धुळे वं जळगाव महासंस्कृती मोहत्सव धुळे वं जळगाव

धुळे वं जळगावातील महासंस्कृती मोहत्सव! भाग पाचवा

महासंस्कृती मोहत्सव! भाग-1    

महासंस्कृती मोहत्सव!भाग-2

महासंस्कृती मोहत्सव भाग-3

धुळे वं जळगावातील महासंस्कृती मोहत्सव! भाग चवथा

वीरनृत्य वं झालं नृत्य

वीरनृत्य वं झालं नृत्य-खान्देशातील सर्वं जातीत वीरनृत्य करण्याची पद्धत आहे. यात भगत असतो. डांगा, डफड आणि बासरी असतें. सोबत नडगी(खान्देशी संबळ), सूर सनई ही बेभान करणारी वाद्य असतात. सध्या अहिराणी भिलाऊ गाण्याचा युट्युबवर जो धूम धडाका सुरु आहे. त्यात ही खान्देशी संबळ आणि तिचा ठेका यांचा मोठा भाग आहे. यात पावरीही आहे तिच्यावर नंतर बोलू.

वीरनृत्य


       वीर नृत्य हे वीर बसविताना करायचे नृत्य आहे. घरातील कोणी तरुण व्यक्ती आकाली किंवा अपघाती मृत झाला असेल तर त्याच्या स्मरणार्थ दगडाची मूर्ती बसवतात. त्याला ईर किंवा चिरा म्हणतात. ईर हां अहिराणी शब्द आहे. त्याचा मराठीत वीर असा अर्थ असतो. कोणी स्त्री मेलेली असेल तर तिच्या स्मरणार्थ जीं मूर्ती बसवितात तिला *वडदखीन* म्हणतात. कोणी किशोर बाल वयातील मुलासाठी हाच विधी केला तर त्याला मुंज्या म्हणतात. वाद्य नृत्य हीच असतात. पण वीर बसविताना मोठा थाट माट केला जातो.
       पाच पुरुष घेतात. ते विवाहित असले पाहिजेत. त्यांना राजेशही योध्याचा पेहरावं करतात. कमरेला पितांबर, अंगात सदरा नसतो. मोठे उपरणे विशिष्ट पद्धतीने अंगावर बांधतात. डोक्यात खान्देशी पगड्या, चेहऱ्यावर मेकअप आणि हातात नंग्या तलवारी. तलवारीच्या टोकावर लिंबू. ही तलवार उजव्या हातात घेऊन वीर नाचायला तयार.


        यांच्या सोबत अजून दोघे असतात. एक यजमान असतो. याच्याच घरातील कोणी तरी मेलेल्या व्यक्ती प्रित्यर्थ वीर बसवायचे असतात. वीर दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे तापी नदीतील गोटे आणतात किंवा घडीव दगडी मूर्ती आणतात. हे गोटे किंवा मूर्ती एका वेळूच्या कोऱ्या टोपलीत एक लाल मद्रा कापड अंथरून त्याते हे गोटे वा मूर्ती रुपी वीर बसवितात. या टोपलीला ढाल म्हणतात. ही ढाल डोक्यावर घेऊन यजमान तयार करतात. सहा लोक झाले. सातवा एक भगत असतो. भगताचे डोक्यावरील पूर्ण वाढ झालेले केस मोकळे असतात. त्याच्या हातात कुच्चा म्हणजे मोर पिसांचा जुडगा. खांद्यावर पान झोक. म्हणजे एकूण सात लोक तयार झाले.


        मिरवणुकीची सुरवात करताना, सर्वात पुढे बळीचा बकरा,  त्याच्या मागे वाजन्त्री त्यांच्या मागे ढाल डोक्यावर घेतलेला यजमान. त्याच्या मागे पाच वीर, विराच्या मागे भगत आणि भगताच्या मागे, सर्वं निमंत्रित गावकरी भाऊबंद, सगे सोयरे, इष्टमित्र परिवार. अशी ही मिरवणूक सूर झाल्यावर वीर हे मस्त पैकी वीरनृत्य सुरु करतात. गावभर मिरवणूक काढून नंतर ज्या जागी वीर बसवायचे तिथे जाऊन मिरवणूक थांबते. ही एक मोठी खान्देशी लोककला आहे. ती जिवंत रहावी म्हणून दोन कोटी रुपये आहेत.

