सातवे अहिराणी साहित्य संमेलन नेरला

डाॅ. सुधीर देवरे संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्षपदी आमदार कुणाल पाटील

७ वे अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजक खान्देश साहित्य संघ

महाराष्ट्र, धुळे व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सातवे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन नेर ता. धुळे येथे आयोजित करण्यात येत आहे. रविवार दि.२५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या एकदिवसीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आ. कुणाल बाबा पाटील तर संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. सुधीर देवरे यांची निवड करण्यात आली आहे. अहिराणी साहित्य संमेलनाचे उद्धघाटन आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर विशेष अतिथी म्हणून ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. भारत सासणे यांची उपस्थिती लाभणार आहे.

अहिराणी साहित्याचा आणि संस्कृतीचा जागर व्हावा आणि अहिराणी साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून खान्देशात आतापर्यंत सहा अहिराणी साहित्य संमेलने झाली आहेत. खान्देशासह महाराष्ट्र आणि इतर राज्यातील अहिराणी साहित्यिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या साहित्य संमेलनांना मिळाला आहे. त्या अनुषंगाने अहिराणी संमेलनाची परंपरा कायम ठेवत अहिराणी भाषा, व साहित्याच्या वृध्दीसाठी आ. कुणाल पाटील यांनी संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेत उत्तम पध्दतीने नियोजन करणार असल्याचे सांगितले आहे.

रविवार दि २५ फेब्रुवारी रोजी धुळे तालुक्यातील नेर येथील स्वातंत्र्य सैनिक स्व. आण्णासाहेब चुडामण पाटील साहित्य नगरीत एक दिवसीय ७ व्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक डॉ. सुधीर देवरे, सटाणा चे राहणार आहेत. डॉ. सुधीर देवरे यांनी २८ पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन केले असून विविध ग्रंथांचेही संपादन त्यांनी केले आहे.अहिराणी भाषा, कला, लोकवाडमयाचे ते आभ्यासक आहेत. लिखाणातील असंख्य पुरस्कारानेही त्यांना गौरनवावित करण्यात आले आहे.

आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

आदर्श सरपंच भास्करराव पेरे- पाटील यांच्या हस्ते अहिराणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होईल. ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. भारत सासणे विशेष अतिथी असतील. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. पुष्पराज गावंडे, डॉ. धनंजय गुडसरकर, प्रसिद्ध साहित्यिक मीनाक्षी पाटील संमेलनाला उपस्थित असतील. नेर येथील स्वातंत्र्यसैनिक स्व. अण्णासाहेब चूडामण पाटील साहित्य नगरीत हे साहित्य संमेलन होईल. यापूर्वीच्या सहा संमेलनांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अहिराणी साहित्य संमेलनाची ही परंपरा कायम ठेवत अहिराणी भाषा व साहित्याच्या वृद्धीसाठी संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेत उत्तम पद्धतीने नियोजन करणार असल्याचे आमदार कुणाल बाबा पाटील यांनी सांगितले.

कार्यक्रमांची रेलचेल

ग्रंथदिंडी, उद्घाटन सत्र, पुस्तक प्रकाशन, पुस्तक प्रदर्शन, परिसंवाद, कथाकथन, चार सत्रांमध्ये अहिराणी भाषेतील कवितांचे सादरीकरण होणार आहे. दिवसभर चालणाऱ्या या संमेलनात सहभागी व्हावे,असे आवाहन आयोजक तथा खानदेश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. सदाशिव सूर्यवंशी, सचिव कवी रमेश बोरसे, प्राचार्या रत्ना पाटील, रमेश राठोड व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

साहित्य संमेलनासाठी विशेष कार्य अधिकारी प्रकाश पाटील, कवी जगदीश देवपूरकर, रमेश बोरसे, सुभाष अहिरे, प्राचार्या रत्ना पाटील, प्रा. रमेश राठोड, प्रा. अशोक शिंदे, शाहीर नानाभाऊ पाटील, गोकुळ पाटील, शरद धनगर, डॉ. नरेंद्र खैरनार, डॉ. कुणाल पवार, हेमलता पाटील, चूडामण पाटील, विजय पाटील, देवदत्त बोरसे, जितेंद्र चौधरी, प्रवीण देवरे, सुनीता बोरसे, जितेंद्र बहारे, सुनीता पाटील, के. बी. लोहार, शाहीर श्रावण वाणी, वीरेंद्र बेडसे, डॉ. भय्या पाटील, बाळासाहेब गिरी, दिनेश चव्हाण, गणेश पाटील आदी परिश्रम घेत आहेत.

संमेलनाध्यक्षांची २८ पुस्तके

संमेलनाध्यक्ष डॉ. देवरे यांनी २८ पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन केले असून, विविध ग्रंथांचेही संपादनही केले आहे. अहिराणी भाषा, कला, लोकजीवन व लोकवाङ्मयाचे ते अभ्यासक आहेत. लिखाणासाठी असंख्य पुरस्कारांनीही त्यांना गौरविण्यात आले आहे.

संमेलनात रंगणार ग्रंथदिंडीसह परिसंवाद

संमेलनात ग्रंथदिंडी, पुस्तक प्रकाशन, पुस्तक प्रदर्शन, परिसंवाद, कथाकथन होणार आहे. चार सत्रामध्ये अहिराणी भाषेतील कवितांचे सादरीकरण होणार आहे. दरम्यान, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देवरे यांनी २८ पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन केले असून, विविध ग्रंथांचेही संपादन त्यांनी केले आहे. अहिराणी भाषा, कला, लोकजीवन व लोकवाङ्मयाचे ते अभ्यासक आहे.

महत्वाचे लेख आणी बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोहत्सव

अनाथांचे देवरुप घर श्री शंकरबाबा पापडकर

मुलींच्या शिक्षणाची चिंता मिटली पालकांनो आपल्या मुलींना खुप शिकवा

लवकर निजे लवकर उठे त्यास ज्ञान संपत्ती मिळे

शुन्य वाहे भार शुन्याचाच

कस्तुरीगंध श्रद्धा उंचावणारा कथासंग्रह

महाराष्ट्रात गुटका बंदी कशासाठी ?