खान्देशी अहिराणी भाशा प्रवेशिका
खान्देशी भाशा प्रवेशिका खान्देशी भाषा प्रवेशिका KHANDESHI PRIMER
अहिराणी भाषा शिका, एनसीईआरटी (NCRT) तर्फे देशातील ५२ भाषांच्या पुस्तिका विकसित त्यापैकी खान्देशी अहिराणी भाषा शिकण्यासाठी आता लघुपुस्तिका केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या प्राथमिक टप्प्यात स्थानिक भाषांत अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी विविध ५२ भाषांत लघुपुस्तिका (प्रायमर) दाखल केल्या आहेत. यात खास महाराष्ट्रासाठी खानदेशी (अहिराणी) भाषेसाठी प्रायमर म्हणजे प्राथमिक स्वरुपातील लघुपुस्तिका विकसित करण्यात आली आहे.
हा उपक्रम राजाच्या स्थानिक भाषेच्या प्राथमिकतेपर्यंत विस्तारला गेला आहे. प्राथमिक अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश वाचन व लेखनात भाषिक प्राविण्य विकसित करण्याच्या पलीकडे असून शिक्षणाच्या प्रारंभिक टप्प्यात विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि गंभीर विचार विकसित करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

अहिराणी भाषा शिका लघुपुस्तिका निर्मिती योगदान
यात पुण्यातील येरवडा येथील डेक्कन कॉलेज भाषा संशोधन विभागातील अभ्यासिका जयश्री सदाशिव भारंबे, जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपशिक्षक तथा अहिराणी भाषा अभ्यासक रमेश विरभान धनगर, जिल्हा परिषद अर्जतसिम (ता चोपडा) येथील शिक्षक तथा अहिराणीनाट्यकर्मी प्रवीण शांताराम माळी, कुडे ता अलिबाग जि रायगड च्या उपशिक्षिका रूपाली रामचंद्र माळी यांनी योगदान दिले आहे.
शिक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार (एनसीईआरटी) ने आदिवासी समुदायांद्वारे बोलल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश असलेल्या १७ राज्यांतील ५२ स्थानिक भाषांत या लघुपुस्तिका (प्रायमर) तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. २०२० च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत (NEP) भारतीय भाषांमध्ये शिक्षणावर विशेष भर देण्यावर लक्ष दिला आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण अर्थात एनईपी २०२० मध्ये भारतीय भाषांमधील शिक्षणाला विशेष महत्व देण्यात आले आहे. स्थानिक भाषेत वाचन केल्याने मुलांना एखादा विषय झटपट स्पष्ट होईल. सरकारचा हा उपक्रम भविष्यात शिक्षण क्षेत्रात गेमचेजर ठरेल, असं शिक्षणतज्य सांगतात.
अहिराणी आनंददायी भाषा
खानदेशी भाषा शिकणाऱ्यांसाठी खूप आनंददायी गोष्ट आहे. भविष्यात स्थानिक बालकांना तसेच देश विदेशातील नागरिकांनाही हे प्रायमर उपयुक्त ठरेल, अहिराणी बाराखडी वाचताना आपल्याला खूप आनंद होईल असे कवी रमेश धनगर यांनी सांगितले.
या प्रकल्पाचे व्यवस्थापकीय सदस्य तथा पश्चिम भाषा विभाग केंद्रातील एरवडा पुणे (सी आय आय एल) येथील मराठी च्या प्राध्यापिका सुजाता रावसाहेब भूजंग यांनी केले होते. अहिराणी भाषा प्रवेशिका तयार करण्यासाठी रिसोर्स पर्सन म्हणून जयश्री भारंबे, रमेश धनगर, प्रवीण माळी, रूपाली माळी, यांनी काम पाहिले. खान्देशी अहिराणी भाशा प्रवेशिका
विद्यार्थ्यांचा परिवर्तनशील विकास होणार
मंत्रालयाने भारतीय भाषांमध्ये ५२ प्राथमिक अभ्यासक्रमांचा परिचय करून दिल्याने, विशेषतः विद्यार्थ्यांना बालपणीच्या शैक्षणिक तयारी दरम्यान, विद्यार्थ्यांचा एक परिवर्तनशील विकास होणार आहे.
हा उपक्रम त्यांच्या मातृभाषा आणि स्थानिक भाषेतील शिक्षणाची उपलब्धता सुनिश्चित करतो. याचा परिणाम सखोल समज, आजीवन शिक्षणाची बांधिलकी, स्वदेशी संस्कृतीशी सुधारित परिचय आणि संबंध: त्याचप्रमाणे जीवनाच्या विविध क्षेत्रातील मोठे शैक्षणिक यश आणि कामगिरी अपेक्षित आहे.
प्रा. सुजाता भुजंग(प्रकल्प समन्वयक तथा प्राध्यापक, पश्चिम क्षेत्रीय भाषा केंद्र, डेक्कन कॉलेज पुणे)
1 thought on “अहिराणी भाषा शिका”