खान्देशची वाळवंटाकडे वाटचाल khandeshi water problem

जलसमृद्ध खान्देशची वाळवंटाकडे वाटचाल khandeshi water problem

खान्देश (प्रदेश) म्हणजेच कान्हदेश एकेकाळी श्रीकृष्णाचे वास्तव्याने पावन झालेल्या या प्रदेशात विविध नद्या उगम पावतात .दूध दुभत्याचा महापूर या प्रदेशात होता.तापी, बोरी , गीरणा, मौसम, पांझरा ,वाघूर अशा विविध नद्यांनी,यासोबतच अनेक छोट्या मोठ्या नद्यानी हा प्रदेश जलसमृद्ध होता.

तसेच या प्रदेशाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे नाशिक जिल्ह्यातील पेठ सूरगाण्यात “केम नावाचा डोंगर” आहे या डोंगरातून जवळजवळ १९ नद्या उगम पावतात.

Water shortage in Khandesh
Water shortage in Khandesh

त्यापैकी २ नद्या गोदावरी व गिरणा या पूर्ववाहिनी तर बाकी १७ नद्या नार,पार, दमणगंगा ,अंबिका, औरंगा अशा जवळजवळ १७ नद्या पश्चिम वाहिनी आहेत. या १७ नद्या सर्व सरळ अरबी समुद्राला जाऊन मिळतात. 

उत्तर महाराष्ट्रातील खान्देशातील या डोंगरावर सगळ्यात जास्त पर्जन्यमान होतं .कै.भाऊसाहेब हिरे यांच्या काळात या प्रकल्पावर सर्वे होऊन या प्रकल्पातून जवळजवळ २५०  ते ३०० टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकत अस हा सर्वे सांगतो.

या सर्व नद्यातील पाणी पूर्व वाहिनी करून गिरणा, पांझरा ,बोरी, मौसम यासोबतच इतर सर्व नद्यांना लींकेज केल्यास, या सर्व नद्या बारमाही होऊ शकतात.

अस झाल तर खान्देशातील इंच न इंच जमीन ओलिताखाली येऊ शकते… ? पाण्याचा प्रश्न मिटला तर खानदेशात अनेक उद्योग व्यवसाय येऊ शकतात . विशेष म्हणजे  अमृत महोत्सवी ७५ वर्ष आपण साजरा करत आहोत. तरीसुद्धा आपल्या वाट्याचं पाणी आपल्याला दिल जात नाही.

उलट हे पाणी छगन भुजबळ यांनी गोदावरीला लिंकेज करून मराठवाड्या कडे कसं जाईल हे बघितलं .तर दुसरे मंत्री महोदय धनंजय मुंडे हे पाणी विदर्भासाठी कसं नेता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत.

आदरणीय प्रधानमंत्री हे पाणी गुजरातला कस नेता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत.

खान्देशची वाळवंटाकडे वाटचाल khandeshi water problem 5

मध्येच उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना हे पाणी मुंबईला कसं नेता येईल यावर प्रयत्न चालू होते.आपले नेते मात्र आळीमिळी गुप चिडी करून काय करत आहेत… ?

जेव्हा आपण जनतेचा विचार करतो तर आपली जनता मात्र निद्रिस्त अवस्थेत झोपेच  सोंग घेवून निपचित पडलेली आहे . मात्र वरील शक्यते पैकीं कुठलीही शक्यता खरी ठरली तर खान्देशच वाळवंट झाल्याशिवाय कोणीही रोखू शकणार नाही…..

तापी नदी ही उत्तर महाराष्ट्रातील म्हणजेच खान्देशातील सर्वात मोठी नदी

भाग -२

तापी नदी ही उत्तर महाराष्ट्रातील म्हणजेच खान्देशातील सर्वात मोठी नदी .सर्वात संपन्न अशा प्रकारातल जलपात्र या नदीलाच लाभलेला आहे .

भारतातील पाणी वाटप करारानुसार या नदीतील जवळजवळ १९० टीएमसी पाणी महाराष्ट्राच्या वाट्याला म्हणजेच खान्देशच्या वाट्याला येते .कारण ही नदी संपूर्ण खान्देशच्या भूभागातूनच वाहते.

आज पर्यंत या नदीतील फक्त ३० ते ३५ टीएमसी पाणी आपण उचलू शकलेलो आहोत .अजूनही जवळजवळ १०० ते १५० टीएमसी पाणी या नदीतच आहे. हे वाहून सरळ पुढे गुजरातला जाते. याच्यावर गुजरात ने दोन मोठे मोठे महाकाय डॅम बांधलेले आहेत.

वास्तविक त्यांना प्रकल्प मंजुरी करताना जी क्षमता मंजूर झालेली होती त्यापेक्षा दुप्पट तिप्पट पटीने हे मोठे महाकाय प्रकल्प  गुजरातसाठी केंद्र सरकारच्या निधीतून बांधण्यात आले होते.

त्यांनी त्यांचा प्रदेश जल समृद्ध केला. आणि आमचे खान्देशवाशी मात्र बघतच आहेत .आता दुसरी बाजू पाडळसरे ,शहादा, प्रकाशा ,अशी एकूण २२ बॅरीजेस  बांधलेली आहेत परंतु एकाही बॅरेज मधून सोलरवर किंवा इलेक्ट्रिक द्वारा उपसा सिंचन प्रकल्प कार्यान्वित नाहीत.

त्यामुळे हे पाणी खान्देशसाठी कुठल्याही पद्धतीने उपयोगाला येऊ शकत नाही. कारण तापी नदीचे पात्र खोल आहे तर आपली जमिनी जलपात्रापासून बरीच उंच असल्याने उपसा सिंचन योजना जोपर्यंत कार्यान्वित होत नाहीत.

तोपर्यंत या पाण्याचा फायदा आपल्याला होत नाही . आपली अवस्था म्हणजे सारा समुंदर मेरे पास है और मेरी दो बूँद प्यास भी नही बुझाती अशी आहे.

मित्रहो लक्षात ठेवा
जल है तो कल है …
जल ही जीवन है ….
जल ही परिसर है…
अभी नही तो कभी नही….

सर्व खानदेशवासीयांनी या सर्व बाबींचा विचार करून आपल्या पाण्याच्या चळवळीसाठी गावागावात उत्तर महाराष्ट्र जलपरिषद स्थापन करून आपण लढा उभारला नाही तर पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही…….!!!!!


विकास पाटील
     अध्यक्ष
उत्तर महाराष्ट्र  जल परीषद
8108903939
9969379654

2 thoughts on “खान्देशची वाळवंटाकडे वाटचाल khandeshi water problem”

Leave a Comment