बंजारा नृत्य
धुळे वं जळगावातील महासंस्कृती मोहत्सव! भाग सहावा
महासंस्कृती मोहत्सव बंजारा नृत्य
गोरबोली मारी स्वच्छंदी भरारी ,मारी भाषा मारो आवाज
धुळे वं जळगावातील महासंस्कृती मोहत्सव! भाग पाचवा
महासंस्कृती मोहत्सव भाग-3
धुळे वं जळगावातील महासंस्कृती मोहत्सव! भाग–4
बंजारा नृत्य महासंस्कृती मोहत्सव बंजारा नृत्य
बंजारा नृत्य खांदेशात एक बंजारा जातं आहे. त्यांना लोक लमाण सुद्धा म्हणतात तर बंजारा लोक स्वतःलां गोर किंवा गोर माटी म्हणतात. ईतर जातीच्या लोकांना ते कोर म्हणतात. आपला तो गोर आणि परका तो कोर अशी ही पद्धत आहे. तशी ही जमात जगभर आहे. युरोप अमेरिकेत यांना जीप्सी म्हणतात. सुप्रसिद्ध हॉलिवूड कॉमेडी किंग चार्ली चॅपलीन हां जीप्सी म्हणजे गोर बंजारा होता.
भारतभर पसरलेली बंजारा जातं अजूनही त्यांची संस्कृती टिकवून आहे. संपूर्ण देशात त्यांची भाषा, वेशभुषा आणि खानपान एकच आहे. त्यांच्या देवदेवता एक आहेत. मुख्यत्वे हे लोक शक्ती पूजक आहेत. ते आंबा जगदंबेचीं पूजा करतात. तिला त्यांनी अनेक नावे दिली आहेत. मेहरामा याडी, झेंडावाळी याडी, लोखंडी याडी. याडी म्हणजे आई माता असा अर्थ आहे.
मेहरामा मातेच मंदिर पोहरादेवी जि यवतमाळ इथे आहे. या आंबे मातेचे महान भक्त सेवालाल महाराज होऊन गेले. त्यांची समाधी सुद्धा पोहरादेवी येथे आहे. सेवालाल महाराज हे सिद्ध पुरुष होते. ते भूत, भविष्य, वर्तमान तिन्ही काळातील गोष्टी जाणून होते. या पोहरादेवीची यात्रा गुढी पाडव्याला असतें आणि सर्व भारत भरचे लोक इथे त्या दिवशी एकत्र येतात.
युरोपतील बंजारा
युरोपतील बंजारा जीप्सी लोकांचा पेहरावं, भाषा आणि खानपान यात थोडा बदल झाला असला, तरी ते काली मातेची पूजा मात्र करतात. नृत्य कलेत भारतीय बाज आहे.
भारतीय बंजारा समाज
बंजारा ही जातं मुळची, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब येथील रहिवाशी आहे. ते राजपूत आहेत. त्यांची आडनाव जाधव, पवार, चव्हाण, राठोड अशी असतात. त्यांच्या नावा पुढे सिंग लावतात. जसे रामसिंग, जोरसिंग, मोरसिंग वगैरे. पेहरावं आणि भाषा राजस्थानी असते.
स्त्रिया घागरा चुनारी घालतात. मनगटा पासून ते थेट खांद्या पर्यंत त्या बांगड्या घालतात. घागऱ्यालां ते फेट्या, चोळीला काचोळी आणि चुनरीला लछडी म्हणतात. पुरुष धोतर, सदरा, फेटा बांधतात. खांदेशातील बंजारा मावळी पगडी बांधतात. याच रहस्य कांय ते मात्र कळू शकल नाही. हे लोक व्यापारा निमित्त भटकंती करत. त्यातून त्यांना भरघोष पैसाही मिळत असे. ते घोड्या ऐवजी बैलावर सामान लादत असत.
बंजारा समाज लोककला
या लोकांचे ही स्वतःचीं लोकनृत्य, लोकगीत आहेत. यासाठी ते नगारा आणि डफड वापरतात. होळी हां त्यांचा सर्वात मोठा सण असतो. त्यावेळी ते पंधरा दिवस आधीच नाचगाण्याला सुरवात करतात. स्त्रिया हातात रुमाल घेऊन नृत्य गायन करतात तर पुरुष हातात टिपरे घेऊन खेळतात. वर्ष भरात मुलं कधीही जन्माला आले तरी त्याचं बारसं होळीलाच करतात. याला ढून म्हणतात.

बंजारा समाज सण
यांचा दुसरा महत्वाचा सण म्हणजे गणगौर, श्रावण महिन्यात हां सण असतो. माझ्या मते हां शीवं गौरीचा सण असतो. या सणाला ते एक स्त्री आणि एक पुरुषाची प्रतिमा तयार करून त्याची स्थापना करतात. मथुरेत जीं लठमार होळी खेळतात. तस लठ मार खान्देशी बंजाराही खेळतात. म्हणजे थट्याच्या नात्यातील पुरुष काही खोडी काढतात तेंव्हा स्त्रिया त्यांना काठीने मारतात.

राजस्थान मध्ये गणगौर हां खूप मोठा सण असतो. राजस्थान मध्ये हां सण चैत्र शुद्ध तृतीयेला साजरा करतात. त्याला तिज म्हणतात. या सणाचा सन्मान म्हणून भारत सरकारनें मुंबई सेंट्रल ते जयपूर दरम्यान धावणाऱ्या गाडीला गणगौर एक्स्प्रेश असे नावं दिले आहे.
ओव्यांना ते झामरा म्हणतात. नृत्याच्या प्रकाराला लेंगी म्हणतात. हां प्रकार आता मुडत चालला आहे. ती लोककला वाचावी म्हणून सरकारनें प्रत्येकं जिल्ह्याला दोन कोटी रुपये दिले आहेत. पुढच्या भागात बघू पुढची लोककला.
क्रमश:
बापू हटकर








3 thoughts on “महासंस्कृती मोहत्सव बंजारा नृत्य”