खान्देशचा मुख्यमंत्री
क्यारोज व्हई खान्देशना मुख्यमंत्री!
क्यारोज व्हई खान्देशना मुख्यमंत्री? व्हस का नही बी व्हस कांय जान भो. मुख्यमंत्री पद हाई ते खूप दूरनी गोट से गड्या, साधं विधानपरिषद, राज्यसभानं प्रतिनिधित्व खान्देशले भेटत नही?
आते इतलामां शिक्षक, पदवीधर मतदार संघ म्हाईन 4 आमदार विधानपरिषदवर ग्यात त्यामा एक बी खान्देशी नही. लगेज आते 11 आमदार निवडाना सेत. त्यासन्या उमेदवाऱ्या बी जाहीर व्हई ग्यात. त्यामा एक बी खान्देशी नही. इतला कसा मरेल मायनं दूध पेयल सेत रे तुम्ही?
देश स्वतंत्र होऊन 77 वर्षे होऊन गेली. या 77 वर्षात मुंबई राज्य आणि महाराष्ट्र इथे 22 मुख्यमंत्री होऊन गेले त्यात स्व मोरारंजी देसाई हे एक गुजराथी सोडले तर राहिलेले 21 मुख्यमंत्री मराठी आहेत. त्यात एक सुद्धा खान्देशी नाही. याची वेदना होते. संयुक्त महाराष्ट्र निर्माण होऊन 64 वर्षे झाली. आता पर्यंत झालेले मुख्यमंत्री.
प. महाराष्ट्राचे
1 स्व यशवंतरावं चव्हाण
2 स्व वसंतदादा पाटील
3 श्री शरदचंद्र पवार
4 स्व बाबासाहेब भोसले
5 श्री सुशीलकुमार शिंदे
6 श्री पृथ्वीराज चव्हाण
7 श्री एकनाथ शिंदे
कोकण
1 स्व बाळासाहेब खेर
2 स्व पी के सावंत
3 स्व ए आर अंतूले
4 स्व मनोहर जोशी
5 श्री नारायण राणे
6 श्री उद्धव ठाकरे
विदर्भ
1 स्व मारुतीराव कन्नमवार
2 स्व वसंतराव नाईक
3 स्व सुधाकरराव नाईक
4 श्री देवेंद्र फडणवीस
मराठवाडा
1 स्व शंकररावं चव्हाण
2 स्व शिवाजीराव पाटील निलंगेकर
3 स्व विलासराव देशमुख
4 श्री अशोक चव्हाण
खान्देश
शून्य मुख्यमंत्री
महाराष्ट्राचे एकूण 21 मुख्यमंत्री होऊन गेले त्यांची ही विभागवार यादी दिली आहे. त्यातील एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत तर निवडून ठाणे म्हणजे कोकणातून येतात. या 21 मुख्यमंत्र्यात एकही खान्देशी नाही. या विरुद्ध आम्ही मुंबईत राहून 2002 पासून सतत आवाज उठवत आहोत. पण अजून खान्देश जागा होतं नाही. अजून कोणी खान्देशी मुख्यमंत्री पदावर दावा करत नाही.
मुख्यमंत्री पद नसेल तर तुमचा विकासच होऊ शकत नाही. म्हणून आज महाराष्ट्रातील सर्वात मागासलेला भाग खान्देश आहे. इथून बाहेर मोठ्या प्रमाणात मानवी स्थलांतर होतं आहे. मुख्यमंत्री पद मिळाल्याशिवाय आपला पाणी, रोजगार, रेल्वे आणि ईतर विकासाचा प्रश्न सुटणार नाही. म्हणून मी आता पर्यंत अनेक लेख आणि व्याख्यांनातून खान्देशला मुख्यमंत्री पद द्या अशी मागणी करत आहे. पण अजूनही खान्देश जागा होतं नाही.
त्यासाठी आता एक गीत तयार करून यूट्यूब चॅनेलवर टाकले आहे. खान्देशातील तरुणीनं मध्ये एवढी शक्ती आहे की, त्या आकाशातील चंदण्या खुडूनं आणून त्यांचा हार करून गळ्यात घालू शकतात. त्या स्वर्गात जाऊन अमृताची घागर भरून आणू शतात. खान्देशातील तरुणांनं मध्ये एवढी शक्ती आहे की, ते पाताळात जाऊन शेष नागचे दात मोजू शकतात.
दिल्ली मुंबईत जाऊन पंतप्रधान पद आणि मुख्यमंत्री पद हिसकाऊन घेऊ शकतात. या आशयाच ते गाणं आहे. शेवटच्या कडव्यात खान्देशचं राज्य आणि खान्देशचा मुख्यमंत्री पद मिळविण्याच भाष्य केलं. आहे. यूट्यूबवर जाऊन ते गाणं प्रत्येक्ष बघा. सूर, ताल, संगीत ठेका धरायला लावणार गाणं आहे. उसळत्या रक्ताचे 5 तरुण आणि 5 तरुणीच स्फूर्ती दायक गीत आणि नृत्य आहे.
खान्देशचीं भाषा, संस्कृती, सण पावन, पेहरावं, गीत, संगीत, नृत्य यांचं येथेच्छ दर्शन घडविणार हे अहिराणी चॅनेल आहे. त्याच नावं आहे, बापू हटकर प्रस्तुत खान्देश दर्शन गीताच नावं गिल्ली दान्डुना खेय आहे. या चॅनेल वर जा, संपूर्ण गाणं ऐका, चॅनेल सबस्क्रांइब करा, लाईक करा आणि शेअर करा. म्हणजे असेज एकापेक्षा एक दर्जेदार कार्यक्रम तुम्हाला पहायला मिळतील. त्यात खान्देशी गीत, लोकंगीत, लोकंसंगीत, लोकनृत्य, कथा, पुराण, इतिहास सर्वं बघायला मिळेल.
घरेघर संदेश, सोनाना खान्देश!
बापू हटकर
1 thought on “खान्देशचा मुख्यमंत्री केव्हा होईल”