खान्देशी राजकारण नव्या दमाचे नवे शिपाई खान्देशाची करु लढाई

खान्देशी राजकारण नव्या दमाचे नवे शिपाई खान्देशाची करु लढाई

👑🏹🚨🏹🪑🏹👑🏹
*नव्या दमाचे नवे शिपाईl*
*खान्देशाची करु लढाईll*
➿➿➿➿➿➿➿➿
                भाग पहिला
           खान्देशातून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व आमदारांचे अभिनंदन 💐🤝. त्यातील धुळे जिल्ह्यात विधान सभेचे 5 मतदारसंघ आहेत आणि या पाचही जागी महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. 2019 ला धुळे शहर आणि ग्रामीणच्या सीट विरोधी पक्षाकडे होत्या. धुळे शहरातील सीट एमआयएम कडे होती, तर धुळे ग्रामीणची सीट कॉंग्रेस पक्षाकडे होती. आता या दोन्ही जागी भाजप पक्षाचे दोन तरुण शिलेदार निवडून आले आहेत.
       शहरातून अनुप भैय्या अग्रवाल आणि ग्रामीण भागातून राघवेंद्र दादा भदाणे. दोघेही तरुण प्रथमच विधान सभेत प्रवेश करत आहेत. अनुप भैय्या यांच्या तीन पिढ्या आरएसएस मध्ये कार्यरत आहेत तर राम ऊर्फ राघवेंद्र दादा यांच्याही तीन पिढ्या राजकारणात सक्रिय आहेत. राम दादाचे आजोबा स्व दत्तू अण्णा पाटील हे आमदार होते.
       धुळे शहर आणि तालुक्याला आता नव्या दमाची आणि एकाच पक्षाची भैय्या दादाची जोडी मिळाली आहे. दोघ तरुण आहेत. दोघांना खान्देश बद्दल अस्मिता आहे याची जाणीव त्यांनी सभागृहात शपथ विधित दाखवून दिली.
       शपथ घेतल्यावर दादा म्हणाले जय श्रीराम जय खान्देश आणि भैय्यानी तर अहिराणी भाषेतच शपथ घेऊन जय खान्देश बोलून शपथ संपविली.
         खान्देश प्रेमी अशा या भैय्या दादाच्या जोडगोडीतून खान्देश विकासाच स्वप्न साकार होईल, अस प्रथम दर्शनी तरी दिसत.
        खान्देश विकासाचा खूप मोठा अनुशेष तयार झाला आहे. तो भरून काढायचा तर खूप लढाव लागेल. आपल्याच पक्षाशी भंडाव लागेल. अगदी सुरवातीलाच भांडल पाहिजे असं नाही. आधी ज्येष्ठाशी सल्ला मसलत करा खान्देशवरील अन्यायत्यांना समजूनसांगा, अर्ज विनंत्या करा. नाहीच ऐकल तर मग शेवटी लढा!
        *भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपची ही जी भव्य इमारत उभी आहे, तिच्या पायातील पहिली वीट धुळे जिल्ह्याची आहे याची जाणीव सतत ठेवा. पक्षालाही त्याची जाणीव करून द्या. 1957 च्या लोकसभा निवडणुकीत तेंव्हाच जनसंघ म्हणजे आताचा भाजप पक्षाचे फक्त दोन खासदार निवडून आले होते. एक बलरामपूर लोकसभा जिल्हा गोंडा येथून स्व अटल बिहारी वाजपेयी आणि दुसरे स्व उत्तमरावनाना पाटील वाघळीकर धुळे लोकसभेतून निवडून गेले होते. याची जाणीव पक्षाला करून द्या.*
        सुरवातीला धुळे जिल्ह्याचे प्रश्न काय आहेत ते बघू या,                                                              *खान्देश हित संग्राम ही समाज सेवी संघटना ई स 2002 पासुन या मागण्यांसाठी लढा देत आहे.*
         धुळे जिल्हाला गेली 77 वर्ष, दुबळे नेतृत्व मिळाले आहे. दुबळे नेते, बेजबाबदार राज्य सरकार आणि निद्रिस्त जानता अशा त्रिवेणी संगमात खान्देश नहात आहे. विकासचा कप्तान हा लोकप्रतिनिधी असतो. तो उच्च शिक्षित असावा, त्याला दूरदृष्टी असावी आणि तो बलवान असावा. असा नेता 77 वर्षात धुळ्याला मीळाला नाही. त्याचा दुष्परिणाम असा झाला की, हे शहर आणि जिल्हा राज्यातील सर्वात अन्यायग्रस्थ जिल्हा ठरून इथे विकासाचा खूप मोठा अनुशेष तयार झाला आहे. तो भरून काढण्यासाठी खान्देश हित संग्राम संघटनेने आपल्या जिल्हा विकासाचा आराखडा तयार केला आहे. तो लागु झाल्या शिवाय आपला विकास होणार नाही. त्यासाठी लोकप्रतिनिधी, शासन आणि प्रशासन कितीही वाईट वागले तरी त्यांना सरळ करून आपण कामाला लावू शकतो. पण त्यासाठी जनतेची प्रामाणिक साथ मात्र हवी. जोपर्यंत मतदार तंदुरी रोटी, दाल तडका, चिकन बिर्याणी खाऊन आणि नाइन्टी पिऊन मतदान करेल, तो पर्यंत प्रत्यक्ष परमेश्वर खाली उतरून आला तरी जिल्ह्याचा विकास होणार नाही. मतदार विशेषतः तरुण मतदार जागा झाला पाहिजे. तो जागा झाला तर, आपल्याला हव ते आपण मिळवू शकलो.
