खान्देश महाराष्ट्राच्या सरकारकडून पडीत प्रांत

खान्देश महाराष्ट्राच्या सरकारकडून पडीत प्रांत

खान्देश – महाराष्ट्राच्या सरकारकडून पडीत प्रांत, खान्देशी जनतेला मूर्ख समजतात का?

उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, फडणवीस साहेब, हा विरोधाभास आहे का? आभास आहे का? भास आहे!

खान्देश म्हणजे महाराष्ट्र सरकारने पडीत (निकामी) प्रांत समजलेला भाग आहे. त्या भागातील जनता यांना बालिश दिसत आहे. आमच्या लोकप्रतिनिधींनाही ही राजकीय मंडळी महामूर्खात काढतात, हे फडणवीस यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.

नार पार गिरणा नदीजोड
नार पार गिरणा नदीजोड
खान्देश महाराष्ट्राच्या सरकारकडून पडीत प्रांत 3
खान्देश महाराष्ट्राच्या सरकारकडून पडीत प्रांत 5

आमची दिशा किती वेळा बदलणार तुम्ही? मुळात, तुम्हाला खान्देशला काही द्यायचेच नाही, फक्त मूर्ख समजायचे आहे. तीन आठवड्यात काय घडले बघा – केंद्रीय जलशक्ती मंत्री म्हणतात, नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प अव्यवहार्य आहे आणि म्हणून रद्द केला आहे. लगेच राज्य सरकार जाहीर करते की राज्यपालांनी मंजुरी दिली आहे, आणि एक पत्र सोशल मीडियावर फिरत आहे.

आमचे सत्ताधारी लोकप्रतिनिधींना काही देणे-घेणे नाही. पण जलसंपदामंत्री फडणवीस काय म्हणतात बघा: “उत्तर महाराष्ट्रातील अस्मितेचा नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पास राज्यपालांनी मंजुरी दिली असून ७०१५ कोटीची तरतूद मंजूर झाली आहे. तापी खोय्रातुन चणकापूर धरणात पाणी सोडण्यात येईल आणि मग ते पाणी गिरणा खोय्रात सोडण्यात येईल.”

खान्देश महाराष्ट्राच्या सरकारकडून पडीत प्रांत 7

हा विरोधाभास समजावा का, आभास समजावा का, आम्हाला भास झाला आहे असे समजावे? प्रकल्पाचे नाव नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प आहे, मग तापी खोय्रातून चणकापूर धरणात पाणी कसे येणार? म्हणजेच ही गुजरात सरकारची लबाडीची भाषा फडणवीस साहेब बोलत आहेत. काही दिवसांपूर्वी असेच आम्हाला मूर्ख बनविले होते: नारपार खोय्रातून गुजरात जितके पाणी उचलेल तितके पाणी आम्ही तापी खोय्रात खान्देशला देऊ.

आमचे नेते आणि जनता इतकी अनभिज्ञ का आहे? का आवाज उठवत नाहीत? सरकारपर्यंत पोहोचता येत नसेल, तर आपल्या मंत्र्यांना, लोकप्रतिनिधींना तरी जाब विचारा. निवडणुका येत आहेत. खान्देशातील मतदार सत्ताधारींचा गुलाम नाही आहे. यांना फक्त खान्देश वाचवायचा आहे. तरीही खान्देशावरच अन्याय का?

आता वेळ आली आहे की, ह्या सरकारच्या शेपटीवर पाय ठेवून, यांची नांगी ठेचावीच लागेल. सध्यातरी नारपार हा प्रकल्प नक्कीच चुनावी जुमला वाटतो. म्हणून जागे व्हा, एकत्र या… पक्ष, राजकारण, सत्ताकारण पेक्षा आपली माती आणि मातीतील नाती जिवंत ठेवायची असतील तर नारपार आरपार करावाच लागेल.

प्रवक्ता खान्देश हित संग्राम

Leave a Comment