एरंडोलमध्ये ‘नाते लेकीचे आणि माता-पित्याचे’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

एरंडोलमध्ये ‘नाते लेकीचे आणि माता-पित्याचे’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

एरंडोल (प्रतिनिधी): शिवसेना व युवासेना एरंडोल शहर व तालुक्याच्या वतीने कार्यसम्राट आमदार श्री. अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

ही विशेष व्याख्यानमाला ‘नाते लेकीचे आणि माता-पित्याचे – आजची सामाजिक गरज’ या विषयावर आधारित असून, विशेषतः महिलांसाठी व मुलींसाठी आयोजित केली आहे. हा कार्यक्रम ४ फेब्रुवारी २०२५ रोजी मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता आर. टी. काबरे विद्यालय, एरंडोल (जि. जळगाव) येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा व्याख्याते, लेखक व समाज परिवर्तनकार श्री. वसंत हंकारे सर आपले विचार मांडणार आहेत. ते राष्ट्रभूषण पुरस्कार, भारतीय नवजवान पुरस्कार आणि छत्रपती पुरस्कार विजेते असून, त्यांचे समाजकारण व राजकारण याची सांगड घालून लोकाभिमुख कार्य याबाबतचे विचार ऐकण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे.

या विशेष व्याख्यानात “घडीभव तु थांब जरा, एक त्यांची धाप वं, लई अवघड हाय गड्या उमगाया बाप वं…!” यासारख्या हृदयस्पर्शी विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिला व मुलींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण व वेळ:

📅 दिनांक: ४ फेब्रुवारी २०२५, मंगळवार
⏰ वेळ: सायं. ६ वाजता
📍 स्थळ: आर. टी. काबरे विद्यालय, एरंडोल, जि. जळगाव

आयोजक:

शिवसेना व युवासेना, एरंडोल शहर व एरंडोल तालुका