परकीय सत्तेने महाराष्ट्र व्यापला होता

ई स 16 व्या शतकाच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र परकीय सत्तेने व्यापला होता. मोगल, निझाम, आदिलशहा, हबशी या सत्तानी महाराष्ट्र व्यापला होता. मराठयांच्या तलवारी आणि ब्राह्मणांच्या लेखण्या या परकीय सत्ता वाढविण्यासाठी खपत होत्या. रणांगणात मराठे रक्त सांडत होते आणि दरबारात ब्राह्मण खेर्डे घाशी करत होते. त्यातून परकीय सत्ता अधिक मजबूत होत होत्या.अशा काळात, 1520 च्या दरम्यान वाढे गावच्या अहिरराव घराण्यातील, पोलीस पाटील यांच्या घरात एक महान विद्वान जन्माला आला. त्यांचं नाव महालिंगदास अहिरराव.

महाराष्ट्राच स्वराज्य व्हावं ही कल्पना

त्यांनी सर्व प्रथम 1572 मध्ये महाराष्ट्राच स्वराज्य व्हावं ही कल्पना मांडली. त्यांनी परकीयांची गुलामी करणाऱ्या स्वकीयांची खूप निर्भत्सना केली आहे. त्यांना सांगितलं गुलामी सोडा आणि स्वराज्य निर्माण करा. त्यासाठी त्यांनी वेरूळचे पोलीस पाटील बाबाराजे या शेतकार्या कडून त्यांची दोन मुले मागून घेतली.

मालोजी आणि विठोजीआणि स्वराज्य निर्माण

मालोजी आणि विठोजी. या दोन तरुणांना युद्ध शास्त्र आणि राजकारण यात पारंगत केले. याच मालोजीने निझामाच्या सेनेच नेतूत्व करत भारतात अजिंक्य मोगल सेनेचा सर्व प्रथम पराभव केला. आणि इथे प्यादाचा फर्जी झाला. त्यांच्या पोटी शहाजी राजे आणि शहाजींच्या पोटी शिवाजी राजे जन्माला आले. त्या तीनही पिढ्यानी महालिंगदासांचा उपदेश मानला आणि स्वराज्य निर्माण झाले.

महालिंगदास परिचय

ते अखिल महाराष्ट्राचे गुरू आहेत महालिंगदास. त्यांनी त्यांच्या पंचोपाख्यान ग्रंथात स्वतःचा परिचय दिला आहे. त्यानी पोलीस पाटीलकी वर पाणी सोडून संन्यास घेतला. वाडे गाव सोडून शिखर सिंगणापुराच्या शंकराच्या मंदिरात वास्तव्य केले. खरं तर त्याकाळात शेतकरी कुटुंबात "काला अक्षर भैस बराबर" अशी अवस्था असताना या पाटलाने रामकृष्ण भट नावाचा ब्राह्मण गुरू केला. त्याच्या कडून संस्कृतीचे धडे घेतले. आणि 5 संस्कृत गद्य ग्रंथाच मराठी पद्य ग्रंथात रूपांतर केले. त्यांनी स्वतःचा दिलेला परिचय असा,

माझे वास्तवे पूर्वस्थान।बाहाळ समीप वाडेग्राम गहण।
खान्देशी गिरजेतीरी जाण।ठाव पूर्वजांचा।।
निपनजा वेसदेव।त्याचा पुत्र सिमदेवो।
त्याचा सूत जगळदेव।तो आजा होय मज।।
त्याचा पुत्र भीकदेवो।तो पिता मज साचाभेवो।
यैसा बोलिला भावो।महालिंगदासू।।
पूर्वजाची पाटिलकीपन।वाढेग्रामाची जान।
तेणे महालिंगदासे।कथन केले माऱ्हाष्ट।।

हीच माहिती त्यांनी पंचोपाख्यानाच्या शेवटी दिली आहे.


बाहाळेसमीप वाडेग्रामी वासू।ग्रीजातीरी खान्देशु।
ब्रह्मचालुक्य वंशु।आडनावो अही(र) रावो।।
तो भिकदेव माझा पिता।वाडेग्रामी अधिष्टाता होता।
रामकृष्ण भट गुरू देवता।मजकारणे।।

महालिंगदास अहिराव ग्रंथ संपदा

त्या काळात,खान्देशात वाडे ता भडगाव जी जळगाव इथे “महालिंगदास अहिराव” नावाचे कुणबी-पाटील समाजातील फार मोठे विद्वान पंडित होऊन गेले.
मराठी भाषेत सर्व प्रथम लिखाण करण्याचा मान हा ज्ञानेश्वराकडे जातो. तसा मराठी भाषेत भक्ती मार्गाच्या बाहेर जाऊन प्रथम लिखाण करण्याचा मान महालिंगदास अहिरावांचा आहे. त्यांची ग्रंथ संपदा.