*चला उठा युद्ध कराl*
*धुळ्यासाठी गदर कराl*
धुळ्याच्या मागण्या
1 जिल्ह्याची तालुका निहाय पुनर्रचना करा. दोन लाखाच्या आत एक तालुका करा.
      धुळे, देवपूर, कुसुंबा, सोनगिर, सिंदखेडा, दोंडाईचा, शिरपूर, सांगवी, साक्री, पिंपळनेर असे दहा तालुके तयार करा.
2 धुळे शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावत रोज प्यायच शुद्ध पाणी द्या.
3 धुळे शहरात जेंव्हा प्रताप मील ही कापड गिरणी सुरू होती तेंव्हा तिथे मोठा रोजगार होता. गौरी वनस्पती तूप कारखाना इतरही छोटे मोठे उद्योग धंदे होते. आता हे सर्व बंद पडले. त्यामुळे बेसुमार बेकरी वाढली आहे. पोटापाण्यासाठी लोक स्थलांतर करू लागले आहेत. काहीनी अवैध धंदे सुरू केले,  गुन्हेगारी वाढली. बकाल वस्त्या वाढल्या शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडली. कारण एकच, उपाशी पोट आणि रिकामे हात. यातून सुटका करायची असेल तर शहरात उद्योग धंदे वाढवावे लागतील. भांडवली गुंतवणूक आणावी लागेल. लळीन्ग आणि नरडाणा येथील एमआयडीसी मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभे करावे लागतील.  जेणे करुन उद्योजक भांडवली गुंतवणूक करून कारखाने उभारतील. त्यातून तरुणांना रोजगार उपलब्ध होईल.
4 धुळे येथे कृषी विद्यापीठ स्थापन करून त्याला महालिंगदास अहिरराव यांचे नाव द्या.
5 इंदूर-मनमाड लोहमार्ग एक वर्षाच्या आत पूर्ण करा. धुळे मुंबई गाडीच्या वेळेत बदल करा. धुळ्याहून, मुंबईला पोहचणारी गाडी भल्या पहाटे मुंबईत पोहोचली पाहिजे. आणि मुंबईहुन धुळ्याला येणारी गाडी धुळ्यात पहाटे पोहोचली पाहिजे.
       धुळे चाळीसगाव शटल सर्विस विस्तारित करा. लोकांच्या सोयी नुसार चाळीसगाव वरुन धुळ्याकडे सुटणारी पहिली गाडी नाशिक रोड वरुन सोडा. धुळ्यावरुन चाळीसगाव कडे सुटणारी शेवटची गाडी नाशिक रोड पर्यंत न्या. ती तिथेच मुक्कामाला ठेवून पहाटे धुळ्याकडे रवाना करा. अशीच एक फेरी दुपारच्या वेळेत ठेवा.
6 राजवाडे इतिहास संशोधन मंडळ हे धुळ्याचे नाक आहे. पण त्या मंडळाची अत्यंत दुर्दशा सुरू आहे. त्या मंडळाला देखभालीसाठी वर्षाला 100 कोटीचे अनुदान सुरू करा. राजवाडे सहकारी बँकेचे पुनर्जीवन करा. त्यासाठी विशेष सरकारी अनुदान मंजूर करा.
7 पांझरा नदी शुद्धीकरण करून ती बारमाही प्रवाही करा. त्यासाठी नार पार योजना त्वरित अमलात आणून केमच्या डोंगरावरील पाणी पांझरा नदीत आणा.
8 शहराच्या मध्ये भागी असलेले जुने जिल्हा रुग्णालय अधिक सुसज्ज करून ते त्वरित कार्यान्वित करा. मुंबई पुण्यात मिळणार्‍या सर्व वैद्यकिय सुविधा धुळ्यात सुरू करा.
9 शहरातील सरकारी विश्रामगृह ब्रिटिश काळापासून आहेत ती तशीच आहेत. आता तर त्यांची अत्यंत दुर्दशा झाली आहे. ती नव्याने बांधून काढा.
10 शहरातील मुलासाठी प्रत्येक किलोमीटरच्या आत एक सुसज्ज खेळाचे मैदान उपलब्ध करून द्या.
    गरुड हायस्कूलचे मैदान अतिक्रमण मुक्त करून खेळासाठी खुले करा.
11 धुळ्यात पूर्वी भांग्या मारुती, मिरच्या मारोती, विजय व्यायाम शाळा, कोंडाजी व्यायामशाळा खूप प्रगत होत्या. त्या आता थंड पडल्या आहेत. त्यांना सरकारी अनुदान देवून तरुण मल्ल कसे तयार होतील यावर लक्ष द्या.
12 लोकरंजनासाठीची सर्व नाट्यगृह सुसज्ज करून ती स्थानिक कलाकारांना नाममात्र दरात उपलब्ध करून द्या.
