Khandeshi bjp leadership
Khandeshi bjp leadership
भाजप आणि भाजप मधील खान्देशी नेते
भाग सातवा
आपण आधी पहिलं कीं सर्वं देश, राज्य आणि खान्देशांतील ईतर पक्षीय नेते आपापले पक्ष सोडून भाजपतं जातं आहेत तर जळगाव जिल्ह्यातील नेते भाजप सोडून ईतर पक्षात जातं आहेत.

जळगाव जिल्ह्यातील नेते भाजप सोडून ईतर पक्षात जातं आहेत
1 अनिल भाईदास पाटील-भाजपनें 2019 मध्ये शिरीष चौधरी यांना तिकीट दिलं म्हणून अनिल भाईदास यांनी भाजप पक्ष सोडून राष्ट्रवादीचं तिकीट घेतलं.
2 एकनाथ खडसे-भाजपनें मुख्यमंत्री पद दिलं नाही ते नाही पण नंतर कॅबिनेट मंत्रिपद काढून घेतलं. 2019 मध्ये विधानसभा तिकीटही नाकारल म्हणून त्यांनी पक्ष सोडला.
3 रोहिणीताई खडसे-वडील भाजप सोडून राष्ट्रवादीतं गेले म्हणून ताई सुद्धा भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्या आणि तिकडेच राहिल्या. वडील मात्र बाहेर पडले.
4 डॉ एस बी पाटील-शरद पवारांच्या पक्षातील अनिल भाईदास यांची जागा मोकळी झाली म्हणून डॉ साहेबानी भाजप सोडून त्या मोकळ्या जागेत प्रवेश केला.
5 उन्मेष पाटील-भाजपनें 2024 मध्ये लोकसभेच तिकीट नाकरल म्हणून पक्ष सोडला.
6 करण पवार-शिव सेना ऊबाठा नें जळगाव लोकसभा तिकीट देऊ केले म्हणून पक्ष सोडला.
मला वाटतं भाजपचं आताच ग्लॅमर बघता या नेत्यांनी त्यांचा भांजप पक्ष सोडायला नको होता. ज्याच्या वर पक्षात अन्याय झाला असेल त्यांनी पक्षात राहूनच संघर्ष करायला हवं होतं. कारण 1952 पासून 1972 पर्यंत काँग्रेस पक्षाला जे ग्लॅमर होते तेच ग्लॅमर आता भाजपला आले आहे. हां पक्ष लोकप्रियतेच्या शिखरांवर आहे.
पक्षात चंद्रशेखर 52कुळे, विनोद तायडे, पंकजाताई मुंडे हे खूप मोठे नेते होते. या तिघांनाही पक्षाने साईड ट्रॅक केलं होतं. पण या तिघांनी पक्ष सोडला नाही. आज या तिघांचं उत्तम पुनर्वसन झालं आहे.
चंद्रशेखर 52कुळे का बाजूला फेकले गेले होते ते मला माहीत नाही पण मुंडे तायडे यांचही मुख्यमंत्री पदा बाबत वितुष्ट आले होते असं मला वाटत. मला स्मरणात आहे त्यानुसार 40गावच्या एका सभेत तायडे भाषणात म्हणाले होते, पंकजाताई मुख्यमंत्री पदाला लायक आहेत. हे वक्तव्य विनोद तावडे यांना भोंवले असावे असं मला वाटते.
पंकजाताई बिडच्या एका सभेत म्हणाल्या होत्या, माझ्या जिल्ह्यातील मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मीच आहे. हे वक्तव्य त्यांना भोंवले असावे. किंवा या व्यतिरिक्तही काही कारणे असू शकतील. कारणे काही असतील, पण नाथाभाऊ सह हे तीनही नेते साईड ट्रॅक झाले होते हे खरं आहे.
भाऊ या तिघांत, मान मराताब, जेष्ठता, अधिकार या सर्वच बाबातील मोठे आहेत. पण आज 52कुळे, तावडे, मुंडे या तिघांना भाजपतं जे स्थान आहे ते भाऊंचे नाही. भाऊंचा पक्ष प्रवेश अजून होतं नाही. नाथा भाऊना पक्ष सोडण्याचा पश्चातापं नक्की झाला आहे.
