नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी खान्देशात जनआंदोलन
नार – पार – गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी खान्देशात जनआंदोलन उभारणार – विकास पाटील
संपुर्ण महाराष्ट्र जलसंपन्न व जलसमृध्द करणेसाठी सरकार कटिबद्ध व वचनबद्ध आहे.पण मग खान्देशवर अन्याय का असा संतप्त सावल उत्तर महाराष्ट्र जल परिषदेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी विचारला.
उत्तर महाराष्ट्रासाठी खान्देशसाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या नार – पार – गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार व स्थानिक लोकप्रतिनिधी कमालीचे उदासीन का ? दुर्लक्ष करण्याचं नेमकं कारण काय ? असे जल परिषद कार्याध्यक्ष एन एम भामरे
उर्वरित प्रकल्पांसाठी लाखो करोड रुपयाचा निधी उभारण्यासाठी राज्य सरकार तत्पर,सजग व सतर्क मग उपरोक्त प्रकल्पासाठी नकारात्मकता का? हे न उलगडणारं, न उमगणारं कोडं आहे…!
भिला पाटील नाशिक जिल्ह्यातील नार-पार चं खोरं हे अतीवृष्टीचं खोरं आहे तर गिरणा खोरं हे अतीतुटीचं खोरं आहे.नार,पार, तान,मान,अंबिका व दमणगंगा अशा १९ पश्चिम वाहिनी नद्यांचं सुमारे १४७ टीएमसी अरबी समुद्रात वाया जाणारं पाणी नैसर्गिक वळण बंधारे,धरणे व बोगदे तयार करुन किमान ५० टीएमसी पाणी पुर्व वाहिनी गिरणा,मोसम, पांझरा व बोरी नदीकडे वळविल्यास उत्तर महाराष्ट्रातील नाशिक,धुळे,जळगांव नंदुरबार या चार जिल्हे कायमचे जलसमृद्ध,जलसंपन्न,दुष्काळमुक्त, टँकरमुक्त व आत्महत्यामुक्त होतील.शेतीसाठी,पिण्यासाठी व उद्योगासाठी पाणी मिळेल. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील व तरुणाईचं स्थलांतर थांबेल…!
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प खान्देशचे सुपुत्र तथा केंद्रीय जलशक्ती मंत्री मा.ना.श्री.सी.आर.पाटील यांनी व्यवहार्य नाही म्हणून रद्द करणे अतार्किक,अनाकलनीय व अन्यायकारक आहे.हा प्रकल्प न झाल्यास उत्तर महाराष्ट्राचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही.मग पुढची पिढी आपणांस कधीही माफ करणार नाही.
उत्तर महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् करणेसाठी राज्य सरकारने व स्थानिक लोकप्रिनिधींनी केंद्राकडे यशस्वी,अभ्यासपूर्ण व आग्रही पाठपुरावा करावा.ही विनंती.प्रसंगी राज्य सरकारने स्वतःच्या हिमतीवर वॉटर बाँड अर्थात कर्जरोखे यांच्या माध्यमातून निधी उभारावा.
समृद्धी महामार्ग व मेट्रो प्रकल्पाच्या धरतीवर वा जागतिक बँकेकडून कर्ज उभारावे पण नार -पार – गिरणा नदीजोड पूर्ण करावा अन्यथा खान्देशात मोठ जन आंदोलन सुरू करावे लागेल प्रकल्पांसाठी शासनाने आग्रही व आक्रमक राहणं गरजेचं आहे.अन्यथा नार पारची लढाई आर पार लढू असेही उत्तर महाराष्ट्र जल परिषदेचे अध्यक्ष विकास पाटील म्हणाले.
केंद्र सरकारनी नारपार गिरणा योजना रद्द करा नंतर, खांदेशी पुढारीस समोर आते एकज सवाल से, खान्देश वाचाडो का खुर्शी वाचाडो!
अखिल खान्देश जिवन दायीनी नारपार गिरणा जोड प्रकल्प हाई स्वर्गीय भाऊसाहेब हिरे यांसन सपन व्हत. खान्देशन नंदनवन करणारी हाई योजना से. पन दुष्ट राजकारणी मोरारजी देसाई यांनी नेहरूनी मदत ली भाऊसाहेब हिरेसले राजकारण म्हाईन संपाड नी खान्देशन दुर्दैव सुरू झाय.
गुजरातनी खान्देश लुटाले सुरुवात करी नी महाराष्ट्रनी त्यासले आडाव नही. पयले डांग लीदा, मंग उकाई करता 156 गावे लीदात, मंग सरदार सरोवर करता 37 गावे लिदात, मंग नर्मदाना हक्क लीदा. आते नारपारन पानी लीद.
या हालतमा खान्देशना पुढारी जपेल सेत नी, जनता घोरी रहायनी. त्यामुळे खान्देशन वाळवंट व्हवा शिवाय रहाव नही. पुढारीस्ले नार पार पेक्षा खुर्शी जास्ती महत्त्वानी वाटस नी जनताले झोप महत्त्वानी वाटस!
कुर्हाडिचा दांडा गोतास काळ.
मोदी शहा यास्नी खेळी बी मस्त करेल से. पयले खांदेशी खासदार जो गुजराथ म्हाइन निवडि येतस, त्या *सी आर पाटील* यास्ले पयले केंद्रीय जलशक्ति मंत्री कर. नी त्यांस्ना हस्ते गिरणा-नार-पार योजना रद्द करि. हाउ से बेपारि मेंदू!
या अन्याय विरुद्ध खान्देशनी चेटी उठाले जोयजे. आंदोलन कराले जोयजे. आम्ही मुंबई परिसरमा राहानारा लोक कल्याणमा मोर्चा काढी रायनूत. बिस्तरवार दि. 8/8/2024 ले सकाय 11 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते तहसीलदार कार्यालय असा मोर्चा काढीसन तहसीलदार साहेब कल्याण यांस्ले लेखी निवेदन देण से. तवय जास्तीत जास्ती लोकेसनी मोर्चामा या.
बापू हटकर