स्वतंत्र भारताच्या आधुनिकीकरणचा शेवटचा राजा श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड


आज महाराजांचा स्मृती दिवस आहे. गुराखी, आदर्श राजा, आदर्श स्वातंत्र सैनिक,आदर्श समाजसेवक, आदर्श पती, आदर्श पिता…
महाराजांनी १३ भारतरत्न घडविले. बडोदा संस्थानातील राजा म्हणून त्यांचे काम उल्लेखनीय आहे. साहित्यक, कवी, समाजसेवक, दलित, आदिवासी, खेळ, सामाजिक कामे, उद्योगपती यांना मदत करुन मुळ प्रवाहात आणले,सक्तीचे शिक्षण, फिरती वाचनालय, जगातील सर्वात मोठी वाचनालय उभारली, दुष्काळात दौरा करून शेकय्रांना जनतेला राजवाड्यातील सोने चांदिचे हत्ती मोड करून मदत केली, बॅक ऑफ बडोदाची स्थापना, सयाजी सरोवर, पहिला साखर कारखाना असे किती तरी महान कार्य महाराजांनी केले.
क्रांती सूर्य ज्योतीबांना भरभरुन मदत केली, ज्योतीबांनी त्यांच्यावर पोवाडा रचिला. त्यांचे शेतकऱ्यांचे आसूड ह्या पुस्तकाचे प्रकाशन महाराजांनी केले. डाॅ बाबासाहेब आंबेडकर, अरविंद घोष, लोकमान्य टिळक, जमशेदजी टाटा, ज्योतीबा गेल्यानंतर सावित्रीबाईंना मरेपर्यंत पेन्शन दिली. जगाच्या आश्चर्या पैकी एक म्हणजे राज महल लक्ष्मी पॅलेस आहे. बनारस विश्र्व हिंदु परिषदेला तीन लाखाची मदत, त्याकाळातील महाराष्ट्र विधानसभा बांधायला २ लाखाची मदत दिली, त्याच्यात आता मुंबई पोलीस मुख्यालय आहे.
पुरोहितांची परिक्षा घेवुन मंदिरात नेमणुका केल्या. जगातील पहिला राजा ज्याने त्यांच्या राज्यात तृतीपंथींच्या लिंग छेद ह्या भयानक प्रथेवर बंदी केली आणि तसा कायदा केला. स्वातंत्र चळवळीत देशातील सर्व भूमिगत स्वातंत्र सैनिकांना त्यांच्या परिवारास आर्थिक मदत केली. गोलमेल परिषदेचे अध्यक्ष पद भूषविले, इंग्लंड मधील सर्वोच्च पुरस्कारचे मानकरी होते. जर्मनीत जावुन हिटलरला भेटून आले होते. भारतातील संस्थानिक आणि मांडलिकांचे ते अध्यक्ष होते. ब्रिटिशांच्या दरबारात त्यांचा दबदबा होता. बडोदा संस्थानातील अनेक क्रांतीकर काम त्यांनी केले. देशातील पहिले संस्थान होते जेथे बंद गटारी होत्या. पंचायत राज, ग्रामपंचायतींची स्थापना करणारा पहिला राजा… मुसलमान महिलांकरता प्रदान शाळा चालू केल्या. आदिवासींच्या मुलांमुलींना महाराष्ट्रात, गुजरात, बडोदा मध्ये वस्तीगृह बांधले. त्यांना शिष्यवृत्ती दिल्या. पहिली आयटीआय, इंजिनिअर काॅलेज, पहिली महिलांसाठी काॅलेज बडोदा येथे सुरू केली.
भारतातील महाराज पहिले राजे आहेत की, त्यांनी संपूर्ण जग भ्रमण केले. परंतु असा महान, क्रातीकार, आधुनिकतेचा राजाची उपेक्षाच राहिली. आम्ही म्हणालो ते गुजरातचे राजे आहेत आणि गुजराथी म्हणाले ते महाराष्ट्राचे आहेत. त्यामुळे हा राजा फुले शाहूआंबेडकर यांच्या ओळीत विराजमान झाले नाहीत. फुले, शाहू, आंबेडकर यांना मदतीचा हात देणारा राजा मात्र उपेक्षितच राहिला. अश्या ह्या महान आधुनिकीकरणचा जनक, क्रांतीकरक, समाजसेवक, अहिर पुत्र, कान्हदेशाचा पुत्र, श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांना त्यांच्या स्म्रृती दिनी कोटी अभिवादन करतो
प्रवक्ता
खान्देश हित संग्राम
९००४९३२६२६

स्वतंत्र भारताच्या आधुनिकीकरणचा शेवटचा राजा श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड 2
स्वतंत्र भारताच्या आधुनिकीकरणचा शेवटचा राजा श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड

2 thoughts on “स्वतंत्र भारताच्या आधुनिकीकरणचा शेवटचा राजा श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड”

Leave a Comment