धुळे जिल्ह्यात पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन

धुळे जिल्ह्यात पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन

कलाकार सादर करणार कलाविष्कार


स्थानिक कलावंतासह मुंबईतील सिनेनाट्य कलाकार सादर करणार कलाविष्कार
जिल्हावासियांनी उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे आवाहन
धुळे, दिनांक 23 फेब्रुवारी, 2024 (जिमाका वृत्त) : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व धुळे जिल्हा प्रशासनच्यावतीने पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन पोलीस कवायत मैदान, धुळे  या ठिकाणी  26 फेब्रुवारी ते 1 मार्च, 2024 कालावधीत करण्यात आले आहे. या महासंस्कृती महोत्सवात स्थानिक कलावंतासह मुंबईतील सिनेनाट्य कलावंताचा प्रेक्षणीय कलाविष्कार सादर होणार आहे. या महासंस्कृती महोत्सवास जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ

राज्याचे मुख्यमंत्री ए कनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला, संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यात 26 फेब्रुवारी ते 1 मार्च, 2024 या कालावधीत महासंस्कृती महोत्सव संपन्न होणार असून या महोत्सावातील सर्व कार्यक्रमांना नागरिकांना प्रवेश विनामुल्य आहे.


असा आहे पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सव


पहिला दिवस सोमवार,

26 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 8.30 ते 11 दरम्यान शिवतीर्थ-महानगरपालिका-राजवाडे संग्रहालय, बारापत्थर चौक मार्ग पोलीस कवायत मैदान या मार्गावर रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात ढोलताशा पथक, लेझिम पथक, कलशधारी मुली, कानुबाई देखावा, आदिवासी संस्कृती दर्शन, टिपरी नृत्य, वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात येणार आहे.

सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज, पर्यटन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्धटन संपन्न होईल. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार डॉ. हिना गावित, आमदार सर्वश्री. अमरिशभाई पटेल, किशोर दराडे, सत्यजित तांबे, जयकुमार रावल, काशिराम पावरा, कुणाल पाटील, श्रीमती मंजुळा गावित, फारुख शहा, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सायंकाळी 5 ते 5.30 वाजता ‘शहनाई तबला जुगलबंदी’हा कार्यक्रम आर. के. शहनाई ग्रुप, धुळे हे सादर करतील. सायंकाळी 5.30 ते 7.20 वाजता ‘शाहिरी शिव गर्जना’हा कार्यक्रम सांगली येथील शाहीर श्री. पृथ्वीराज माळी व सहकारी सादर करतील. सायंकाळी 7.30 ते 10 वाजता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम हास्यजत्रेतील विनोदी कलाकार सादर करतील.


दुसरा दिवस मंगळवार

, 27 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 10 ते 10.30 वाजता धुळे येथील अंध मुला-मुलींच्या शाळेचे विद्यार्थी ‘गीतगायन कार्यक्रम’सादर करतील. सकाळी 10.30 ते 11.00 वाजता ‘वहीगायन कार्यक्रम’नवनाथ वही गायन मंडळ, बोरकुंड हे सादर करतीत. सकाळी 11 ते 12 वाजता ‘खान्देशी लोककला आणि आहिराणी लोकगीत कार्यक्रम’श्री.सदगुरु सांस्कृतिक कला बहुउद्देशिय संस्था, धुळे हे सादर करतील. दुपारी 12 ते 1 वाजता प्रा. केले मुकबधीर विद्यालय, धुळे सन्मती मतीमंद विद्यालय, धुळे, नवजीवन अस्थिव्यंग शाळा, श्री. संस्कांर मतीमंद मुलींचे बालगुह व कार्यशाळा धुळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांचा कार्यक्रम होईल.

सायंकाळी 5 ते 5.30 वाजता धुळे येथील श्री.बालन सर व सहकारी भरतांजली ‘भरतनाट्यम नृत्य’सादर करतील. सायंकाळी 5.30 ते 6.20 वाजता सिद्धांत बहुउद्देशिय संस्था, धुळे हे ‘नृत्य अविष्कार’हा कार्यक्रम सादर करतील. सायंकाळी 6.20 ते 6.30 वाजता ‘महाराष्ट्राची संस्कृती’नृत्य एस.व्ही.के.एम.स्कुल, धुळे हे सादर करतील. सायंकाळी 6.30 ते 7.30 वाजता ‘आपली मायबोली खान्देशी अहिराणी गीते’आबा चौधरी, धिरज चौधरी व खान्देश किंग ग्रुप बजरंग बॅण्ड, शिरपूर सादर करतील. सायंकाळी 7.30 ते 10 वाजता डॉ. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे व सहकारी, मुंबई हे ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम सादर करतील.


तिसरा दिवस बुधवार,

28 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 10 ते 10.30 वाजता ‘जागर लोककलेचा’तथागत हा कार्यक्रम गौतमबुद्ध बहुउद्देशिय संस्था, धुळे हे सादर करतील. सकाळी 10.30 ते 11.30 वाजता ‘अंगणी पारिजात फुलला’हा कार्यक्रम श्री. पारिजात चव्हाण व सहकारी, धुळे हे सादर करतील. सकाळी 11.30 ते 12.30 वाजता ‘मारुतीची जत्रा (बाल नाट्य )’ अनुभूती इंग्लिश मेडियम स्कुल, जळगाव हे सादर करतील. दुपारी 12.30 ते 1 वाजता चोपडा येथील दिनेश साळुंखे  ‘बाहुल्यांचे विश्व (कट पूतली)’ हा कार्यक्रम सादर करतील.