13 धुळे महानगराचा अधिक विस्तार करून नागरिकांसाठी महानगरपालिकेची स्वतंत्र प्रवाशी बस वाहतुक सेवा सुरू करा.
14 पाच कंदील परिसर ही धुळ्याची आणबाणशान आहे. त्याच्या जोड रस्त्याला चैनीरोड नाव दिले आहे. पण आता हा परिसर बकाल झाला आहे. फेरी वाल्यानी अवैध पणे बळकावला आहे. हा रस्ता मुक्त करून त्याचं पूर्वीच वैभव त्याला परत मिळवून द्या. फेरी वाल्यांच बाजूच्या मार्केट मध्ये पुनर्वसन करावे. इथे दुमजली भाजी मार्केट आणि फळ मार्केट बांधले तर सर्व प्रश्न सुटतील. त्यामुळे या रस्त्यावरुन सुरळीत आणि वेगवान वाहतुक सुरू होईल.
15 शहरातील सर्व रस्ते विस्तृत आणि स्वच्छ करा.
16 चाळीसगाव चौफुली येथे उड्डाणपूल बांधुन वाहतुक कोंडी सोडावा.
17 अहिराणी अकादमी स्थापन करुन अहिराणी चा प्रचार प्रसार करा. त्यासाठी शालेय अभ्यासक्रमात अहिराणी भाषेचा समावेश करा.
          या सर्व मागण्या सरकार दरबारी नेणारे पाच हक्काचे आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार आता आपल्याला मिळाले आहेत. त्या पांडवानी या सर्व मागण्या विधान सभेत नेऊन केवळ मांडायच्या नाहीत, तर त्या घेऊन विधान सभेत भांडल पाहिजे.
           *ll आमदारांशी हितगुजll*

*धुळे जिल्ह्याची पुनर्रचना करून 10 तालुके करा ही मागणी आपण का करीत आहोत?*
        एके काळी धुळे जिल्हा खान्देशची राजधानी होता. त्यात आजचे धुळे, जळगाव, नंदुरबार, उत्तर नाशिक अहिराणी भाषिक विभाग होता, गुजराथ मधील डांग जिल्हा, निझर, उच्छल तालुके, सोनगड व्यारा, सागबारा, राजपिपळा डेडीया पाडा मध्य प्रदेश निमाड मधील खेतीया, पानसेमल, सेंधवा, बर्‍हानपूर हा संपूर्ण अहिराणी तावडी भाषेचा पट्टा धुळ्यात होता.
         नंतर ब्रिटिश सरकारने प्रशासकीय सोयीसाठी आजूबाजूचे प्रदेश वगळून 23 तालुक्याचा खान्देश जिल्हा तयार केला. त्याचे मुख्यालय धुळ्यात ठेवले. नंतर या खान्देश जिल्ह्याचे 1905 साली पहिले विभाजन करून 13 तालुक्याचा नवा पूर्व खान्देश आणि 10 तालुक्यांचा पाश्चिम खान्देश असे दोन जिल्हे तयार केले. पूर्व खान्देशचे मुख्यालय जळगाव येथे ठेवून त्याचे नामकरण नंतर जळगाव जिल्हा झाले. तर पाश्चिम खान्देशचे नामकरण धुळे जिल्हा झाले. पुढे 1998 साली धुळे जिल्ह्याचे पुन्हा दुसर्‍यांदा विभाजन करून 6 तालुक्यांचा नवा नंदुरबार जिल्हा तयार केला आणि धुळे जिल्ह्यात फक्त 4 च तालुके ठेवले.
       खर तर जिल्हा विभाजन करताना मातृ जिल्ह्यात जास्त तालुके ठेवतात. पण धुळे जिल्ह्याचे विभाजन करताना दोन्ही वेळा नव्या जिल्ह्याला जास्त तालुके देवून धुळ्यात कमी तालुके ठेवले. आता या जिल्ह्यात केवळ 4 तालुके असले तरी जिल्ह्याची लोकसंख्या 20 लाख 50 हजार आहे. म्हणजे एक तालुका सरासरी 5 लाख 10 हजार लोकसंख्येचा आहे. एवढी मोठी लोकसंख्या एका तालुक्यात असणे अत्यंत गैरसोयीचे आहे. हे विकास कामात दिरंगाई आणि अडथळा आणणारे आहे. या कारणाने तहसीलदार कार्यालयावर फार मोठा ताण पडतो. त्यामुळे जनतेच्या प्रत्येक कामात दिरंगाई होते. त्यात अधिकारी वा कर्मचारी यांचा दोष नाही. हा ताण कमी व्हावा म्हणुन धुळे जिल्हाचे 10 तालुक्यात विभाजन केले पाहिजे. ब्रिटिशांनी जेंव्हा जिल्हा, तालुका रचना केली तेंव्हा एक तालुका सुमारे 50/60 हजार लोकसंख्येचा होता. त्यामुळे जनतेची कामे सुरळीत आणि भराभर व्हायची. आज ही संख्या दहा पटीने वाढली आहे तर कर्मचारी संख्या केवळ दुप्पट तिप्पट वाढली आहे. हे अन्याय कारक आहे.
       इथे महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातील दोन दोन जिल्हे उदाहरण म्हणुन घेत आहोत. त्यांची लोकसंख्या आणि तालुका संख्या बघा.
