रिमझिम काव्य संमेलन व साहित्यिक सन्मान सोहळा नाशिक येथे दिमाखात संपन्न

रिमझिम काव्य संमेलन व साहित्यिक सन्मान सोहळा नाशिक येथे दिमाखात संपन्न

महाकवी कालिदास रिमझिम काव्य संमेलन
रिमझिम काव्य संमेलन व साहित्यिक सन्मान सोहळा

अहिराणी अकॅडमी साठी सहकार्य करणार – आ.सीमाताई हिरे
अहिराणी भाषेतील साहित्य  मौखिक व लेखी सोबतच डिजिटलाइज होणे आवश्यक – डॉ. फुला बागुल
अहिराणी साहित्यिक व कवी यांना एक समृद्ध व्यासपीठासाठी अहिराणी अकॅडमी नाशकात व्हावी- विकास पाटील

खान्देश विकास मंडळ

उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद आयोजीत रिमझिम काव्य संमेलनाची क्षणचित्रे

    साक्री (प्रतिनिधी):- अहिराणी साहित्याचा दर्जेदार वारसा पुढील पिढीकडे संक्रमित करण्यासाठी मौखिक व लेखी स्वरुपातच तो डिजिटल स्वरूपात सुद्धा वृद्धिंगत करणं ही काळाची गरज आहे. साहित्य व संस्कृती हे जगण्याचा आदर्श विचार देते म्हणून कवी किंवा साहित्यिक होताना त्यातला माणूस अनुभवता आला पाहीजे असे विचार जेष्ठ साहित्यिक डॉ.फुला बागुल यांनी येथे व्यक्त केले.

अहिराणी अकॅडमी साठी सहकार्य करणार - आ.सीमाताई हिरे
अहिराणी अकॅडमी साठी सहकार्य करणार – आ.सीमाताई हिरे

कार्यक्रमाचे उदघाटन आमदार सीमाताई हिरे यांनी केले. अहिराणी अकॅडमी साठी सहकार्य करणार असल्या बाबत त्यांनी आश्वासित केले. प्रमुख पाहुणे म्हणून  मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ऍड. नितीन ठाकरे , उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे विकास पाटील कार्याध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील, कोषाध्यक्ष अर्जुन पाटील, डॉ. एस. के. पाटील, जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी श्री कृष्णा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

अहिराणी साहित्यिक व कवी यांना एक समृद्ध व्यासपीठासाठी अहिराणी अकॅडमी नाशकात व्हावी- विकास पाटील
अहिराणी साहित्यिक व कवी यांना एक समृद्ध व्यासपीठासाठी अहिराणी अकॅडमी नाशकात व्हावी- विकास पाटील

प्रारंभी प्राचार्य प्रशांत पाटील आणि विकास पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक  व आयोजन संदर्भात भूमिका मांडून सर्व साहित्यिकांचे स्वागत केले. अहिराणी साहित्यिक व कवी यांना एक समृद्ध व्यासपीठासाठी अहिराणी अकॅडमी नाशकात व्हावी अशी अपेक्षा विकास पाटील यांनी व्यक्त केली.

रिमझिम काव्य संमेलन व साहित्यिक सन्मान सोहळा

कालिकामाता मंदिर ट्रस्टच्या बंदिस्त सभागृहात रिमझिम काव्य संमेलन झाले यात सुमारे ४५ कविंनी आपल्या अहिराणी कविता सादर केल्या. अहिराणी बोली भाषेच्या जतन आणि संवर्धनार्थ आयुष्यभर केलेल्या सेवेच्या प्रती जीवन गौरव पुरस्कार देऊन अमळनेर येथील जेष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील यांना सन्मानित करण्यात आले. सत्कारास उत्तर म्हणून श्री कृष्णा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.अहिराणी बोलीभाषेत उत्कृष्ट काव्य आणि साहित्य निर्माण व्हावे मी घरोघरी जाऊन ओव्या आणि अभंग गोळा केलेत व मी शेवटच्या श्वासापर्यंत अहिराणी अहिराणीच करत राहील असे प्रतिपादन केले.

अहिराणी भाषेतील साहित्य  मौखिक व लेखी सोबतच डिजिटलाइज होणे आवश्यक - डॉ. फुला बागुल
अहिराणी भाषेतील साहित्य  मौखिक व लेखी सोबतच डिजिटलाइज होणे आवश्यक – डॉ. फुला बागुल

पुरस्कारार्थी व पुरस्कार निवड समिती

पुरस्कार निवड समिती म्हणून डॉ.फुला बागूल, डॉ. नरेंद्र खैरनार, सौ.लतीकाताई चौधरी, बापूसाहेब पिंगळे व प्रमोद कुवर यांनी काम पाहिले.  साहित्यिकांना, कवींना प्रोत्साहन  मिळावे म्हणून महाकवी कालिदास यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी रीमझीम कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीचे अहिरानी भाषा संवर्धक सारस्वत डॉ. दामोदर गोविंद बोरसे पुरस्कार एम.के.भामरे बापू, प्रा.भगवान पाटील, सौ.लता पवार, समाधान सोनवणे, वनमाला पाटील, रोहित पवार यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

रिमझिम काव्य संमेलन व साहित्यिक सन्मान सोहळा नाशिक येथे दिमाखात संपन्न 6
सौ.लता पवार पुरस्कार स्विकार करतांना

काव्य संमेलनातील सहभागी कविवर्य

काव्य संमेलनातील सहभागी कविवर्य प्रा.प्रकाश माळी, डॉ.अरुण अहिरराव,  सौ.लतिका चौधरी, वेदराज कपाटे, मोहन पाटील, रोहिणी कोठावदे, राजेंद्र जाधव, शिवदास मांडोळे, सुधाकर भामरे, सुमती पवार, रमेश चौधरी, रमेश महाले, अजय बिरारी, गोकुळ म्हसकर,मंगला रोकडे, गोरख पाटील, विजया नेरकर, संजय धनगव्हाल, ललित सैंदाणे, हर्षल सोनवणे,  विमल पटकरी, ज्ञानेश्वर भामरे यांचेसह अनेक कविंना  सन्मानित करण्यात आले.

उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद आयोजीत रिमझिम काव्य संमेलनाची क्षणचित्रे
उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद आयोजीत रिमझिम काव्य संमेलनाची क्षणचित्रे

सुत्रसंचलन

खान्देश मराठा मंडळ, नाशिक यांच्यातर्फे संपुर्ण नियोजन करण्यात आले होते. शेवटी उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे डॉ. नरेंद्र खैरनार व प्रा. प्रकाश माळी यांनी ऋणनिर्देश केले तर आपल्या खुमासदार शैलीत सुत्रसंचलन प्रमोद कुवर यांनी केले.

रिमझिम काव्य संमेलन व साहित्यिक सन्मान सोहळा नाशिक येथे दिमाखात संपन्न 9
रिमझिम काव्य संमेलन व साहित्यिक सन्मान सोहळा

रिमझिम काव्य संमेलन व साहित्यिक सन्मान सोहळा

पुरस्कार प्राप्त मानकरी

Leave a Comment