महाराष्ट्र राजकारण पवार आणि फडणवीस

महाराष्ट्र राजकारण पवार आणि फडणवीस

भाग एक महाराष्ट्र राजकारण

राधेसुता तेंव्हा कुठे होता तुझा धर्म?पवार आणि फडणवीस जुगलबंदी! महाराष्ट्र राजकारण


         राधेसुता तेंव्हा कुठे गेला होता तुझा धर्म? महाभारतात कुरुक्षेत्रावर कर्णाच्या रथाचे चाक भूमीने गिळले. तें चाक उपसून काढण्यासाठी कर्ण निशस्त्र होऊन रथाखाली उतरला. तेंव्हा अर्जुनाने गांढीव धनुष्य खाली ठेवलं. तेंव्हा कृष्ण म्हणाला, “कांय झालं? तु थांबलास का?” अर्जुन म्हणाला, “कर्ण निशस्त्र आहे. त्याच्याशी युद्ध केलं तर तों अधर्म होईल.” तेंव्हा कृष्ण अर्जुनाला म्हणतो, “अरे वेड्या कर्ण तुला धर्म युद्धात अजिंक्य आहे. धर्म युद्धात तु त्याला हरवूचं शकत नाहीस. नियतीने तुला ही अखेरची संधी दिली आहे. उचल धनुष्य लाव बाण!”


     तेंव्हा अर्जुन कर्णावर बाणाचा वर्षाव करतो. त्याला थांब म्हणत कर्ण उदगारतो, “अर्जुना थांब, माझ्या रथाच चाक जमिनीत रूतल आहे. मी निशस्त्र आहे. तेंव्हा माझ्यावर बाण चालवण हां अधर्म आहे.”


       मग त्याला कृष्ण म्हणतो, “राधे सुता अधमा आज तुला धर्म आठवला कांय? दुर्योधनाने भीमाला विष खाऊ घालून पाण्यात फेकून दिले राधे सुता तेंव्हा तुझा धर्म कुठे गेला होता? लाक्षा गृहात पांडवना जाळून मारण्याचा कट केला तेंव्हा तुझा धर्म कुठे होता, दुतात कपट करून पांडवांच राज्य लुटून नेलं तेंव्हा तुझा धर्म कुठे होता? भरदरबारात द्रौपदीच्या निऱ्याना दुशासनाणे हात घातला तेंव्हा राधेसुता तुझा धर्म कुठे गेला होता? अर्जुना धर्म युद्धात कर्ण तुला अजिंक्य आहे. उडव त्याचं मुंडक.”


        हां प्रसंग आठविण्याचं करणं म्हणजे भारतात लोकसभा निवडणुकीचं महाभारत सुरु आहे. प्रचार युद्धच्या कुरु क्षेत्रात दोन्ही पक्षाचे रथी महारथी शब्दांचे बाण सोडत आहेत. कुठे शिखंडीच्या मागे लपून अर्जुन भीष्मावर शर संधान करत आहेत. तर कुठे दुशासन आया बहिणींचा विनय भंग करत आब्रूला हात घालत आहेत.


        त्या धुमश्चक्रित शरद पवार साहेबांनी त्यांचा रथ करवीर नगरीच्या दिशेने वळवीला. तिथं छत्रपती शाहू महाराज यांचा बचाव करत पवार साहेबानी सांगितले, “छत्रपतींच्या गादीचा मान राखत भाजपने शाहू महाराजाच्या विरोधात उमेदवार न देता, कोल्हापुरची निवडणूक बिनविरोध करायला हवी होती.” त्याचं वेळी देवेंद्र फडणवीस यांचा रथ साताऱ्यात होता. तें छत्रपती उदयन राजाच्या बाजूने युद्ध करत होते. तिथून त्यांनी करवीर नगरीकडे शब्द बाण सोडला. म्हणाले, “शरद पवार साहेब दुटप्पी आहेत. कोल्हापुराची गादी छत्रपतींची गादी आहे मग साताराची गादी छत्रपतींची गादी नाही का?”


       या वाग्बाणाला उत्तर द्यायला जयंत पाटील आपला घोडा घेऊन पुढे सरसावले. म्हणाले “तस नाही तस नाही, आम्ही आमचा उमेदवार शशिकांत शिंदे यांचं नावं जाहीर केल्यावर भाजपने उदयन राजे यांचं नावं जाहीर केलं.” मग त्यात कांय झालं. शिंदे नंतरही माघार घेऊ शकत होते. साताऱ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाने शिंदेचं नावंचं फक्त जाहीर केलं होतं. भाजपचे उमेदवार संजय मंडलिक तर तिथे विद्यमान खासदार होते. वा रे व्वा पाटील वा, त्यांना म्हणता, कोल्हापूरच्या छत्रपती विरुद्ध त्यांचा 5 वर्षा पासून खासदार असलेला सीटिंग उमेदवाराला माघार घ्यायला सांगता, पण तुम्ही एक दिवसापूर्वी जाहीर केलेला उमेदवार मागे घेणार नाही. हे दुटप्पीचं नाही तर बहूटप्पी धोरण झालं.


       त्यात संजय उवाच म्हणजे संजय राऊत उवाच कोल्हापुरात छत्रपती विरुद्ध मत मागितली तर कोल्हापूरकर मोदींना विसरणार नाहीत. मग साताऱ्यात छ उदयन राजे भोसले यांच्या विरोधात मतदान करणाऱ्या शरद पवार यांना सातारकर कसे विसरतील?
छत्रपतींच्या गादीचा मान राखलाच गेला पाहिजे. तरी पण टाळी एका हांताने वाजणार नाही. राजा आणि प्रजा दोघांनी संहिता पाळलीच पाहिजे! म्हणजे कांय तें बघू यात पुढच्या भागात.
क्रमशः 

बापू हटकर

राधेसुता तेंव्हा कुठे होता तुझा धर्म? पवार आणि फडणवीस जुगलबंदी!