झालंनृत्य

झालंनृत्य-ही प्रथा आणि नृत्य जवळ पास बंद पडली आहे. वधू पक्ष आणि वर पक्षातील वऱ्हाडी मंडळी एकमेकांनां भेटत असत तेंव्हा ही झालं नाचविण्याचं नृत्य केलं जायचं.

झालंनृत्य

भिल्ल नृत्य

भिल्ल नृत्य-खान्देशांतील मूळ जमातीतील एक मुख्य भिल्ल आदिवासी जमात आहे. त्यांच्या वसाहतीला भिलाटी म्हणतात. खांदेशात जवळपास एक भिलाटी असतेच असतें. गावात राहून यांनी आपली स्वतःची वेगळी भाषा, संस्कृती, वेशभूषा टिकवून ठेवली आहे. त्यातच त्यांचं संगीत, नृत्य हे टिकले आहे. सध्या अहिराणी वं भिलावू भाषेतील गाण्याची युट्युब वर जीं रेलचेल सुरु आहे ती श्रवणीय आणि लोकप्रिय होण्याचं एक कारण हे भिल्ल संगीत आणि नृत्य आहे.


        हे नृत्य लग्नात केले जाते. तसेच गावात मरी आईची मढी असतें. हिला महाराष्ट्रात जरीमरी किंवा गावदेवी म्हणतात. तर खांदेशात तीला मरीमाय म्हणतात. या मरिमायचा भगत भिल्लचं असतो. नऊरात्रीत या मरी मायची देवकाठी उभी करतात. यावेळी भगत याच वाद्याचा उपयोग करत नृत्य करत असतो. यावेळी डफडी आणि बासरी किंवा पावा वापरतात.


         भिल्ल नृत्यात ताल वाद्य एक मोठा ढोल असतो, एक ढोलगी असतें, तर सूर वाद्यात पावरी, पावा आणि मोरी पावा असतात. पावरी साधारण पंजाबी बिनसी साधर्म्य असणार सूर वाद्य आहे. यात सूर आणि सनई एकत्र जोडलेली असतात. याच नावं पावरी आहे. पावा+बासरी=पावरी असं ते समीकरण आहे. पाव्या मधील पा वं बासरितील री घेऊन पावरी शब्द तयार झाला. ठाणे पालघर जिल्ह्यात पावरीला तारपा म्हणतात तर खांदेशात पावरी म्हणतात. मोरी पवा हां तीन पेराचा पोकळ बांबू असतो. वरच पेर सुराच काम करतो. खालच पेर बासरीच काम करत आणि मधल्या पेरात तोंडाने हवा भरायची त्याला मोरी पवा म्हणतात.

महानूभाव पंथातील लीळा चरित्रात मोरीपवा वाद्याचा उल्लेख आहे. गुराखी मुलं मोरी पवा वाजवत असत. अशी नोंद आहे. ही वाद्य जीं सूर ताल वाजवितात त्याचं, नावं भिलघाई असलं तरी ही घाई सर्वं खान्देशी जाती जमाती व वाद्य यांच्या नृत्याचा ताल आहे. खान्देशी संबळ, सूर, सनई या वर तर भिल घाई खूप आकर्षक आणि चित्त वेधक वाजविली जाते. बँड, ताषा वर सुद्धा हां ताल वाजविला जातो. खान्देशी विवाह सोहळ्यांत सर्वं स्त्री पुरुष या तालावर ठेका धरून नाचतात.


           वन्ह हां जो लोककला प्रकार आपण पहिल्या लेखात पाहिला त्यातीत शंकर, पार्वती, आणि नंदी याच ठेक्यावर नाचतात. आता पर्यंत आपण 5 भागात खान्देशी लोक कलेचे एकूण 10 प्रकार पाहिले. बाकीचे पाहू पुढच्या भागात.
क्रमशः
बापू हटकर


 

1 thought on “धुळे वं जळगाव महासंस्कृती मोहत्सव धुळे वं जळगाव”

Leave a Comment