बोलींना कवित घेतल्याशिवाय प्रमाण मराठीला अभिजात दर्जा मिळणे शक्य नाही डॉक्टर रमेश सूर्यवंशी

बोलींना कवित घेतल्याशिवाय प्रमाण मराठीला अभिजात दर्जा मिळणे शक्य नाही डॉक्टर रमेश सूर्यवंशी


बोली या अभिजात असून त्या लोकसंस्कृतीत रुजलेल्या असतात.तर प्रमाणभाषा ही नियमांची चौकट असते.ती व्यवहारासाठी, वांग्मयनिर्मितीसाठी तयार करण्यात आलेली असते. आजची प्रमाण मराठी सामान्य लोकांपासून दूर गेलेली आहे .आपले प्रमाणल्व हरवून बसलेली आहे .असे उद्गार भाषा अभ्यासक डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांनी अंमळनेर येथे 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खानदेशी बोली या परिसंवादाच्या अध्यक्षीय समारोप करताना काढले.
जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे दिनांक दोन,तीन, चार फेब्रुवारी 2024 रोजी अखिल भारतीय मराठी महामंडळाचे 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे पार पडले. दिनांक 3 फेब्रुवारी शनिवार रोजी मंडप क्रमांक दोन कवीवर्य ना.धो. महानोर सभागृहात खानदेशी बोलीभाषा हा परिसंवाद, अहिराणी बोलीची अभ्यासक डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी बोलताना त्यांनी प्रमाण मराठी लोकाभिमुख होण्यासाठी व तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळून घेण्यासाठी तिला सामान्यांच्या बोलींना कवेत घ्यावे लागेल. आपल्या सामावून घ्यावे लागेल . बोलींना गावंढळ व ग्राम्य व अशुद्ध संबोधने म्हणजे ती बोली ज्या संस्कृतीत रुजली आहे त्या संस्कृतीला नाकारणे , त्या लोकांना नाकारणे . बोली पासून प्रमाण मराठी दूर गेल्यामुळे सामान्य पासून ती दूर जाते आहे व आपले प्रमानत्व हरवून बसते आहे. विदर्भ ,मराठवाडा ,खानदेश या प्रदेशातील सर्व बोलींची शब्दावली प्रमाण मराठीने स्वीकारली तर प्रमाण भाषेचा परीघ वाढेल. ब्रहत्कोश कित्येक पटीने मोठा होईल. शिवाय सामान्यांपर्यंत मराठीला पोहोचता येईल. तरच अभिजात दर्जाकडेही वाटचाल करता येईल.असे प्रतिपादन डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांनी मराठवाडा, खानदेश, विदर्भ या प्रदेशातील शब्दावलीच्या अनेक उदाहरणासह पटवून देत श्रोत्यांना खिळऊन ठेवले.
या परिसंवादात तावडी बोलीवर डॉक्टर अशोक कौतिक कोळी,लेवाबोलीवर डॉक्टर जतीन कुमार मेढे, भिलिबोलीवर डॉक्टर पुष्पा गावित तर गुर्जर बोलीवर डॉक्टर सविता पटेल यांनी आपले विचार मांडले. तर श्री शरद पाटलांनी सूत्रसंचालन केले

बोलींना कवित घेतल्याशिवाय प्रमाण मराठीला अभिजात दर्जा मिळणे शक्य नाही डॉक्टर रमेश सूर्यवंशी 2

Leave a Comment