*कोकण*
1 सिंधुदुर्ग-लोकसंख्या 8 लाख 50 हजार, तालुके 8, प्रत्येक तालुक्याची लोकसंख्या सरासरी 1 लाख फक्त.
2 रत्नागिरी-लोकसंख्या 16 लाख 15 हजार, तालुके 9, प्रत्येक तालुक्याची सरासरी लोकसंख्या 1 लाख 79 हजार
*विदर्भ*
1 यवतमाळ-लोकसंख्या 27 लाख 72 हजार, एकूण तालुके 16, प्रत्येक तालुक्याची सरासरी लोकसंख्या 1 लाख 73 हजार
2 वासिम- लोकसंख्या 9 लाख 85 हजार, एकूण तालुके 6, प्रत्येक तालुक्याची सरासरी लोकसंख्या, 1 लाख 64 हजार.
*मराठवाडा*
1 परभणी-लोकसंख्या 18 लाख 35 हजार एकूण तालुके 9, प्रत्येक तालुक्याची सरासरी लोकसंख्या 2 लाख
2 हिंगोली-लोकसंख्या 11 लाख 78 हजार, एकूण तालुके 5, प्रत्येक तालुक्याची सरासरी लोकसंख्या 2 लाख 25 हजार.
*प महाराष्ट्र*
1 सातारा-लोकसंख्या 27 लाख 96 हजार, एकूण तालुके 11, प्रत्येक तालुक्याची सरासरी लोकसंख्या 2 लाख 54 हजार.
2 सांगली-लोकसंख्या 28 लाख 20 हजार, एकूण तालुके 10, प्रत्येक तालुक्याची सरासरी लोकसंख्या 2 लाख 80 हजार.
       हे नमुन्या खातर घेतलेले जिल्हे आहेत. सर्व महाराष्ट्रात असेच तालुके आहेत. कुठे एक लाख तर कुठे दोन अडीच लाखाचे तालुके आहेत. याला अपवाद मुंबई पुण्यासारखी महानगरे आणि अशीच मोठ मोठे उद्योग असलेली इतर शहरे आहेत. तिथेले तालुके फक्त जास्त लोकसंख्येचे आहेत.
                    *********    
*धुळे जिल्हा- लोकसंख्या 20 लाख 50 हजार, एकूण तालुके 4, प्रत्येक तालुक्याची सरासरी लोकसंख्या 5 लाख 10 हजार. एव्हढ्या मोठ्या सरासरी लोकसंख्येचे तालुके तर नाशिक जळगाव जिल्ह्यात सुद्धा नाहीत*
         किती भयंकर विषम वागणुक आहे ही? जिल्ह्याचे नेते दुबळे आणि अदूरदर्शी असल्यामुळे धुळ्यात ही परिस्थिती आहे. तिकडे नारायण राणे सारखा बलवान नेता सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाल्यामुळे केवळ साडे आठ लाख लोकसंख्येच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 तालुके केले. तर इकडे साडे आठ लाख लोकसंख्या असलेला एकटा धुळे तालुका आहे.
        धुळे जिल्ह्यात 10 तालुके केले तर दोन लाख लोकसंख्येचा एक तालुका होईल. खूप मोठी लोकसंख्या आहे दोन लाख. 10 तालुक्याला 10 तहशीलदार कार्यालय, 10 दिवाणी न्यायालय, 10 फौजदारी न्यायालये 10 पंचायत समित्या, 10 कृषी उत्पन्न बाजार समित्या, 10 तालुका रुग्णालय, 10 तालुका पोलीस स्टेशन 10 तालुका खरेदी विक्री संघ, 10 तालुका दूध संघ. होतील. तेव्हढा मोठा कर्मचारी वृंद वाढून नोकर्‍या वाढतील. सरकारी निधी वाढेल. त्यामुळे जनतेची काम भराभर होतील.
      
*खान्देशकी सोच पगले मुशीबत आने वाली है,*
*तेरी बरबादीके मशवरे है जहामे,*
*ना समझोगे तो मीट जाओगे खांदेशीयो,*
*तुम्हारी दास्तातक नही होगी दास्तानोमेl*
     
*घरेघर संदेश.                 सोनाना खान्देशl*
🚨🏹👑🙏🏻🏹 🪑 बापू हटकर
👑🏹🚨🏹🪑🏹👑🏹

✍🏻🩺🏭🛣️🛤️✈️🚂💰
*खान्देशचा विकास अनुशेष*
       *जळगाव जिल्हा*
➿➿➿➿➿➿➿➿
                 भाग 2 रा
               पहिल्या लेखात आपण खान्देशातील धुळे जिल्ह्याच्या समस्या जाणुन घेतल्या. त्यावरचे उपाय पाहिले. आज जळगाव जिल्हा विकासावर बोलू या.
          महाराष्ट्रातील खान्देश हा प्रदेश राज्यात सर्वात जास्त अविकसित भूभाग आहे. राज्यातील ईतर प्रदेशाच्या मानाने खान्देश खूप मागासलेला आहे. जळगाव जिल्हा सुद्धा मागासच आहे. जळगाव भुसावळ ही शहरे आणि त्या लागतचा 10 किलोमीटरचा पट्टा सोडला तर बाकी सर्व जिल्हा अविकसित आहे.