 भाग दुसरा महाराष्ट्र राजकारण


        
        सातारची गादी मोठी पाती म्हणजे छ संभाजी महाराज यांचा वारसा आहे. तर कोल्हापुरची गादी धाकटी पाती म्हणजे छ राजाराम महाराज यांचा वारसा आहे. म्हणून तर सातारच्या गादीचा मान पहिला आणि मोठा आहे. पण ज्याला जगभर मराठा सम्राज्य म्हणून इतिहासात ओळखलं जातं तें मराठा साम्राज्य हे सातारच्या आधीपत्या खाली झालं आहे. अहत पेशावर तहत तंजावर हां नारा सुद्धा याच सातारच्या गादी आधीपत्या खाली गाजला. अटकेपर झेंडे याच गादीच्या नेतृत्वाखाली झालं. तिसऱ्या पानिपतचा महासंग्राम ही याच गादीच्या आधीपत्या खाली झाला.


        आता काही लोक जातीय वादातून मराठा सम्राज्यला पेशंवाई म्हणतात तें चूक तर आहेच, पण तों होळकर, शिंदे, पवार, गायकवाड, नागपूर कर भोसले, यांच्या पराक्रमाचा अपमान आहे. मराठा सम्राज्याचे स्वामी हे सातारचे छत्रपतीचं होते. पेशंवे आणि ईतर सर्वं सरदार सुभेदार हे स्वतःला छत्रपतींचे चाकर म्हणवून घेत असत. मराठा साम्राज्य ही एक जगातील आदर्श राजावट होती. महान स्वातंतत्र्याचीं ठेव आहे ती.


        तर कोल्हापुरची गादी एका मर्यादित प्रदेशा पुरती आहे. पण आपण त्यांच्यात भेदभाव करता कामा नये. दोन्ही गांद्या समोर सारखाच झुकलं पाहिजे. जे आपच्या पक्षात तें छत्रपती श्रेष्ठ असा भेद करता कामा नये.


        शरदचंद्रजीं पवार साहेब आणि संजय राऊत साहेब तुम्हाला सांगतो, तें छत्रपती आहेत आणि आपण सामान्य मावळे आहोत. तें राजा आपण प्रजा तेंव्हा आपण सर्वांनी दोन्ही गाद्याचा मान सारखा ठेवलाचं पाहिजे. आपल्या पक्षात जे तें छत्रपती मोठे आणि विरोधी पक्षात असलेले छत्रपती छोटे हे जे तुम्ही तुमच्या वागण्या बोलण्यातून दाखविता तें चूक आहे. छत्रपती पेक्षा तुमचा पक्ष मोठा हे जे तुम्ही दाखविता तें बरोबर नाही.


           खरं तर  26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने संवेदन स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 रोजी तें अमलात आले, त्याचं दिवशी राजा, प्रजा, नर नारी, उच्चं नीच, तसेच धार्मिक भेद संपले आणि प्रत्येक भारतीय सामान झाले. सर्वांनां समान अधिकार. जेवढी राजाच्या मताची किंमत तेंव्हढीच प्रजेच्या मताची किंमत. राजाला त्यांच्या राज्याच्या मालकी हक्का पोटी तनखा देऊन त्यांचे राजपद काढून घेतले. विशेष अधिकार काढून घेतले. पुढे तर तनखें सुद्धा बंद केले. राजाच प्रजेपेक्षा वेगळे पण तेवढं एकच होतं तनखा. तनखा गेल्यावर सर्वं समान पातळीवर आहे.


        तरीही घटनात्मक अस्तित्वात नसलेल्या छत्रपतींच्या गादीचा महाराष्ट्र सन्मान करतो. तों सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्याना मुजरा करतो. याच कारण छ शिवाजी महाराज यांचं आभाळा एवढ कर्तृत्व! त्या कर्तृत्व कर्तृत्वाची जाण ठेवून महाराष्ट्र त्यांच्या पुढे झुकतो. अशा वेळी छत्रपती आणि मावळे यांच्यात एक अलिखित आचार संहिता आहे. ती दोन्ही बाजूनी पाळली गेली पाहिजे.


        लोकशाहितील निवडणूक ही राजकीय कुस्ती आहे. त्या कुस्तीत छत्रपतींनी बहुतेक उतरू नये असे मला वाटते. होता होईतो सर्वं पक्ष संमतीने बिनविरोध पद घ्यावे. तसें तें मिळत नसेल तर मग राजकीय कुस्ती खेळू नये. खेळायचीच असेल तर मग राजा आणि प्रजा हां भेद संपून दोन परस्पर विरोधी सामान्य पहिलवान म्हणून ती कुस्ती होईल. तिथे कुस्तीचे नियम लागू होतील. राजा प्रजा ही संहिता चालणार नाही.

राजा बरोबर सामान्य नागरिक कुस्ती खेळेल तेंव्हा तें एकमेकांवर तुटून पडतील. कुस्ती करताना राजाची मानगुटी, मनगट, कानाला प्रतिस्पर्ध्याने हात लावू नये, राजा समोर मान वर करून वा नजरेला नजर भिडवू नये, राजाला पायं लागता कामा नये. हे असले कायदे चालणार नाहीत. तसें तें कायदे घटनेत सुद्धा लिहिलेले नाहीत. दोन कुस्तीगीर मल्ल जेंव्हा प्रतिस्पर्धी म्हणून कुस्ती खेळायला आखाड्यात उतरतात तेंव्हा तें समान असतात. त्यांचे अधिकार समान असतात. त्यांच्यात भेद करता येणार नाही.


बापू हटकर


 


 

Leave a Comment