खान्देशी कन्येचा किर्तीमान गिरडची शुभांगी बनली बँकेत अधिकारी

खान्देशी कन्येचा किर्तीमान गिरडची शुभांगी बनली बँकेत अधिकारी

अभ्यासाची जिद्द, चिकाटी ठेवून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवले यश

जिद्द,चिकाटी असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विजय संपादन करू शकतो, हे गिरड (ता. भडगाव) येथील शुभांगी मनोरे या विद्यार्थिनीने दाखवून दिले आहे. तिची बँक ऑफ इंडियामध्ये क्रेडिट ऑफीसर म्हणून नियुक्ती झाली आहे. शुभांगीने मिळविले यश हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

शुभांगी मनोरे हिच्या घरची परिस्थिती तशी साधारण, अवघी दीड एकर शेती, त्यात कुटुंबाची गुजराण, आई- वडील शेतमजुरी करणारे, अशात तिने प्राप्त केलेले हे यश सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

आई-वडिलांना मदत करुन शिक्षण

अभ्यासाबरोबर शुभांगीने वडिलांना शेती काम करण्यात व आईला घरकाम करण्यात सातत्याने मदत केली. आपल्या या यशाचे श्रेय तिने आपल्या आई-वडिलांना दिले आहे. त्यांचा भक्कम पाठिंबा, आत्मविश्वास तसेच राजेश पाटील व संदीपकुमार साळुंखे यांच्या पुस्तकातून मिळालेली प्रेरणा यामुळे संघर्ष करण्याची प्रेरणा मिळाल्याचे ती सांगते.

शुभांगीला लहानपणापासूनच वाचनाची खूप आवड असल्याने तिने अनेक आत्मचरित्रे, प्रेरक पुस्तके वाचली. पदवीचे शिक्षण घेताना सातत्याने तिचे वाचन सुरू होते. सुरुवातीला तिने जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करायची ठरवले तेव्हा तिच्या ध्यानीमनीही नव्हते की आपल्या या प्रवासात जवळपास २० मुख्य परीक्षा द्याव्या लागतील.

अपयशा नंतर यश

शुभांगीने तिच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या परीक्षा दिल्या. सुरूवातीला नियोजन चुकल्याने, अति आत्मविश्वासामुळे तिला अपयश येत गेले. बँकांच्या परीक्षांबद्दल ऐकून सुरूवातीला या परीक्षा कठीण वाटत होत्या. मात्र, प्रत्यक्ष जेव्हा बँकेच्या परीक्षा देण्यास सुरवात केली तेव्हा आपण या परीक्षांमध्ये सहज यश प्राप्त करू शकतो असे तिला वाटले, त्यादृष्टीने तिने नियमितपणे सराव सुरू केला. प्रामाणिकपणे व सातत्याने अभ्यास सुरु ठेवला. वेळोवेळी संबंधित सहकारी आणि अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले. शारीरिक व मानसिक स्वास्थ चांगले राहावे यासाठी नियमितपणे योगासने सुरू केली.

नियमित अभ्यास व सरावामुळे तिची भारतीय आयुर्विमा महामंडळामध्ये विकास अधिकारी म्हणून निवड झाली. परंतु तेवढ्यावर तिने समाधान मानले नाही. तिचा अभ्यास सुरूच होता. दुसन्या चांगल्या नोकरीची अपेक्षा तिने ठेवली होती. अखेर ऑक्टोबर २०२३ मध्ये बँक ऑफ इंडियामध्ये क्रेडिट ऑफिसर म्हणून तिची नियुक्ती झाली. शुभांगी हिने घेतलेल्या या भरारीबद्दल तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

ताई मी कलेक्टर व्हयनू’तून प्रेरणा

सुप्रसिद्ध खानदेशी अधिकारी तथा ‘ताई मी कलेक्टर व्हयनू’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक राजेश पाटील (आएएस), ‘हम होंगे कामयाब’ या पुस्तकाचे लेखक व आयआएस अधिकारी संदीपकुमार साळुंखे, विद्यार्थ्यांना नेहमीच मार्गदर्शन करण्यास उपलब्ध असणारे डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण (आयआरएस), योगेश पाटील (आयआरटीएस), एमपीएससी ग्रुपच्या मानसी पाटील (उपजिल्हाधिकारी) हे शुभांगीचे प्रेरणास्रोत आहेत. तसेच मिशन ‘आयएएस’ जळगावचे विभागीय संचालक प्रवीण पवार यांच्या संपर्कात राहून तिला योग्य मार्गदर्शन मिळाल्याचे शुभांगीने सांगितले. खडतर परिस्थितीत मिळवलेल्या या यशापासून इतरांनी प्रेरणा घ्यावी तसेच विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शनाची गरज भासल्यास संपर्क करण्याचे आवाहन प्रविण पवार (चाळीसगाव) यांनी केले आहे.

शुभांगी चे मामा पण अधीकारी

आदर्श गाव ताडे ता. एरंडोल येथील भारत सरकारच्या नॅशनल इन्शुरन्समधील अधिकारी श्री सोपान कंखरे यांची शुभांगी हि भाची आहे. सोपान कखरे दिखील मागील एक दसकापासन भारत सरकारच्या नॅशनल इन्शुरन्समधील अधिकारी आहेत.

खान्देशी कन्येचा किर्तीमान गिरडची शुभांगी बनली बँकेत अधिकारी 3
शुभांगी चे मामा पण अधीकारी

Leave a Comment