काव्यलेखन कार्यशाळा

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई आयोजित काव्यलेखन कार्यशाळा

https://sahitya.marathi.gov.in/ यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसदी येथे झालेल्या
नवोदित कवींसाठी काव्यलेखन
कार्यशाळेच्या निमित्ताने माझे अनुभवाचे बोल अर्थात माझे मनोगत
(संजय धनगव्हाळ) अर्थात कुसूमाई

काव्यलेखन कार्यशाळा
काव्यलेखन कार्यशाळा



स्व आण्णासाहेब आर डी देवरे महाविद्यालय म्हसदी येथे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ संजीव गिरासे सर यांच्या संकल्पनेतून धनदाई माता मंगलकार्यालयात नवोदित कवींसाठी काव्यलेखन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी अनेक साहित्य कवी लेखक मान्यवर उपस्थित होते.

साहित्य क्षेत्रात साहित्यिक या नात्याने काही तरी नाविण्यपूर्ण काव्यात्मक तांत्रिक गुणदोष व तंत्रशुध्द बारकावे समजून घेऊन एक चांगला कवी निर्माण होण्याच्या उद्देशाने प्राचार्य डॉ संजीव गिरासे सरांनी म्हसदी सारख्या ग्रामीण भागातील नवोदितांसाठी कवींताची कार्यशाळा घेऊन एक कौतुकास्पद उपक्रम राबवण्यास यशस्वी झालेत.

खर पाहता या कार्यशाळेचा उपयोग नवोदितांनाच नाही तर जे आधी पासून लिहीत आहेत आहेत त्यांनाही खूप काही शिकायला मिळाले जे माहीत नव्हते ते ऐकायला मिळाले.कवितेच्या अनेक जडणघडणीचे बारकावे प्रा.डॉ कवि विरा राठोड सरांनी आपल्या दिड तासाच्या बिजभाषणातून नवोदितांसह उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन केले.

प्रा.विरा राठोड सर आपल बिजभाषणात म्हाणालेत की कविता लिहिणे हा सोपा प्रांत नसला तरी प्रत्येकामध्ये एक कवी लपलेला  असतो तो शोधता आला पाहिजे. अवतीभोवती घडवणाऱ्या घडामोडींच बारकाईने निरीक्षण केल्यास त्याचे  भाव सहज कवितेतून उमटतातं‌. कविता आत्मसात केल्याशिवाय कविता कळत नाही.कवितेत दुःख आहे,सुख आहे,विरह आहे,आनंद आहे,हाश्य आहे.जे आपण सहन करतो ते कवितेत रूपांतर होते किंवा ते काव्यात्मक स्वरूपात लिहू शकतो.


विषय आशय लय भाव असल्याशिवाय कवितेत सत्यता दिसत
नाही.कविता अंतःकरणापर्यंत पोहचली पाहीजे.मनातील असंख्य विचारांना कवि शब्दात मांडत असतो. सरतेशेवटी  प्रा.कवि विराट राठोड आपल्या बिजभाषणा म्हणालेत की स्वतःच समाधान झाल्याशिवाय कविता पुर्ण होत नाही.तथा कविता कविला त्याच जगणं शिकवते.जो कवितेत जगतो तो उत्तम कवि होतो.

त्यानंतर, डॉ रमेश पवार व डॉ रमेश माने यांनीही योग मार्गदर्शन केल्यानंतर प्रा.डॉ.नरेंद्र खैरनार सर आपल्या मंचीय कविता लेखन व सादरीकरण तंत्र सांगताना म्हणालेत की कवितेत तोच तोचपणा नसावा कधी कधी एका कवीच्या अनेक कवितांमध्ये तोच तोचपणा जाणवतो म्हणून ती कविता वाटत नाही किंवा त्या कवितेचा अर्थही स्पष्ट होत नाही.

भावनांना शब्दरूपात व्यक्त करण्याच उत्तमोत्तम माध्यम म्हणजे कविता असते.कविता ही अंतःकरणातून आली पाहिजेत कवितूचा भाव चेहऱ्यावर उमट्याशिवाय कविता कळत नाही शिवाय चांगलं वाचन असेल तर चांगली कविता लिहिता येऊ शकते यासाठी चांगल्या कविंच्या कविता वाचल्या पाहिजेत.

काव्यात सुलभता असायला हवी तसचे शब्दांचा अभाव असले तर कवितेत प्रभाव दिसत नाही.रचनेत काव्य मुक्त असायला हवे तेंव्हाच ती कविता प्रभावी होत असते.काही कविता खूपच  प्रभावी असतात पण सादरीकरणात सुलभता नसते किंवा कविते इतकं प्रभावी सादरीकरण जर नसेल तर ती कविता कविता वाटत नाही‌.किंबहुना इतरांपर्यंत पोहचत नाही.

म्हणजे कविता अशीही असली पण सादरीकरणात जर दमदार असले तरी ती कविता सहज भाव खाऊन जाते म्हणन सादरीकरणही उत्तम झालं पाहिजे.त्याशिवाय कविता अंतःकरणापर्यंत जात नाही,कवितेला आशय विषय भाव लय कळत नाही तो पर्यंत कविता कवितेतून काय म्हणायचं आहे हे कळत नाही.तथा अनेक कविंचे उदाहरण देऊन प्रा.डॉ नरेंद्र खैरनार सरांनी प्रभावीपणे नवोदितांना मार्गदर्शन केले.

सरते शेवटी प्रा बी.एन.चौधरी साऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवर कविंचे कविसंमेल झाले.व समारोपात प्रा डॉ सतीश म्हस्के सरांनीही उत्तम मार्गदर्शन केले.खरच उत्तम नियोजन, उत्कृष्ट चवदार भोजनाची मेजवानी सह विविध लेखक कविच्या पुस्तकांचा खूराक भेट देऊन आलेल्या कविंच्या ज्ञानात ताकदीच्या कविंच्या कवितांचं सशक्त शब्दांच खतपाणी देण्याचं पुण्यवंत काम प्राचार्य डॉ संजीव गिरासे सर व त्यांच्या महाविद्यालयातील प्राध्यापक टिमने कार्यक्रमाच्या निमित्ताने सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला.

आणि सारेच पाहुणे,नवोदित व मान्यवर कविंना काहीतरी चांगल ऐकण्याचं काहीतरी नाविण्यपुर्ण घेतल्याच भाग्य लाभले.खरचं कार्यक्रमाला येण्याच सार्थक झालं की कांहीतरी घेऊन जाण्याचे समाधान कायम स्मरणात राहतं.असाच कायम स्मरणात राहील असा कार्यक्रम प्राचार्य डॉ संजीव गिरासे सरांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या माध्यमातून दिला याचा आम्हा सर्वांना आनंद झाला.



संजय धनगव्हाळ
(अर्थात कुसुमताई)
९४२२८९२६१८
९५७९११३५४७

Leave a Comment