भाजप मधील खान्देशी नेते
भाजप मधील खान्देशी नेते
भाग तीसरा
भाजप आणि भाजप मधील खान्देशी नेते
गांधी नेहरू यांची काँग्रेसचीं पकड संपूर्ण देशावर असताना एक एक राज्य हळू हळू काँग्रेसच्या हातातून जातं होतं. Up बिहार मध्ये समाजवादी, बंगाल, केरळ मध्ये कम्युनिष्ट राजवटी आकार घेत होत्या. दक्षिण भारतात रामस्वामी पेरियार यांनी द्रविड अस्मिता जागृत करून त्यांनी, उत्तर हिंदुस्थान, हिंदू आणि हिंदी या विरुद्ध दक्षिणेकडे भयंकर द्वेष निर्माण करून द्रविड लोकांचा द्रविड मुंनेत्र कळघम पक्ष स्थापना करत सत्तेत शिराकाव केला. या द्रविड चळवळीचा तामीलनाडू राज्या बाहेर काहीही प्रभाव पडला नसला तरी तों पक्ष तामीलनाडू राज्यात आजही मूळ धरून आहे.
पुढे या पक्षाचे दोन छकले झाली . द्रमुक आणि आण्णा द्रमुक. तरी पण हेच दोन पक्ष आलाटून पालटून सत्तेत येत राहिले. ते आज तागायत टिकून आहेत. त्यामुळे त्या त्या राज्यातील प्रादेशिक पक्षामुळे काँग्रेसचीं पकड शैले होतं होती.महाराष्ट्रात सुद्धा ही प्रक्रिया मंद गतीने सुरु होती. कोकणात समाजवादी, पुढे त्यांच्याच जागी कोकण वं मुंबईत शिव सेनेचा शिरकाव होतं होता. पं महाराष्ट्रात शेकाप आकार घेत होता पण यशवंतराव चव्हाण यांनी साखर कारखानदारी उभी करून पं महाराष्ट्र आपल्या कह्यात ठेवला होता.
मराठवाड्यात सुद्धा शेकाप चा शिरकाव झाला होता पण प्रभाव काँग्रेसचाच होता. विदर्भात जांबुवंतराव धोटे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र विदर्भ राज्य संघर्ष समितीच्या रूपाने फॉरवर्ड ब्लॉकच्या माध्यमातून काँग्रेस पुढे तगड आव्हानं उभ केलं होतं. त्यांचे बरेच आमदार खासदार निवडून सुद्धा येत होते.
पण खान्देशचे चित्र वेगळं होतं. इथे शेकाप, समाजवादी, फॉरवर्ड ब्लॉक, शिवसेना यांना अजिबात थारा नव्हता. सुरेश दादा जैन आणि गुलाबराव पाटील यांनी आपापल्या क्षेत्रात शिव सेनेचा मर्यादीत प्रभाव उभा केला होता. पण सर्वत्र काँग्रेस पक्षचं अस्तित्व टिकवून ठेवून होता.
या काँग्रेस सत्तेला हळू हळू सुरुंग लावण्याच काम खांदेशात सुरु झालं होतं. ते उत्तमराव नाना पाटील यांच्या रूपाने इथे जनसंघ आकार घेत होता. तोच पक्ष इथे रुजत होता. महाराष्ट्रत जो ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद पेटला होता तों खांदेशात कधीच यशस्वी झाला नाही.
इथली प्रजाच शांत, सय्यमी, सोशिक आणि अलिप्ततावादी, काहीशी एकल कोंडी स्वभावाची आहे. ते कोणत्याही आंदोलना पासून चार हात लांब राहतात. जे बठासन व्हई ते आपलं व्हई, कसाले फुकट उपादी करो? बठ गुपचूप घरामा असल्या प्रकारच्या मताची माणसं जास्त आहेत.
जनसंघाच्या लोकावर दगड फेकत असत
गांधी हत्येनंतर देशात काँग्रेस पक्षाने जनतेत अफवा पसरविली कीं, जनसंघवाले महात्मा गांधी यांचे खुनी आहेत. म्हणून मग लोक जनसंघाच्या लोकावर दगड फेकत असत. त्या काळात जनसंघाच नेतृत्व उत्तमराव नाना पाटील यांनी घेतलं. गावागावांत जनसंघ पोहचवीला. ई सं 1957 साली संपूर्ण भारतातून जनसंघाचे फक्त दोनच खासदार निवडून आले. ते बलरामपूर up मधून अटल बिहारी वाजपेयी आणि धुळे खान्देशातून उत्तमराव नाना पाटील.तोच जनसंघ पुढे जनता पार्टीत विलीन झाला. नंतर जनता पार्टीतून बाहेर येऊन भारतीय जनता पार्टीच्या रूपाने नावारुपाला आला. त्याच्या मुख्य संस्थापकात उत्तमराव नाना पाटील हे एक नेते होते. उत्तमराव नाना पाटील यांना यशवंतराव चव्हाण यांनी कैक वेळा मंत्री पदाच अमिश दाखवले तरी नाना काँग्रेस पक्षात गेले नाहीत.
एक काळ असा होता कीं, जनसंघ किंवा भाजपला महाराष्ट्रात कोणी पायं ठेवू देत नव्हते, तेंव्हा खान्देशनी भाजप स्वीकारला, वाढवीला, राज्य व्यापी प्रचार प्रसार केला. आता भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष झाला आणि नेमका त्याचं वेळी महाराष्ट्राने राज्य भाजप वर कब्जा केला. भाजपच्या जन्म दात्या खान्देशी माणूसाला भाजप मध्ये उपऱ्या सारखी वागणूक मिळू लागली.आजही भाजपला सर्वात जास्त खासदार देणाऱ्या भाजपात खान्देशी अहिर उपरा कसा हे बघू पुढच्या भागात.
क्रमश:
बापू हटकर