा हळदीकुंकू सोहळा थाटात संपन्न झाला.


कार्यक्रमाचे उदघाटक व अध्यक्ष श्री नरेंद्र सुर्यवंशी यांनी संघटनेच्या कार्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या ॲड.सौ.उज्वलाताई पाटील उपस्थित होत्या. उज्ज्वलाताईंनी उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ करत असलेल्या विविध कार्याचे कौतुक केले.


उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ ही एक सामाजिक क्षेत्रात काम करणारी मोठी संघटना आहे. कल्याण डोंबिवली शहरात ग्लोबल खान्देश महोत्सव ,अहिराणी भाषा संवर्धन, विश्व अहिराणी संमेलन,पाणी प्रश्न असो कि तरुणांना करीअर मार्गदर्शन अश्या अनेक आघाड्यांवर विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणारी संघटना आहे या संघटनेत विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी झोकून देऊन काम करीत असतात त्यामुळे हे सर्व शक्य होत असल्याचे विकास पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते अहिराणी दिनदर्शिकेचे प्रकाशन ही करण्यात आले. संघटनेचे कोषाध्यक्ष श्री अर्जुन पाटील यांनी सर्वांना संस्थेच्या विविध उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. श्री एल आर. पाटील, एन.एम भामरे, प्रदीप अहिरे, मगन.सुर्यवंशी ,सुभाष सरोदे, अनिरुद्ध चव्हाण, प्रविण सनेर,सौ.सुनिता बोरसे, सौ.सुनंदा वाघ,सौ.आशा भामरे,सौ.वैशाली पाटील, सौ.कमल पाटील, सौ.प्रिती वसावे,सौ अर्चना सरोदे, सौ मीना तडवी इ.मडळींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

तर आपल्या खुमासदारशैलीत श्री विनोद शेलकर व सौ.वर्षा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.प्रकाश माळी यांनी आभार प्रदर्शन केले.

1 thought on “<em>उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन व महिला आघाडी तर्फे होणारा हळदीकुंकू सोहळा दिमाखात साजरा</em>”

Leave a Comment