NEET परीक्षा
तुमच्या मुलांना डॉक्टर व्हायचे आहे का ? तेही अत्यंत कमी पैशात
NEET Scholarship सध्याच्या युगामध्ये परमेश्वरानंतर परमेश्वराचे स्थान आई-वडील आणि डॉक्टर यांना दिले जाते .2020 मध्ये आलेल्या कोरोना महामारी मध्ये डॉक्टर हेच सामान्य जनतेचे आधार राहिलेत .
मानव जातीच्या इतिहासात अनेक रोग, आजार, महामारी यांच्याविरुद्ध डॉक्टर लढले.डॉक्टर हा पेशा म्हणजे एक आदर्श पेशा म्हणून ओळखला जातो. डॉक्टर असणाऱ्या व्यक्तींना समाजात एक वेगळा सन्मान देखील नेहमीच मिळत आलेला आहे. दुसऱ्याचे दुःख दूर करण्याचे भाग्य या पेशामध्ये आहे. यासोबतच सन्मानाने पैसा कमावण्याचे सुद्धा ते एक माध्यम आहे.प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांनी डॉक्टर व्हावे असे वाटते.पण सध्याच्या काळात डॉक्टर होणे हे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही.सर्वात आधी हे समजून घेऊया की डॉक्टर होण्यासाठी नेमके काय करावे लागते?

डॉक्टर होण्यासाठी नेमके काय करावे लागते? NEET Scholarship
डॉक्टर होण्यासाठी दहावीनंतर लगेच तयारी सुरू करावी लागते. संपूर्ण भारत देशामध्ये डॉक्टर होण्यासाठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच NEET नीट ही परीक्षा द्यावी लागते .NEET परीक्षेला संपूर्ण अभ्यासक्रम इयत्ता 11वी आणि 12वी चा NCERT बोर्डाचा असतो.
या परीक्षेची तयारी संपूर्ण भारतात जवळपास 10 लाख विद्यार्थी करतात. म्हणजेच स्पर्धा खूप मोठी आहे. ही परीक्षा भारतभर NTA (National Testing Agency) या एजन्सी तर्फे घेतली जाते.
NEET परीक्षा अभ्यासक्रम
या परीक्षेसाठी फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे तीन विषय बारावी इयत्तेत असणे आवश्यक आहे यालाच B ग्रुप असे म्हणतात. नीट ही परीक्षा 720 गुणांची असते. यापैकी 360 सर्वात जास्त गुण बायोलॉजी विषयाला असतात. म्हणजे पन्नास टक्के वाटा एकट्या बायोलॉजी विषयाला आहे. उर्वरित 180 गुण फिजिक्स व 180 गुण केमिस्ट्री विषयाला आहेत.720 पैकी खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट सीट MBBS साठी किमान 575- 600 गुण मिळवावे लागतात. 500+ गुण असल्यास चांगले कॉलेज व कोर्स मिळतो. उर्वरित विद्यार्थ्यांना बीएएमएस ,बीडीएस ,बीएचएमएस सारखे कोर्सेस मिळतात.
NEET परीक्षा मार्गदर्शक व मार्गदर्शन संस्था
आता या नीट परीक्षेच्या तयारीसाठी उत्तम मार्गदर्शक व मार्गदर्शन संस्था उपलब्ध होणे आवश्यक असते. नीट क्लासेसच्या नावावर पालकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसा उकळला जातो .परंतु खरंतर इतका पैसा खर्च करायची आवश्यकता नसते.संपूर्ण अभ्यासक्रम हा अकरावी आणि बारावी आधारित असतो .तुमच्याकडे पुरेसा पैसा नसेल मात्र मुले हुशार असतील तर एक मोठी संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे .
नोबेल फाउंडेशन नीट स्कॉलरशिप कोर्स
तुमच्या मुलांना कमी खर्चात नीट परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी जळगाव येथील नोबेल फाउंडेशन या संस्थेतर्फे नीट स्कॉलरशिप कोर्स चालविला जातो. कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर एपीजे कलाम यांच्या यांच्या प्रेरणेने हा मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आला आहे.यासाठी विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन विद्यार्थी निवडले जातात. अत्यंत कमी शुल्कात विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे मार्गदर्शन केले जाते.गोरगरीब विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवावे यासाठी हा सेवाभावी उपक्रम सुरू आहे.
तरी ज्या पालकांना आपल्या मुलांना डॉक्टर करावयाचे आहे त्यांनी जळगाव येथे प्रगती विद्या मंदिर समोर नोबेल फाउंडेशन येथे 7218501444 येथे संपर्क साधावा.
यावर्षी विद्यार्थ्यांना 26 मार्चपासून मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे ज्या विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी वरील क्रमांकावर नाव नोंदवावे खानदेशातील शेतकरी,मध्यमवर्गीय परिवारातील पालक व विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
नोबेल फाउंडेशन,जळगाव

1 thought on “NEET Scholarship वैद्यकीय शिक्षण तेही अत्यंत कमी पैशात”