रात्र वैऱ्याची आहे खान्देशी माणसा जागा हो
खान्देश ही श्रीकृष्णाची भूमी आहे
निसर्गाने या भूमिला भरभरून दिलं आहे. म्हणून राम कृष्णा सारख्या देवानाही या भूमीचा मोह झाला. प्रभुरामचंद्र वनवासात जाताना हिमालयात नाही गेले. जिथे नेपाळ मध्ये त्याची सासूरवाडी जनकपुरी असतानाही त्याने हिमालया कडे न जाता सातपुडा, सातमाळ्यातील दंडकारण्य पसंत केले. गंगा यमुनेचा परिसर सोडून तापी, गोदा, नर्मदेचा परिसर निवडला. एवढी ही भूमी मनमोहक आहे.
कृष्णाचही तेच आहे.मथुरेच रणान्गण सोडून जो पळाला तों थेट खांडवं वनात. तापीच्या खोऱ्यात. म्हणजे आजच्या खान्देशांत. घनदाट जंगल, सुपीक जमीन, उदंड पाणी आणि शुद्ध हवा.
आज आपण जंगलं नष्ट केली. जमीन नासवून ठेवली आणि पाण्यावर लक्ष नाही. आपलं पाणी इकडचे तिकडचे लोक पळवत आहेत. आपल्याला न विचारता पाण्याच्या वाटण्या करत आहे. या पाण्यावर सर्वात मोठा दरोडा घातला तों गुजराथनें. नंतर हेच तापी खोऱ्यातील पाणी पळविण्यात आलं तें गोदावरी खोऱ्यात. तिथून तें थेट मराठवाड्यात नेण्याच्या योजना आखल्या जातं आहेत. आणि खान्देशी माणूस झोपलेला आहे.
मुंबई पुण्यात राहणारे खान्देशी लोक हे पाणी वाचवा म्हणून धावपळ करत आहेत, पण खान्देश झोपला आहे. ही झोप अशीच वाढत गेली तर खान्देशचं वाळवंट होईल. शेतीला सोडा पण प्यायला पाणी मिळणार नाही.
गुजराथ राज्यात कच्छ भुजचं वाळवंट होत. तिथं खान्देशचं पाणी नेऊन गुजराथ सरकारने हिरवे मळे फुलविले आहेत. तिथे वळवंटाचं नंदनवन करीत आहेत. आणि आपण निसूर झोपा काढत खान्देशचं वाळवंट कधी होईल याची वाट पहात आहोत.
खान्देशी राजा रात्र वैऱ्याची आहे सावध रहा.
आपलं पाणी वाचव तरच पुढच्या पिढ्या वाचतील.
पाणी परिषद आयोजन
त्यासाठी उत्तरमहाराष्ट्र विकास मंडळ यांनी अध्यक्ष विकास पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवार दि 10 डिसेम्बर 2023 रोजी दुपारी 12.30 वाजता केशरानंद हॉल नगाव बारी, देवपूर धुळे येथे पाणी परिषद आयोजित केली आहे.
ही परिषद कोणत्याही राजकीय पक्षाची नाही. ही जल परिषद आपलं पाणी आपल्याला मिळावं यासाठी विचार विनिमयासाठी आयोजित केली आहे. संपूर्ण खान्देशसाठी ही परिषद आहे. आपलें ईतर खान्देशी बांधव आपापल्या गावात तालुक्यात चांगले लढे लढत आहेत. म्हणून तें सर्वं नक्कीच अभिनंदलां पात्र आहेत. पण दोस्त हो ही अशी सुटी सुटी लढाई प्रभावी ठरणार नाही. त्याकडे कोणी लक्ष देणार नाही. त्यासाठी आपल्याला संपूर्ण खान्देश मिळून संयुक्त लढा उभारावा लागेल. ज्यात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार हां सर्वं प्रदेश आहे.
