लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले यांना राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मान

लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले यांना राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मान

लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले यांना राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मान

📍 छत्रपती संभाजीनगर | १७ जुलै २०२५

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “१०० शिक्षक क्लब ऑफ जालना” यांच्यातर्फे राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धेत मिलिंद कला महाविद्यालयाचे लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या स्पर्धेतील निबंधासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित सहा विविध विषय देण्यात आले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून १७७ शिक्षकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

🗓 पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (१३ जुलै) जालना येथील जे. ई. एस. महाविद्यालयात पार पडला. या वेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री होते.

कार्यक्रमात राजेभाऊ मगर आणि प्रा. एम. जी. जोशी यांच्या हस्ते लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी मंदाकिनी खलसे, संदीप इंगोले, साजिद खान पठाण यांची विशेष उपस्थिती होती.

प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान, उपप्राचार्य डॉ. संतोष बुरकुल, आणि विनायक पवार यांनी डॉ. देसले यांचे विशेष अभिनंदन केले.

लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले यांना राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मान
लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले यांना राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मान

Leave a Comment