          विकास कामांच्या बाबतीत विचार केला तर जळगाव जिल्ह्याचे ढोबळ मानाने दोन भाग करावे लागतील. विकसित उत्तर जळगाव जिल्हा आणि दुर्लक्षित दक्षिण जळगाव जिल्हा. सुरवातीला आपण उत्तर जळगाव जिल्ह्याचा विचार करूया.
        उत्तर जळगाव जिल्हा म्हणजे मुख्यत्वे जळगाव, भुसावळ, धरणगाव, चोपडे, रावेर, यावल, मुक्ताबाईनगर, बोदवड, जामनेर या नऊ तालुक्यांचा प्रदेश आहे.
        हा प्रदेश सुपीक काळ्या मातीचा प्रदेश आहे. तापी आणि तिच्या उपनद्यांच्या गाळातून ही सुपीक जमीन तयार झाली आहे. सातपुडा पर्वत रांगा ढग अडवतात त्यातून पाऊसही बरा पडतो. तापी नदीवरील हातनूर हे 12 टीएमसी पाहण्याचे धरण या भागात आहे. इतरही लहान मोठे बंधारे आहेत. त्यातून बर्‍या पैकी जलसिंचन आहे म्हणुन शेती हाच मुख्य व्यावसाय आहे. या भागातील शेतकरी बर्‍या अवस्थेत आहेत. कापूस आणि केळी ही मुख्य नगदी पीक इथे घेतली जातात. पण या पिकांवर औद्योग प्रक्रिया केली जात नाही त्यामुळे या पिकातून मिळवणारा नफ्याच्या खूप मोठ्या हिस्या पासून हा शेतकरी वंचित असला तरी खान्देशातील इतर शेतकर्‍यांच्या मानाने तो बर्‍या अवस्थेत आहे.
         महाराष्ट्रातील एकूण केळी उत्पादनाच्या 60% आणि देशाच्या एकूण केळी उत्पादच्या 20% केळी खान्देशात पिकते. त्यातील बहुतांश केळी ही उत्तर जळगाव जिल्ह्यातील असते. केळी फळावर अनेक प्रक्रिया करता येतील. उदाहरणार्थ केळीची गोड, तिखट, खारी वेफर्स. केळीचा गर वा त्याचा शेक करून तो हवाबंद डब्यात भरून देशी विदेशी बाजारात विक्रीसाठी पाठवता येईल. दर्जेदार फळ तयार करून ती जागतिक बाजार पेठेत विक्रीसाठी नेता येतील. फळा व्यतिरिक्त केळीच्या खांबा पासुन वस्त्र, दोरखंड बनविता येतात. केळीचा कंद असतो. त्या पासुन चलनी नोटासाठी लागणार उत्तम प्रकाराचा कागद तयार करता येतो. केळीच्या पिकां पासून अशी बाय प्रॉडक्ट तयार केली तर केळी उत्पादक शेतकर्‍याला अधिक लाभ मिळेल.
       हेच कापूस पिकाचे आहे. स्थानिक पातळीवर कापसा पासून कापड आणि सरकी पासून तेल तयार केले पाहिजे. कापसाच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या शीघ्र ज्वालाग्रही असतात. त्यांचा ऊपयोग आगपेटीतील काड्यासाठी वापरता येईल का याचे संशोधन झाले पाहिजे.
        जळगाव शहरात बर्‍या पैकी उद्योग व्यवसाय आहेत. मुळात जळगाव हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे त्या अनुषंगाने येणारी अनेक शासकीय कार्यालय इथे आहेत. ती विकास कामात सहाय्य करतात. जळगाव मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे जंक्शन स्टेशन आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ इथे आहे. रेमंड आणि इतर छोटे मोठे उद्योग धंदे शहरात आहेत. त्यातून बरा रोजगार मिळवतो. इथे सोन्या चांदीचा व्यवसाय सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
        भुसावळ हे मध्य रेल्वेवरील महाराष्ट्रातील सर्वात मोठे जंक्शन स्टेशन आहे. येथे 243 रेल्वे ट्रॅक आहेत तर भारतीय रेल्वेच्या टॉप-100 बूकिंग स्टेशन पैकी एक भुसावळ आहे. इथून जवळच वरणगाव ऑर्डिनेन्स फॅक्टरी म्हणजे भारतीय सैन्यदलाचा आयुध निर्मिती कारखाना आहे. त्यातून मोठा रोजगार तयार झाला आहे.
       जळगाव जिल्ह्याच नेतृत्व करणारे मोठ मोठे नेते सुद्धा उत्तर जळगाव जिल्ह्यातूनच होऊन गेले आहेत. स्व मधुकरराव चौधरी, माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील, सुरेशदादा जैन, अरुणभाई गुजराथी, एकनाथ खडसे, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गुलाबराव देवकर अशा दिग्गज मंत्र्यांची यादी आहे. त्यांनी आपापल्या मतदारसंघात मतदारांना खुष करण्यासाठी काम केली आहेत. त्यातून उत्तर जळगाव जिल्हा विकासाला चालना मिळाली आहे.
