सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य डाॅ संजीव गिरासे

सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य डाॅ संजीव गिरासे

  उत्तर महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या बाविसाव्या  वर्धापन दिनानिमित्त जळगावी  एक दिवसीय राज्यस्तरीय बाविसावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी खानदेशातील सुप्रसिद्ध कथा कादंबरीकार प्राचार्य डाॅ संजीव गिरासे (धुळे ) यांची निवड करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी दिली .

या पूर्वी सर्वश्री. प्रा डाॅ द ता भोसले, प्रा डाॅ तारा भवाळकर, डाॅ लक्ष्मीनारायण बोल्ली, वामन होवाळ, प्रा डाॅ रवींद्र शोभणे, महाकवी सुधाकर गायधनी, रा रं बोराडे, लक्ष्मण गायकवाड, सौ रेखा बैजल, प्रा डाॅ  यशवंत पाठक, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, डाॅ संगीता बर्वे, वसंत आबाजी डहाके, प्रा डाॅ नागनाथ कोत्तापल्ले, प्रा डाॅ सदानंद मोरे, प्रा डाॅ म सु पगारे, अशोक कोतवाल, सौ माया दिलीप धुप्पड , लक्ष्मीकांत देशमुख , बी जी वाघ , प्रदीप निफाडकर  या दिग्गजांनी सूर्योदय मराठी साहित्य  संमेलनाची अध्यक्षपदे भूषवलेली आहेत.

संमेलन यशस्वीतेसाठी शहराध्यक्ष साहेबराव पाटील, सचिव डी बी महाजन, कु गायत्री पाटील,कार्याध्यक्ष प्रविण लोहार ,उपाध्यक्ष विनोद निळे  हे प्रयत्नशील असून संमेलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
    
संजीव गिरासे यांचा थोडक्यात परिचय
  
संजीव गिरासे यांना ग्लोबल सोसायटी फाॅर हेल्थ ॲण्ड एज्युकेशन ग्रोथ नवी दिल्लीचा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेले आहे. गिरासे यांच्या नावावर आजमितीस बारा ग्रंथ प्रकाशित असून त्यात कथासंग्रह , ललितलेख संग्रह , कादंबरी यांचा समावेश आहे. विद्यापीठात व महाराष्ट्र राज्य शिक्षण यांच्या अभ्यासक्रमात त्यांचे प्रथमवर्ष , नववी , दहावीच्या वर्गाला त्यांचे कथासंग्रह , लघुकथा अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. ७९५ च्या वर त्यांचे कथाकथनाचे कार्यक्रम झालेले आहे.

Leave a Comment