पण नाथाभाऊ यांच्या व्यतिरिक्त अनिल भाईदास, रोहिणी खडसे, डॉ एस बी पाटील, उन्मेष पाटील वं करणं पवार यांनां आज तरी पश्चाताप होतं नसावा. त्यांनी कोणत्या पक्षात रहावे हां त्यांचा खाजगी प्रश्न आहे. पण मला वाटते त्यांनी भाजप सोडला तर दुसऱ्या काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षात प्रवेश केला असता तर बरे झाले असतें. आजच्या घडीला अनिल भाईदास पाटील सोडले तर इतरांचे भवितव्य आधान्तरीचं वाटते.
असं असलं तरी भाजप जळगाव जिल्ह्यात खूप फायद्यात आहे. मोदी लाटेत त्यांचे दोन्ही खासदार निवडून येण्याची शक्यता वाटते. पण त्याही पेक्षा भाजपचं मोठं यश म्हणजे खान्देशातून ऍड उज्वल निकम सारखा मोहरा त्यांच्या हाताला लागला आहे. त्यांना भाजपनें उत्तर मध्य मुंबईतून उभ केलं आहे. तिथून उज्वल निकम निवडून आले आणि भाजपचे सरकार बनले तर त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात नक्की स्थान मिळेल.
कारण त्यांची सरकारी वकील म्हणून कामगिरी खूपच उच्चं दर्जाची आहे. देशाच्या सर्वात मोठ्या गुन्हेगाराना त्यांनी फासी पर्यंत नेलं आहे. या त्यांच्या कर्तृत्वामुळे उज्वल निकम भारतीय लोकांच्या मना मनावर राज्य करत आहेत. मुंबई राज्याची राजधानी आहे.
इथून देश, राज्य पातळी वरील अनेक नेत्यांनी निवडणूकां लढवून मोठंमोठी सत्तेची पदे भूषविली आहेत. पण आता पर्यंत मुंबईतून खान्देशी माणूस कधी निवडून गेला नव्हता. ती संधी उज्वल निकम यांच्या रूपाने खान्देश कडे चालून आली आहे.
इथे मालिका संपली. जय खान्देश!
या लोकसभा निवडणूकीच्या अनुसंगाने एबीपी माझा वाहिनीने सर्वं पक्षीय नेत्यांच्या मुलाखतीच एक सदर सुरु केलं आहे. त्याचं नावं आहे तोंडी परीक्षा. या तोंडी परीक्षेत संपादक राजीव खांडेकर आणि त्यांची टीम मुलाखत देणाऱ्या नेत्याला 10/10 गुणांचे एकूण 60 गुण असलेले 6 प्रश्न विचारतात.
उज्वल निकम यांना इथे निमंत्रित करून त्यांची तोंडी परीक्षा घेण्यात आली. त्यांना हे सहा प्रश्न विचारण्यात आले. त्यात त्यांना 60 पैकीं 58 गुण मिळाले. आता पर्यंत घेण्यात आलेल्या नेत्यांच्या मुलाखती पैकी हे सर्वोच गुण संख्या आहे.
या गुणी खान्देशी अहिर कायदे पंडिताला एक प्रश्न असाही विचारण्यात आला होता कीं, तुम्हाला लोकसभेसाठी केवळ भाजपनीच विचारणा केली होती का? त्यावर उज्वल निकम यांनी सांगितले.
“नाही मला शरद पवार साहेबांनीही विचारांणा केली होती. मला ती ऑफर नाकारायची होती. पण एवढ्या मोठ्या नेत्याला तोंडावर नकार कसा देणार? म्हणून मग मी पवार साहेबाना सांगितले, विचार करून नंतर कळवतो. आणि त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपचीं उमेदवारी स्वीकारली. यातच मोठा दूरदर्शी पणा आहे. एका विद्वान चतुर कायदे पंडिताने भविष्य आणि भवितव्य लक्षात घेऊन घेतलेला निर्णय आहे तों!
इथे मालिका संपली. जय खान्देश!
बापू हटकर
3 thoughts on “Khandeshi bjp leadership”