अमेरिकेतील उच्च शिक्षण व संधी
दि. 15 फेब्रुवारी 2024 रोजी जळगाव येथील मू.जे.महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागात ‘अमेरिकेतील उच्च शिक्षण व संधी’ या विषयावर एज्युकेशन यु.एस.ए., मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पदव्युत्तर च्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित केले होते. ह्या व्याख्यानांतर्गत एज्युकेशन यु.एस.ए., च्या मुंबई शाखेतील सल्लागार डाॅ. आदिती लेले ह्या प्रमुख वक्त्या म्हणुन लाभल्या. M J College Jalgaon
डाॅ. आदिती लेले ह्या प्रमुख वक्त्या
सदर व्याख्यानात डाॅ. लेले यांनी अमेरिकेतील एज्युकेशन यु.एस.ए. या अधिकृत शासकीय संस्थेबद्दल माहीती दिली. एज्युकेशन यु.एस.ए. या शासकीय संस्थेचे भारतात न्यु.दिल्ली, कोलकाता, चेन्नई, हैद्राबाद व मुंबई येथे कार्यालय आहेत. सदर व्याख्यानात डाॅ.लेले यांनी अमेरिकेतील विविध विद्यापीठं, तिथे उच्च शिक्षण घेण्यासाठीची सविस्तर प्रक्रिया व आवश्यक असणारी तांत्रिक माहीती दिली.
विविध शिष्यवृत्ती
यासोबतच त्यांनी उपलब्ध असलेल्या विविध शिष्यवृत्तीचे देखील विश्लेषण केले. सदर व्याख्यानाची प्रस्तावना व आभार प्रदर्शन व्याख्यानाचे समन्वयक प्रा.अभिजित पाटील यांनी केले. व्याख्याना प्रसंगी प्रा.डॉ.केतन नारखेडे, डाॅ.नयना पाटील, राजेश सगळगिळे व ईतर प्राध्यापकवृंद उपस्थित होते.
मुख्य लेख आणी बातम्या
अनाथांचे देवरुप घर श्री शंकरबाबा पापडकर
मुलींच्या शिक्षणाची चिंता मिटली पालकांनो आपल्या मुलींना खुप शिकवा
1 thought on “मू.जे. च्या सुक्षजीवशास्त्र विभागात अमेरिकेतील उच्च शिक्षण’ या विषयावर व्याख्यान”