जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदची ऑनलाईन बैठक संपन्न
१ ते ११ मार्चदरम्यान अहिराणी भाषा संवर्धनासाठी विशेष उपक्रम राबविण्याचा निर्णय
जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदच्या ऑनलाईन बैठकीत १ मार्च ते ११ मार्च २०२५ या कालावधीत विविध उपक्रमांच्या माध्यमातून अहिराणी भाषेचे संवर्धन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीला परिषदेशी संबंधित पदाधिकारी, साहित्यिक, कवी, लेखक आणि अहिराणी भाषा प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
परिषदेमध्ये सर्वानुमते ११ मार्च हा जागतिक अहिराणी भाषा दिवस म्हणून साजरा करण्याची परंपरा यंदाही जोमाने पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला. गावोगावी, चावडीवर, वावरात, शाळा-महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना अहिराणी भाषेची गोडी लावण्यावर भर देण्यात येणार आहे.




अहिराणी बोला
अहिराणी लिखा
अहिराणी भाषेच्या संवर्धनासाठी उपक्रम
संवर्धनासाठी विविध उपक्रम आखण्यात आले असून त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी विनोदी प्रसंगांचे लेखन व सादरीकरण, जाहिरातींचे अहिराणीकरण, संवाद लेखन, चारोळी आणि कविता लेखन, ऐतिहासिक व वैज्ञानिक प्रसंगांचे अभिवाचन, म्हणी आणि वाक्प्रचारांचा उपयोग, तसेच स्थानिक घडामोडींचे निरीक्षण करून मासिक पत्रिका प्रकाशन अशा उपक्रमांचा समावेश आहे.
विशेषतः, शेतकरी आणि मजुरांचे संवाद, दुकानदार आणि ग्राहक यांच्यातील विनोदी संभाषण, तसेच आई आणि मुलांमध्ये होणाऱ्या संवादांवर आधारित लेखन व सादरीकरण यासारख्या विषयांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. अहिराणी भाषा समृद्ध करण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांच्या बोलण्यातून उद्गारले जाणारे शब्द व प्रयोग संकलित करून त्यावर आधारित लघुनाट्ये आणि काव्यवाचनाचे आयोजन होणार आहे.
सोशल मीडियावर अहिराणीचा प्रचार
फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अहिराणी जोक्स, लग्नगीते, पारंपरिक गीते आणि साहित्य शेअर करून डिजिटल पातळीवरही भाषा संवर्धनावर भर दिला जाणार आहे.
जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे १ ते ११ मार्चदरम्यान हे उपक्रम प्रभावीपणे राबवले जातील, असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यामुळे अहिराणी भाषा आणि संस्कृतीचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यास हातभार लागेल, असा विश्वास परिषदेत व्यक्त करण्यात आला.
अहिराणी वाचा
अहिराणी बोला
अहिराणी लिखा
“अहिराणी मायना जागर करा करता सर्वांनी यामा सहभागल्या कार्यक्रम ना सर्व फोटो, व्हिडिओ, व्हाट्अप, फेसबुक, इंस्टाग्राम सर्वीकडे वाट लावा”
जय अहिराणी….
जय कान्हदेश…..
जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद
जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदनी ऑनलाईन बैठकमा १मार्च ते ११मार्च २०२५ हाऊ कालावधी मा आपूण सरवा अहिराणी मायना भोई, प्रेमी, लेखक, कवी, साहित्यिक, रसिक, प्रेषक पदाधिकारी आणि कार्यकर्तासनी .आपली अहिराणी भाषा संवर्धन करा करता आपून यावर ता.१ मार्च ते ११ मार्च २०२५ दरम्यान काम करण आवश्यक शे अस सरवानुमते ठरन
दर वरीसले आपूण 11 मार्च ले जागतिक अहिराणी दिवस साजरा करतस
गावे गाव, चावडीवर, पारवर, वावरमा , बांधवर, तसच आजूबाजून्या सगळ्या शाळा महाविद्यालयास ना पोरस ना करता मार्गदर्शन आयोजित करीसन समदा अहिराणी भाषा प्रेमी, रसिक, प्रेषक, लेखक, कवी, साहित्यिक यासनी शाळा आणि महाविद्यालय महीन यास्ना हेतू आणि तो प्रत्यक्ष मा आणता यावा म्हणून दीर्घकाळ उपक्रम राबाळीसण अहिराणी भाषा आणि त्यांनी संस्कृती संवर्धन करानाकरता प्रयत्न करणं आवश्यक शेतस.