        वरील सर्व कारणामुळे जळगाव आणि भुसावळ ही शहरे आणि त्या भोवतालचा 10 किलोमीटरचा पट्टा बरा विकसीत आहे. पण त्या मानाने दक्षिण जळगाव जिल्ह्याचा विकास झालाच नाही.
      दक्षिण जळगाव जिल्ह्यात, अमळनेर, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा हे सहा तालुके येतात. हे पाचही तालुके अत्यंत अविकसित आहेत. इथे पाण्याचे मोठे दुर्भिक्ष आहे. शेतकरी कायम स्वरूपी दुष्काळाच्या छायेत असतो. शेतीला सिंचन सोडा, लोकांना प्यायला पाणी मिळत नाही. उद्योग व्यवसाय नाहीत. पूर्वी चाळीसगाव वरुन दुधाचे ट्रंकर मुंबईला जायचे. त्यावेळी मुंबई, ठाणे जिल्ह्यात घरोघर हे लोक दूध पोहोचवण्याचे काम करत असत. आता हा धंदा बंद पडल्यामुळे मोठा रोजगार बुडाला आहे.
       बिन पाण्याची शेती आणि कायम दुष्काळाच्या छायेत असणारा हा दक्षिण जळगाव जिल्हा अत्यंत वंचित राहीला आहे. पोटापाण्यासाठी लोक हंगामी किंवा कायम स्वरूपी बाहेर गावी स्थलांतर करीत आहेत.
       दक्षिण जळगाव जिल्ह्यातील 6 तालुक्यातून 4 आमदार निवडून जातात. यांचा राज्यातील वा जिल्ह्यातील राजकारणात आजिबात प्रभाव पडत नाही. त्यामुळे या भागात विकास कामे होत नाहीत. उत्तर जळगाव जिल्ह्यातून एकूण 7 आमदार निवडून येतात. त्यांचा जिल्ह्यातील राजकारणावर मोठा प्रभाव पडतो. ते जिल्हा नियोजन निधीतील सर्व विकास निधी उत्तरेकडे ओढून नेतात. त्यामुळे विकासाचा असमतोल होऊन उत्तर जिल्हा विकशीत आणि दक्षिण जिल्हा अविकसित राहिला आहे.
        दक्षिण जळगाव जिल्ह्याचा विकास करावयाचा असेल तर जळगाव जिल्ह्याच विभाजन कराव लागेल. राज्यातील मोठ्या जिल्ह्यांच विभाजन त्रिभाजन प्रस्ताव सरकारकडे कडे आहे. त्यात जळगाव जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव असून भुसावळ हा नवा जिल्हा प्रास्ताविक आहे. जळगाव जिल्ह्याची सध्याची लोकसंख्या 40 लाखाच्या आत बाहेर आहे.
         नव्या जिल्ह्याचे ठिकाण भुसावळ चूक आहे. कारण जळगाव आणि भुसावळ यातील अंतर केवळ 25 की मी आहे. भुसावळ शहर जळगाव शहराच्या उत्तर पूर्व भागात असून त्या बाजूला जिल्ह्याचा विस्तार कमी आहे तर जळगाव शहराच्या पश्चिम दक्षिण भागात जिल्ह्याचा विस्तार अधिक आहे. म्हणुन नव्या जिल्ह्याचे ठिकाण जळगावच्या पश्चिम दक्षिण भागातील शहर असावे. माझ्या मते दक्षिण जळगाव जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण भडगाव आहे. भडगाव हे नव्या जिल्ह्याचे योग्य ठिकाण राहील.
*मूळ जळगाव जिल्हा*-या जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर, यावल, धरणगाव, चोपडे, जामनेर हे मूळ तालुके घेऊन, फैजपूर, आडावद, पहूर,  हे तीन नवे तालुके करून घ्यायचे आहेत. म्हणजे हा नवा जिल्हा 12 तालुक्यांचा जळगाव जिल्हा तयार होईल.
*धनाजीनगर  तालुका*- उत्तर जळगाव जिल्ह्यातून तीन नवे तालुके करायचे आहेत. त्यातील फैजपूर आणि सावदा ही शहरे एकत्र करून त्याच नामकरण *धनाजीनगर* असे करून ते तालुक्याचे ठिकाण करा. फैजपूर आणि सावदा या दोन्ही गावात फक्त 3 की मी चे अंतर आहे. या मधल्या भागातील जमीन ग्रहण करून तिथे  सर्व तालुका प्रशासकीय कार्यालये स्थापित करा. धनाजीनगर तालुका असेल आणि त्याची फैजपूर आणि सावदा ही दोन उपनगरे असतील. धनाजी नगर हे धनाजी नानाजी चौधरी यांच्या स्मरणार्थ करा.
*धनाजी नानाजी चौधरी*- धनाजी नानाजी चौधरी खान्देश भुमीचे महान पुत्र होते. त्यांनी इ स 1936 च ऐतिहासिक कॉन्ग्रेस अधिवेशन फैजपूर येथे भरवले होते. त्याची अनेक महत्त्वाची कारणे आहेत.
1 हे अधिवेशन ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन होते. भारतातील लाखो खेड्यातून फैजपूरची निवड केली हीच खूप मोठी गोष्ट आहे.
2 धनाजी नानाजी चौधरी यांनी ही जबाबदारी अंगावर घेऊन ती यशस्वी करून दाखवली ही महान घटना आहे.
