९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मा.प्रकाशदादा पाटील पिंगळवाडेकर सन्मानित
Prakashdada Patil Pingalwadekar honored in 97th All India Marathi Literature Conference
अमळनेर येथे संपन्न होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आजचा दुसरा दिवस दि. ३ फेब्रुवारी २०२४. कवी गणेश कुडे कविकट्टा या व्यसपीठावर विराजमान संयोजक मा. राजन लाखेसाहेब आणि सहकारी सन्मित्रांसह मा. प्रकाशदादा पाटील पिंगळवाडेकर.
मराठी सोबतच अहिराणी भाषेतही सातत्याने आपले उत्कृष्ट योगदान देत साहित्यसेवा करणारे प्रकाशदादा पाटील यांना यथोचित गौरवान्वीत करुन व्यासपीठ उपलब्ध करुन देणाऱ्या आयोजक समितीचे मी व्यक्तिशः मनःपूर्वक अभिनंदन करतो!
या कवीकट्टयात मराठी भाषेसह खान्देशातील मायबोली अहिराणी भाषेतूनही अगदी आत्मविश्वासाने व ठसकेबाज आवाजात कविता सादर करण्यात येत असल्याचे पाहून मला जो आनंद होत आहे तो शब्दातित आहे. पुनश्च आयोजक व संयोजन समितीचे त्रिवार अभिनंदन!
शिवाजी साळुंके, ‘किरण’ चाळीसगाव, जि. जळगाव.
2 thoughts on “९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मा.प्रकाशदादा पाटील पिंगळवाडेकर सन्मानित”