कार्यक्रमन स्वरूप खाले देल शे
उद्देश
———-
कायमस्वरूपी अहिराणी भाषानी वृद्धी आणि नवनवीन लेखक कवी यासले लिखाण ले चालना , विषय उपक्रम भेटाले पाहिजे.
कृती आराखडा
—————–
पोरस करता उपक्रम कोणकोणत्या गोष्टीसना समावेश कराना याबाबत मा जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद ना कल्पना खाले देल शेतस.
१. एखादा विनोदी प्रसंग पोरेसले लिखाण सांगणं.
उदा. बिरबल वर्गामा उना
२. प्रसाधन विक्रीन्या जाहिराती
३. जोकरण्या गप्पा
४. कामवाली घरवाली न्या गप्पा
५. दुकानदार आणि गिराईक यासनी तू तू मे मे
६. वावरना प्रसंग
७. शेतकरी आणि मजूर गप्पा
८. चावडीवरन्या गप्पा
९. बाहेर या वस्तू खावावरून आई आणि पोर्यांनी नाराजी
१०. कायम मोबाईल वापरावरून आई आणि पोर्यानी लढाई
अशा निर्णय घटनांवर होणाऱ्या गप्पा संवाद चारोळ्या लिखाण.
११. विज्ञान ऐतिहासिक घटना व्यक्तीसवर संवाद लिखीसन सादर कराण .
१२. पेपर निवेदन पेपर लिखीसन गोशवारा तयार करणं.
१३. पेपरन्या मुख्य बातम्या गोया करण.
१४. आजूबाजूनिया घटनात्मक निरीक्षण करीतन साप्ताहिक मासिक पेपर तयार करान.
१५. अभिवाचन पुस्तक मा किंवा बायरना पेपर माईन उतारा अभिवाचन करण.
१६. आठवडाभर मा जुना किंवा नवा लेखक ना पुस्तक नी माहिती लिखाण.
१७. नाऱ्या नाऱ्या प्रकारना दहा ते वीस शब्द दिसन तेनावर अलक/उतारा /चारोळ्या लिखाण.
उदा:- रात्र, झाड ,रस्ता ,माणसे, वारा, आवाज, ओढा ,चांदणे, शहर ,मंदिर ,अशा शब्दसवर अर्थपूर्ण रचना करीसन त्यान प्रात्यक्षिक सादर करी लेवान.
१८. समानार्थी/ विरुद्धार्थी म्हणी शोधन अपुऱ्या म्हणी पुऱ्या करीसन वापरीसन संवाद लेखन (अर्ध मन अर्ध तुन) म्हणी पूर्ण करान, अर्थ सांगाण. देल संवाद मा म्हणी सना वापर करण.
१९. मराठी भाषा महिना शब्दास न करता हिंदी इंग्रजी प्रतिशब्द लेखन
२०. वर्गामधला सर्वात विनोदी आशयना धडा माई विनोदी शब्द शोधीसन वेगळा अर्थपूर्ण विनोदी उतारा कल्पना करिसं लिखाण.
२१. कविता चालमा बसाडी सण पोरस कडून गाई लेवान.
२२. वर्ग मधला पोरसणी विनोदी आशय माईन धडा माईन विनोदी शब्द शोधीसन अर्थपूर्ण विनोदी उतारा आपला स्वतः कल्पनातून लिखाण.
२३. आवडेल या शीर्षक न वापर करीत सण विविध विषयावर बोलि लेवान.
२४. आवडेल /आवडता पुस्तक लेखक ,कवी, कविता, जाहिरात, खेळाडू ,मित्र, सुविचार, स्वातंत्र्यसैनिक.
२५ सरवास करता उपक्रम अहिराणी जोक, चुटकुला, लगीनना गाना, घटयावरना गाना,
अहिराणी गाना fb , what’s app, स्टेटस, स्टोरी वर ठेवा
जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदना बठ्ठा पदाधिकारी आणि कार्यकर्तासनी यावर १ मार्च ते ११ मार्च दरम्यान काम करणं आवश्यक शे