3 महात्मा गांधी यांनी फैजपूर ते खीरोदा प्रवास बैल गाडीतून करून धनाजी नानाजी चौधरी यांच्या घरी मुक्काम केला होता.
4 हे अधिवेशन 50 वे म्हणजे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन होते. याचे मावळते अध्यक्ष डॉ राजेंद्र प्रसाद आणि उगवते अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. यातील राजेंद्र बाबू देशाचे पहिले राष्ट्रपती झाले आणि पंडित नेहरूजी देशाचे पहिले पंतप्रधान झाले.
5 याच अधिवेशनात प्रथमच भारताला संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला.
        म्हणुन या अत्यंत महत्त्वाच्या कॉंग्रेस अधिवेशनाचे भव्य राष्ट्रीय स्मारक फैजपूर येथे झाले पाहिजे. त्यावेळची कॉन्ग्रेस पक्ष ही राजकीय पार्टी नसून भारतीय स्वातंत्र्याची चाळवळ होती. म्हणुन सर्व पक्षीय नेत्यांनी हे स्मारक व्हावे म्हणुन आग्रह केला पाहिजे.
         तसेच या ऐतिहासिक अधिवेशनाचे महानायक स्व धनाजी नानाजी चौधरी यांचेही उचित स्मारक झाले पाहिजे. त्यांनी देशासाठी जे कार्य केले ते कार्य करणारे ते देशातील एकमेव राष्ट्रपुरुष असे आहेत की, त्यांनी ग्रामीण भागात यशस्वी कॉन्ग्रेस अधिवेशन भरून दाखविले.  ग्रामीण भागात अशा प्रकाराचे अधिवेशन पूर्वी कोणी घेतले नव्हते, नंतरही कोणी घेतले नाही. देशाच्या स्वातंत्र्य चळवळी ते अत्यंत दमदार पाऊल आहे. एवढा मोठा पराक्रम करणारे धनाजी नानाजी चौधरी आहेत. ते खान्देश पुत्र होते याचा स्वाभिमान खांदेशी माणसाला हवा.
      धनाजी नानाजी यांच उचित स्मारक करायचे तर फैजपूर सावदा ही दोन गाव एकत्रित करून त्याचे नाव *धनाजीनगर* ठेवले पाहिजे आणि धनाजीनगर तालुका झालाच पाहिजे.
          धनाजी नानाजी यांचे शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातही चांगले काम आहे.
        हातनूर धरण गाळाने भरले आहे. तो गाळ उपसुन धरणाची उंची वाढवून या धरणाची साठवणूक क्षमता दुप्पट करा.
       केळी पिकावर प्रक्रिया करणारे कारखाने काढा तसेच केळी उत्पादक शेतकर्‍यांना विशेष अनुदान देवून पिकाचा दर्जा वाढवून निर्यात दर्जाची केळी पिकवायला शेतकर्‍यांना सहाय्य करा.
6 उत्तर जळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळ, पाली, उनपदेव, हरताळे, यावल अभयारण्य, व्यास मंदिर, रामरथ यात्रा जळगाव पर्यटनासाठी विकसीत करा.

*अविकसित दक्षिण जळगाव जिल्ह्यातील तालुके घेऊन एक नवा जिल्हा बनवा*- जळगाव जिल्ह्यातील भडगाव, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव, पारोळा, एरंडोल हे 6 तालुके घ्या सांभाजीनगर नगर जिल्ह्यातील अहिराणी भाषिक प्रदेश त्याला जोडा. म्हणजे सोयगाव तालुका घ्या.  कन्नड तालुक्यातील अहिराणी प्रदेश नागद सोबत एकत्रित करून नवा नागद तालुका तयार करा. तो ही या नव्या जिल्ह्यात समाविष्ट करा. त्याबरोबरच, मेहुणबारा, नगरदेवळा, हे नवे तालुके तयार करा. प्रशासकीय सोयी साठी प्रत्येक तालुका 2 लाखाच्या आत असावा.
       अशा प्रकारे आता नवीन 10 तालुक्याचा दक्षिण जळगाव जिल्हा तयार होईल.
          अजिंठालेणी वेगळी आहे आणि अजिंठा गाव वेगळे आहेत. अजिंठा गाव हे शिल्लोड तालुक्यात आहे तर लेणी ज्या गावत आहे ते गाव फर्दापूर आहे. हे फर्दापूर गाव आणि लेणी सोयगाव तालुक्यात आहे. हा सोयगाव तालुका अहिराणी भाषिक आहे. लेणी आणि फर्दापूर हे घाटाच्या खाली म्हणजे भौगोलिक दृष्ट्या खान्देशात आहेत तर अजिंठा गाव घाटावर म्हणजे मराठवाड्यात आहे. हे त्रान्गड सोडावीले पाहिजे.
         ज्याला आपण अजिंठा लेणी म्हणतो ती वास्तवात फर्दापूर लेणी आहे.
        ही लेणी बुद्धाच जिवंत स्मारक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात बुद्ध धम्माच पुनरुज्जीवन केले आहे. म्हणुन फर्दापूर गावाचे नाव भीमनगर केले पाहिजे. आणि नियोजित दक्षिण जळगाव जिल्ह्याचे नामकरण भीमनगर जिल्हा केले पाहिजे. भीमनगर (फर्दापूर) येथे जागतिक दर्जाचे पाली अर्धमागधी भाषेचे विद्यापीठ स्थापन करावे.
