“सुक्ष्मजीवांचे जग आणि तुम्ही” या उपक्रमाला शालेय विद्यार्थ्यांचा उत्साही प्रतिसाद
दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त), जळगाव येथील सुक्ष्मजीवशास्त्र विभागात शालेय विद्यार्थ्यांसाठी “सुक्ष्मजीवांचे जग आणि तुम्ही” या उपक्रमांतर्गत ए. टी. झांबरे शाळेतील नववी इयत्तेतील 120 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांमध्ये सुक्ष्मजीवशास्त्र विषयाबद्दल जागरुकता व रुची निर्माण करणे, सुक्ष्मजीवशास्त्रातील विविध रोजगाराच्या संधी विद्यार्थी व पर्यायाने समाजापर्यंत पोहोचविणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमाच्या आरंभी विभागप्रमुख प्रा.डॉ.केतन नारखेडे यांनी आपण सुक्ष्मजीवांच्या सहवासात कसे राहतो,त्यांचे आपल्या जीवनात किती महत्व आहे आणि कोणते विविध उत्पादने आपल्याला सुक्ष्मजीवांद्वारे मिळतात आदी बाबींवर चर्चा केली आणि विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्माण केली. त्यानंतर विभागाच्या विविध प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना दाखविण्यात आल्या.
यात प्रा.प्रसाद निकुमे, प्रा.अभिजित पाटील, डॉ.सेजल पाटील, प्रा.सचिन चन्नावत, प्रा.निशा जाधव व प्रा.मानसी जाधव यांनी सूक्ष्मदर्शक, सुक्ष्मजीवांच्या वाढीसाठी आवश्यक उपकरणं, सूक्ष्मदर्शकाखाली सुक्ष्मजीव, त्यांचे विविध प्रकार इत्यादी गोष्टींवर मार्गदर्शन केले आणि प्रात्यक्षिक दाखविले. डाॅ.संगीता चंद्रात्रे व प्रा.राजेश सगळगिळे यांनी केंद्रीय उपकरण प्रयोगशाळेत मोलेक्युलर बायोलॉजी, फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी व अनालिटीकल केमिस्ट्री च्या उप-प्रयोगशाळेत सर्व उपकरणांची सखोल माहीती दिली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या शिक्षकांनी देखील सकारात्मक सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन डॉ.नयना पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी श्री.महेश पाटील, श्री.अनिल पाटील व ईतर सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.




राष्ट्रीय मायक्रोबायोलिम्पियाड स्पर्धेत मू.जे. महाविद्यालयाची चौथ्या क्रमांकावर निवड
मू.जे. महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागात नेट सेट ची कार्यशाळा
मू.जे. च्या सुक्षजीवशास्त्र विभागात अमेरिकेतील उच्च शिक्षण’ या विषयावर व्याख्यान