सायंकाळी 5 ते 6.30 वाजता ‘राइझिंग स्टार रॉक बॅण्ड’हा कार्यक्रम श्री. अजिंक्य  बगदे व सहकारी, धुळे हे सादर करतील. सायंकाळी  6.30 ते 7.30 वाजता ‘खान्देशी बाणा (गीत, गायन व नृत्य)’ हा कार्यक्रम लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्था, धुळे सादर करतील. सायंकाळी 7.30 ते रात्री 10 वाजता ‘वारी सोहळा संतांचा’हा कार्यक्रम प्रो. इव्हेटिस, मुंबई श्री.ओमकार वसुधा अशोक सावंत हे सादर करतील.


चौथा दिवस गुरुवार

29 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 10 ते 11 वाजता ‘जगणं तुमचं आमचं’ हा कार्यक्रम राजेंद्र पवार व सहकारी, साक्री हे सादर करतील. सकाळी 11 ते 12 वाजता ‘विधी (बालनाट्य)’ हा कार्यक्रम कमलाबाई शंकरलाल कन्या हायस्कुल, धुळेच्या विद्यार्थींनी सादर करतील. दुपारी 12 ते 12.30 वाजता जे.आर.सिटी हायस्कुल, धुळे चे विद्यार्थी ‘मल्लखांब’चे प्रात्यक्षिक सादर करतील. दुपारी 12.30 ते 1 वाजता ‘महाराष्ट्र दर्शन’हा कार्यक्रम श्रमिक बहुउद्देशिय सेवा संस्थेचे नटराज कला पथक, धुळे नारायण खताळ हे सादर करतील.

सायंकाळी 5 ते 6.30 वाजता गंधार वाद्यवृंद, धुळे हे ‘रंगदे बसंती’हा कार्यक्रम सादर करतील. सायंकाळी 6.30 ते 7.30 वाजता ‘आयत पोयत सख्यान’एकपात्री नाट्य प्रवीण माळी, शिरपूर हे सादर करतील. सायंकाळी 7.30 ते रात्री 10 वाजता ‘मोगरा फुलला’हा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवन चरित्र्यावर आधारित प्रा. गणेश शिंदे व सन्मिता शिंदे सूर नवा, ध्यास नवा महाविजेत्या व सहकारी, पुणे यांचा कार्यक्रम सादर होईल.


पाचवा दिवस शुक्रवार

1 मार्च, 2024 रोजी सकाळी 10 ते 10.30 वाजता ‘शाहीरी जलसा’हा कार्यक्रम महात्मा फुले कृषक मंडळ व बहुउद्देशिय संस्था, त-हाडी, ता.शिरपूर हे सादर करतील. सकाळी 10.30 ते 10.50 वाजता ‘बेलसर स्वारी’हा कार्यक्रम कृष्ण नगर हायस्कुल, धुळेचे विद्यार्थी सादर करतील. सकाळी 10.50 ते 1 वाजता धुळे जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी हे ‘कवी संमेलन’सादर करतील.

सायंकाळी 5 ते 7 वाजता परिवर्तन, जळगाव हे ‘अरे संसार संसार (संगीत व नाट्य)’ सादर करतील. सायंकाळी 7 ते 7.30 वाजता जिल्हा प्रशासनामार्फत ‘समारोप कार्यक्रम’ होईल. सायंकाळी 7.30 ते 10 वाजता ‘शब्द सुरांची भावयात्रा’हा कार्यक्रम मुंबई येथील भिमराव पाचाळ व सहकारी सादर करतील. याप्रमाणे पाच दिवस धुळेकरांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवाणीचा आनंद घेता येणार आहे.

शिवकालीन शस्त्र प्रदर्शन

या महासंस्कृती महोत्सवात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, हस्तकला प्रदर्शन, बचतगट उत्पादन, वस्त्र संस्कृती दालन, वन्यजीव व छायाचित्र प्रदर्शन, तसेच  बचतगट उत्पादनाचे दालनही पाहण्याची अभुतपूर्व संधी उपलब्ध होणार आहे. धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महासंस्कृती महोत्सवात सहभागी होऊन कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी केले आहे.

धुळे जिल्ह्यात पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन
धुळे जिल्ह्यात पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे दिले जाणारे या वर्षीचे खान्देश भूषण खान्देश उद्योग रत्न खान्देशश्री पुरस्कार जाहीर

अहिरानी निरुपण पुस्तक संत तुकाराम ना आगाजा

Khandeshi Ahirani Blogs

राज्यसभेवर खान्देशातून किती लोक घेतले?

खान्देशी कलावंत दिनेश चव्हाण यांना दादासाहेब फाळके पुरस्का

सातवे अहिराणी साहित्य संमेलन अध्यक्ष ओळख

कान्हदेशी विविध बोली लेखपट