1 सोयगाव तालुका मराठवाड्यातील अत्यंत मागासलेला तालुका आहे. जिथे जागतिक कीर्तीच्या लेण्या आहेत त्या तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे. या तालुक्याचा आणि लेणी परिसर भीमनगर (फर्दापूर) यांचा विकास केला पाहिजे. इथे एक  अत्याधुनिक रेल्वे स्टेशन बांधुन भीमनगर-जामनेर-भुसावळ- जळगाव-पाचोरा-चाळीसगाव- नांदगाव- पाटनादेवी-अजिंठा अशी एक रिंगरूट पर्यटन रेल्वे गाडी सुरू करा.
2 नारपार गिरणा जोड प्रकल्प त्वरित अमलात आणून या भीमनगर जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न सोडवा.
         गिरणा धरणातील गाळ काढून धरणाची उंची वाढावा किंवा गिरणा नदीवर अजून एक दुसरा बांध बांधा.
       तापी नदीवरील पाडळसरे धरण मूळ स्वरुपात त्वरित पूर्ण करा.
     भीमनगर जिल्ह्यात एम्स
रुग्णालय म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिटय़ुट ऑफ मेडिकल सायन्स (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) उभारा. खान्देशात दर्जेदार दवाखाना नाही. म्हणुन हे लोक न पुरवडणाऱ्या महागड्या रुग्ण वाहिका घेऊन मुंबई पुण्याला रुग्ण घेऊन जातात. म्हणुन संपूर्ण खान्देशसाठी एक एम्स हॉस्पिटल इथे सुरु करा.
       अमळनेर येथे टेक्स्टाईल हब उभारा. कापसावर प्रक्रिया करणारे शिक्षण सुरू करा.
         चाळीसगाव येथील बंद पडलेला दुग्ध व्यवसाय पुन्हा उभारा. त्याला 100 टक्के अनुदान द्या.
        अमळनेर येथील मंगळ मंदिर, सखाराम महाराज मंदिर, एरंडोल तालुक्यातील पद्मालय, अमळनेर तालुक्यातील मुडावद येथील कपिलेश्वर मंदिर, 40 गाव तालुक्यातील वालझरी येथील वाल्मीक समाधि पाटणादेवी येथील भास्कराचार्य आश्रम, यादव गड पाटणा देवी मंदिर, पितळ खोरे यांना अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा ती स्थळे विकसित करा.
       चाळीसगाव शहरात असलेले केकी मुस यांचे निवासस्थान आणि त्यांचे कला संग्रहालय यांचे रक्षण करा.
       अमळनेर ही खान्देशची सांस्कृतिक राजधानीत आहे. इथे तत्त्वज्ञान मंदिर आहे. इथे खांदेशी तमाशान्ची पेढी आहे. अमळनेर च्या आजूबाजूला खांदेशी लोकलला वन्ह सादर करणारी कला पथक आहेत. या सर्वासाठी अमळनेर मध्ये एक खान्देश कला भवन उभारून तिथ सर्व खांदेशी लोककला संशोधन केंद्र सुरू करा.
      वाडे ता भडगाव हे महान लेखक महालिंगदास यांच जन्म गाव आहे. तिथे त्यांच स्मारक उभारा. मराठी भाषेत भक्ती मार्गाच्या बाहेर जाऊन लिखाण करण्याचा पहिला मान महालिंगदास अहीरराव यांचा आहे. त्यांनी मराठीत प्रथमच पंचोपाख्यान हा राज्य शास्त्रावरील ग्रंथ मराठीत लिहिला. या ग्रंथा वरुन छ शिवाजी महाराज यांची राज्य घटना आज्ञापत्र लिहिली गेली आहे. त्यांचे इतर ग्रंथ पंचतंत्र, सिंहासन बत्तीसी (विक्रम बत्तीसी), शालीहोत्री (अश्व परीक्षा), चाणक्यनीती (अर्थशास्त्र राज्यशास्त्र) हे एकूण 5 ग्रंथ लिहिले आहेत. महालिंगदास अहिरराव बाबाराजे भोसले यांचे स्नेही आणि मालोजीराजे विठोजीराजे यांचे गुरू होते.
        भोसले घराण्यातील सर्व राजपुत्राना वरील पाचही ग्रंथ शिकवले जात होते. छ सांभाजी महाराज यांच्या बुध भूषण ग्रंथावर महालिंगदास अहीरराव यांच्या ग्रंथांचा प्रभाव आहे.
       या महालिंगदास यांचे वाडे येथे मोठे स्मारक व्हावे. तसेच धुळे येथे कृषी विद्यापीठ स्थापन करून त्याला महालिंगदास अहीरराव यांचे नाव द्यावे.
         जळगाव जिल्ह्याचा हा अनुशेष भरून काढावा!
       पुढच्या भागात बघू या नाशिक जिल्हा.
क्रमशः
✍🏻🩺💰🛣️🚂 बापू हटकर
✍🏻🩺🏭🛣️🛤️✈️🚂💰