प्रा.नरेंद्र तोरवणे यांचा पानिपत येथे गौरव
Prof. Narendra Toravane was honored at Panipat

साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष माजी प्राचार्य प्रा.नरेंद्र तोरवणे संस्थापक अंगणवाडी सेविकांची पतसंस्था साक्री त्यांच्या धर्मपत्नी सौ.संगिता तोरवणे अध्यक्षा अंगणवाडी सेविकांची सह.पतसंस्था साक्री यांनी ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांच्या आर्थिक उन्नतीसाठी केलेल्या विशेष योगदानाबद्दल पानिपत येथील ‘स्वराज्य जनक’ परिवारातर्फे विशेष गौरव करण्यात आला आहे .मराठा समन्वयक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश पाटील यांच्या हस्ते स्वराज्य जनक परिवारातर्फे शिवप्रतिमा व शिवधर्म गाथा भेट देऊन प्रा.नरेंद्र तोरवणे यांचा सन्मान करण्यात आला.
संपूर्ण राज्यभरात सहकार संस्थांच्या गुणात्मक विकासाच्या पडझडीवर चर्चा होत असतांना साक्रीसारख्या छोट्या शहरात सहकाराचा अर्थ सांगणारी अंगणवाडी पतसंस्था आर्थिक गरजा पूर्ण करणारी विकासवाहीनी ठरली आहे.28वर्षापूर्वी सुरु केलेल्या या पतसंस्था मार्फत उल्लेखनीय कामगीरीचा आलेख कौतुकास्पद आहे.

साक्री येथील पत्रकार से.नि.प्राचार्य नरेंद्र तोरवणे यांनी सुरू केलेल्या या आर्थिक पतसंस्थेतेची दखल पानीपत शहरातील समाजसंघटनांनी घेऊन प्रा.तोरवणे यांचा या समाजकार्याबद्दल गौरव केला आहे. गेली अनेक दिवस आम्ही या संस्थेतील कारभार पाहतोय,तेथील आदर्श आर्थिक गरज पुर्ण करण्याची प्रणालीही अभ्यासतोय यातुन सहकार ही खरोखर मानवी विकास आणि अस्तित्वाची प्रणाली ठरू शकेल हा विश्वासही वाटू लागला आहे.
कोरोनाकाळात अंगणवाडी सेविका सारख्या अल्प उत्पन्न असलेल्या वर्गाला मोठ्या प्रमाणावर कमी व्याजदराने कर्जपुरवठा करून त्यांच्या एकूण विकासात्मक वाटचालीला हातभार लावण्याचे मोलाचे काम या संस्थेने केल्याबद्दल प्रक्रियेत काम करणाऱ्या घटकांसह संकल्पक प्रा.तोरवणे यांनाही धन्यवाद दिले पाहीजे.अनेकवेळा अयोग्य नियोजन व पैशांचा अपव्यय यामुळे सहकार तत्वाच्या आर्थिक संस्था लयास जातांना अशा संस्थाच्या आदर्शवत वाटचालीमुळे निश्चित आश्वासक वातावरण तयार होईल.
भविष्यातही या पतसंस्थेमुळे साक्री तालुक्यातील अनेक अंगणवाडी सेविकांना आर्थिक ताकद मिळुन बळकट आधार तर मिळेलच परंतु इतर क्षेत्रात राहूनही तोरवणे परिवाराने एक आदर्श पतसंस्था तालुक्यात उभी करुन आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.
पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी मराठा समुदाय परिषदेचे उत्तर भारतातील जेष्ठ प्रतिनिधी बलवान लाथेर ,डाॕ.फत्तेसिंह कृष्णालाल मराठा,तसेच साक्री तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक मधुकर ठाकरे,दिलीप मराठे,तय्यबअली सय्यद आणि परिषदेचे कार्यालयीन सचिव प्रविण मोरे आदी उपस्थित होते.
या विशेष योगदानाची दखल घेऊन त्यांना 26जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.त्यावेळी पानिपत येथील मराठा समन्वय परिषदेने निमंत्रित करुन त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा कळवुन प्रा.नरेंद्र तोरवणे सरांचे पुनश्च मनःपूर्वक अभिनंदन करतो.
पंडित बेडसे सर