ग्रंथ संपदा

  • 1 पंचोपाख्यान-राजकारणा वरील माहीती देणारा, राज्य कसे मिळवावे आणि ते टिकवावे सांगणार पहिला मराठी ग्रंथ
  • 2 वेताळ पंचविशी-वेताळ आणि विक्रम राजा यांच्या 25 कथा
  • 3 सिंहासन बत्तीशी-उज्जयिनीमीचा राजाभोज आणि विक्रमादित्य यांच्यातील कथा
  • 4 शालीहोत्र-अश्व परीक्षा. म्हणजे मराठेतील पाहिलं प्राणी शास्त्रा वरील पुस्तक
  • 5 चाणक्यनीती-चाणक्याच अर्थशास्त्र आणि राजनीती मराठीत प्रथम.


प्रत्येक ग्रंथ हा पद्य स्वरूपात आहे. आणि प्रत्येक ग्रंथात पाच हजार पेक्षा जास्त श्लोक आहेत. महालिंगदास अहिरराव हे मालोजी राजांचे गुरू होते. पुढे भोसले कुळातील प्रत्येक पिढीने त्यांच्या ग्रंथांचा अभ्यास केला आहे.त्या अर्थाने ते भोसले कुळाचे कुलगुरू ठरतात.


छ शिवाजी महाराज यांची राज्य घटना,आज्ञापत्र

ही महालिंगदास यांच्या पंचोपाख्यान या ग्रंथावरून तयार केली आहे. हे आता सर्व ईतिहासकार मान्य करतात.
सर्व प्रथम नानासाहेब गद्रे यांनी त्यांच्या “महाराष्ट्र महोदय” या शासन प्राप्त अनुदानातून लिहिलेल्या ग्रंथात याचा उल्लेख केला आहे. भाऊ मांडवकर यांच्या “गजरा” या लेख संग्राहात याचा दुसरा उल्लेख आहे. नंतर या सर्वांचा अभ्यास करून इतिहासकार रा चि ढेरे यांनी शिखर सिंगणापुरचा शंभू महादेव या ग्रंथात या विषयावर एक संपूर्ण प्रकरण लिहिले आहे. तसेच आज्ञापत्र नावाचे ढेरे यांचे एक छोटेसे पुस्तक फक्त याच विषयावर आहे.

सद्गुरू महालिंगदास अहिरराव कृषी विद्यापीठ

असा हा महाविद्वान महापंडित जो सकल महाराष्ट्राचा गुरू आहे. भोसले कुळाचा राजगुरू आहे. त्याला खान्देशी लोक विसरले. महाराष्ट्राला तर काही देणं घेणं नाही. त्यांनी त्यांचे ज्ञानोबा तुकोबा सांभाळून ठेवले. आपण आपले महालिंगदास विसरून गेलो. यांच्या नावाने धुळ्यात, सद्गुरू महालिंगदास अहिरराव कृषी विद्यापीठ स्थापन झाले पाहिजे. ही आजच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिनी आशा व्यक्त करू या.


महाराष्ट्राच्या या महागुरुला व महाभारतकार महर्षी व्यासांना कोटी कोटी प्रमाण! दोघेही अहिर आहेत.


हा संदेश खान्देशात घरोघरी गेला पाहिजे.
बापू हटकर

मुख्य बातम्या आणी लेख

अनाथांचे देवरुप घर श्री शंकरबाबा पापडकर

मुलींच्या शिक्षणाची चिंता मिटली पालकांनो आपल्या मुलींना खुप शिकवा

लवकर निजे लवकर उठे त्यास ज्ञान संपत्ती मिळे

शुन्य वाहे भार शुन्याचाच

कस्तुरीगंध श्रद्धा उंचावणारा कथासंग्रह

महाराष्ट्रात गुटका बंदी कशासाठी ?

बापू हटकर


2 thoughts on “महाराष्ट्राचे स्वराज्य व्हावे ही कल्पना सर्व प्रथम<br>ज्यांनी मांडली ते खान्देशातील अहिरपुत्र,<br>सद्गुरू महालिंगदास अहिरराव”

Leave a Comment