औद्योगिक वसाहत रावेर धुळे
रावेर(धुळे) येथे निर्माण होणाऱ्या औद्योगिक वसाहतीमुळे शहरातील स्थानिक बेरोजगारांची संख्या कमी होईल का.?
धुळे तालुक्यातील रावेर येथील औद्योगिक वसाहतीचा विकास आणि विस्तार करण्यासाठी रावेर (धुळे) एमआयडीसीच्या विकास आणि विस्तारासाठी दि.२४ एप्रिल २०२५ रोजी महसूल मंत्री मा.श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.
या बैठकीसाठी धुळे शहराचे आमदार श्री. अनुप अग्रवाल उपस्थित होते तर ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. रावेर एमआयडीसीचा विस्तार करण्याचा विषय अनेक दिवसापासून प्रलंबित होता. गट नंबर ८० व गट नंबर ११ या क्षेत्रातील २०१७ एकर जागा रावेर एमआयडीसी करता उपलब्ध होणार असून, यासाठी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री जयकुमारभाऊ रावल व आमदार अनुपभैया अग्रवाल हे प्रयत्नशील होते.
महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी रावेर एमआयडीसीला जागा देण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला केले आहेत. दोन हजार एकर जमिनीवर औद्योगिक वसाहतीचे विस्तारीकरण होणार आहे. त्यासोबतच धुळे शहर आणि जिल्ह्याचे औद्योगिक विस्तारीकरण देखील होणार आहे. ही बाब आम्हा धुळे शहर वासियांसाठी अभिमानाची आहे, तेवढीच बेरोजगारांसाठी दिलासा दायक देखील आहे. सद्यस्थितीत अवधान तसेच नरडाणा येथील औद्योगिक वसाहतीत स्थानिक कामगारांपेक्षा परराज्यातील कामगारांची भरती जास्त आहे.
ही बाब धुळेकरांना गंभीरपणे विचार करायला लावणारी आहे. जिल्हा आणि शहराचे औद्योगीकरण होत असताना त्यामागे स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा अशी अपेक्षा असते. परंतु स्थानिक कामगार हे वेळप्रसंगी संघटित होऊन संघटना स्थापन करत असतात, त्यामुळे अनेक वेळेला अशा संघटनेचा उद्योजकांना उद्योग चालवताना अडचणीचे ठरू शकते, त्यामुळे धुळे एमआयडीसीतील अनेक उद्योगांमध्ये परप्रांतीय कामगारांचा अधिक भरणा आहे.
औद्योगिक वसाहतींमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना अत्यंत किरकोळ वेतन दिले जाते. असे असताना देखील मात्र परप्रांतीय कामगारांना औद्योगिक वसाहतीत कोणतीही जीवित सुरक्षितता नाही. ही गंभीर बाब आहे. नरडाणा व धुळे येथील औद्योगिक वसाहतींमध्ये अधून मधून अपघाताच्या घटना होत असतात.
त्यातून परप्रांतीय कष्ट करणाऱ्या तरुण कामगारांचाच अधिक जीव गेल्याच्या अनेक घटना धुळे औद्योगिक वसाहतीत घडलेल्या आहेत.
अशा अपघातात मृत पावलेल्या परप्रांतीय मृत कामगारांच्या परिवारांना कोणतीही नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही असे देखील तुम्ही दर्शनास येते. कमी गुंतवणूकीतून अधिक पैसा कमावण्याच्या लालसेपोटी, धुळे जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार तरुण कामगारांचा रोजगार बुडवून कमी वेतनात परप्रांतीय कामगारांना आपल्या उद्योगात रोजगार देणारे उद्योजक मात्र परप्रांतीय कामगारांना अक्षरशा गुलामासारखी वागणूक देत असतात. याबाबत मागील आठवड्यातील “साप्ताहिक खान्देश सम्राट” अंकाच्या संपादकीय मध्ये आम्ही लेखांकित केले होते.
धुळे औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था अत्यंत दयनीय असते. औद्योगिक क्षेत्रातच त्यांची निवासाची व्यवस्था असल्यामुळे त्या ठिकाणी हवा आणि जल प्रदूषण प्रणव क्षेत्र असते, यातून त्या ठिकाणी काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना औद्योगिक दूषित हवेमुळे दम्याचा आजार दूषित पाणी पिल्यामुळे अतिसार पोटफुगी सदृश्य आजार होत असतात, एकंदरीत त्या कामगारांच्या आरोग्यास बाधा पोहोचत असते.
याबाबत औद्योगिक वसाहत प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्ट्रिंग ऑपरेशन केल्यास धुळे एमआयडीसीतील अनेक उद्योगात स्थानिक कामगारांसह परप्रांतीय कामगार किती असुरक्षित पणे काम करत आहे.? सिमेंट कंपनीचे धुळ इतकी उडते की त्यांचे नियोजन नाही प्रदुषण कार्यलय काय करते आहे हा पण एक संशोधनाचा विषय बनत जात आहे.
हे ऑन द स्पॉट निदर्शनास येईल. म्हणूनच याबाबत गंभीरपणे नमूद करावेसे वाटते की विस्तारित धुळे रावेर एमआयडीसीच्या दोन हजार एकर जागेत स्थिरावणाऱ्या उद्योगात जास्तीत जास्त स्थानिक रोजगारांना सुरक्षितपणे रोजगार मिळावा.
त्यासाठी एमआयडीसी प्राधिकरणाने त्या ठिकाणी उद्योगासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा रस्ते पाणी लाईट अग्निशमन सेवा सक्षम कराव्यात. मागील काही महिन्यांपूर्वी अवधान येथील औद्योगिक वसाहतीतील संजय सोया साल्हवंट प्रकल्पात वेल्डिंग करताना दोन तरुण परप्रांतीय कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता, उद्योगात अशा घटना संभाव्य असतात.
परंतु अशा दुर्दैवी घटनांना पायबंध घालण्यासाठी तेवढ्याच उपाययोजना देखील सक्षम असाव्यात, तरच प्रस्तावित नवीन रावेर एमआयडीसी धुळे शहराची भाग्यलक्ष्मी ठरेल. आणि काही प्रमाणात धुळे शहराची बेरोजगारीची चिंता देखील कमी होईल.
खान्देश सम्राट संपादक
हेमंत जगदाळे धुळे
Really insightful article! It’s great to see discussions around responsible gaming gaining traction. Thinking about easy access, a smooth jili pg login is key for a positive experience – plus, quick app downloads are a bonus! Let’s prioritize fun and safety.