आपण सर्वं एकत्र येऊन लढा देऊ या. महाराष्ट्रातील ईतर सर्वं प्रदेश बऱ्याच प्रमाणात जल समृद्ध झाले आहेत. त्यामानाने आपण खूप मागे आहोत. आपला खान्देश उर्वरित महाराष्ट्र सोबत यावा म्हणून युद्ध पातळीवर धरणे बांधवी लागतील. त्यासाठी कांय करावे लागेल. तों विचार कारण्यासाठी आपली 10 डिसेंबर चीं ही बैठक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी हजर रहावे ही विनंती.
खान्देशकीं सोच पगले मुशीबत आने वाली हैंl
तेरी बरबादीके मशवरे हैं जहाँमेl
नां समझो गे तों मीट जाओगे खान्देशीयोl
तुम्हारी दास्ता तक नही होगी दास्तानोमेl
बापूसाहेब हटकर
कार्याध्यक्ष
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ

उत्तर महाराष्ट्र जल परिषद
चलो धुळे..!चलो धुळे…!!चलो धुळे….!!!
दिनांक:- १०/१२/२०२३ ,रविवार रोजी वेळ दुपारी १२.३० वा.
धुळे येथे एक दिवसीय जल परिषद
बैठकीचे ठिकाण :- केशरानंद मंगल कार्यालय,नगावबारी,देवपूर धुळे.
मन्हा खान्देश
तुन्हा रुबाबना जबाब नही,
मन्हा खान्देशी भाऊ…..
पोकय टेकमा खान्देश आते,
हुई ग्या रे म्याऊ……
तापी थडीना वाघोबा तू गडी….
डकारानं काय लिसी…?
कोल्हास्नी तुन्हा डोया बांधी रे ….
भाद्री टाकी मिसी….//ध्रु//
बडा घरना कसा झाया रे
तू पोकय वासा….
हंडीभर रस्सामा शिजाडस
मूठभर मासा….
राजबंसी तुन्हा वारसाले
लागी गई उधी….
कामठाले तीर लाई बसेत
तुल्हे नही सुधी….
खानदेशी अर्जुनन घोड हाई, जास कोठेबी निसी //1//
खान्देशना मी शे कान्हा
सांगे टोपीना कोना…
कितल्या करसी उच्चया टाचा
लेवाई ग्या रे घोना….
इस्नू किस्नूले भराले लाये
तू लग्नेस्मा कांड्या…
पोयता करे राई,रखमा
रोज दुखाडेत मांड्या…
पंगत जेवाडे पोट भरभरी,तुपनी वाढी ऱ्हाये तिसी //2//
बोडाफा न्हई -हायना वाडा
कोंबडीनी कोरी गढी…
बाटलीमांघे पयता पयता
देखी बारडोली मढी….
तुनी सोनानी पावडीले रे
ऱ्हाये रूपाना दांड….
तुन्ही धुरपता आते घसडस
लोकना घरमा भांडा…
उठ भावड्या चोपन पत्ता ह्या, ले तू आते पीसी //3//
सोयता करे तू गुढगी आंघुई
दुसराच न्हावाडे…
तुन्हा पंढायनं पानी तू सदा
तापीम्हा व्हावाडे…
चत्रास्नी तुल्हे करारे कुत्रा
तुन्हं भटकाडं ध्यान…
घाटा खाई नी ताठामा -हार्ई
तुन्हं उरेल शे भुशान….
कान्हाले तू करीले याद नी, टाक ह्या दोडका कीसी //4//
=================
कवी… प्रकाश जी पाटील (पिंगळवाडेकर)
मित्रहो लढा उभारायचा असेल तर आपण संघटीत होणे व जनजागर आवश्यक व तो आपल्या सर्वांना करावा लागेल कुणा एकाने ते शक्य नाहीच
चला उठा जागवा सगळ्यांना,संघर्ष करण्यासाठी सज्ज होऊयात
3 thoughts on “रात्र वैऱ्याची आहे खान्देशी माणसा जागा हो”