चला जल मिशन मध्ये सहभागी होऊया आपला खान्देश जल समृध्द करूया
उत्तर महाराष्ट्र जल परिषद
चला जल मिशन मध्ये सहभागी होऊया
आपला खान्देश जल समृध्द करूया
जल है तो कल है
जल ही जिवन है
जल ही परीस है
उत्तर महाराष्ट्रातील सर्व जल प्रेमींना विनम्र आवाहन करण्यात येत आहे की, उत्तर महाराष्ट्रातील सर्व प्रलंबित धरणे , बॅरेजेस, कालवे, नदीजोड प्रकल्प, नारपार पाणी बचाव इत्यादी विषया संबंधी आपल्या हक्काच्या व हिश्शाच्या पाण्यासाठी आणि प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने उत्तर महाराष्ट्र जल परिषदेने लढा हाती घेतला आहे आणि हा लढा पुढे नेण्यासाठी 20/12/2023 च्या आढावा बैठकीत ठरल्या प्रमाणे आपल्याला उत्तर महाराष्ट्र जलपरीषदेचं संघटनात्मक पुर्नगठन करायचं आहे. संघटन मजबुतीकरणासाठी व विस्तारीकरणासाठी जिल्हा,तालुका, गट,गण,आणि ग्राम (गाव) स्तरावर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नेमणुका करायच्या आहेत आणि या लढ्या साठी जे कोणी जलप्रेमी,जलयोध्दा सक्रिय सहभागी होऊ इच्छित असतील त्यांनी स्वयंस्फुर्तीने पुढे यावे.जलसंघटन विभाग, जिल्हा, तालुका, गट,गण व ग्राम स्तरांपर्यंत पोहचविण्यासाठी सक्रिय, सजग,सतर्क व सक्षम पदाधिकारी व कार्यकर्त्यांची फौज उभी करणं गरजेचं आहे.समर्थ पदाधिकारी व समृध्द कार्यकर्ते हीच संघटनेची खरी ताकद,सामर्थ्य,ब्रेनबँक, थींकटँक आणि वर्कबँक असते.जल समस्येवर कार्य करणारी सर्व स्वयंभू हिरे,माणिक मोती यांना एकत्रित आणणं, त्यांना एकाच माळेत गुंफणं आणि आणि त्यांचा बहुरंगी,बहुढंगी व बहुगुणी पुष्पहार बनवणं हेच उत्तर महाराष्ट्र जल परीषदेचं मिशन आणि पॅशन आहे. तसेच आपल्या काही जल प्रेमी अथवा पाणी विषयावर काम करण्यास इच्छुक असतील त्यांना या लढ्यात सामील करा म्हणजे तसेच वरील प्रमाणे विभागवार काम करू इच्छिणाऱ्या जल प्रेमींनी आपले
नाव,पत्ता, मोबाईल नंबर ,इत्यादी माहिती सह परिषदेच्या खालील राज्य कार्यकारिणी पदाधिकारी सोबत 24/12/2023 पर्यंत संपर्क साधावा अथवा व्हाटस अप वर वरील प्रमाणे डिटेल्स पाठवावेत म्हणजे नियुक्ती संबंधी नियोजन करता येईल.
धन्यवाद…!
आपले स्नेहाभीलाषी
श्री.विकास पाटील
अध्यक्ष
मो.8108903939
ॲड.दिपक बोरसे पाटील
सचिव
मो.9022990750
श्री. एन. एम.भामरे
कार्याध्यक्ष (उ.म.ज.प)
मो.9029267255
श्री.भीला पाटील
कार्यवाह(उ.म.ज.प)
7720092654